Type Here to Get Search Results !

कोंढवे धावडे मध्ये इलेक्ट्रिक दुचाकी पेटवली; उत्तमनगर मध्ये गुन्हा दाखल

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


electric bike fired in kondhave dhawade uttamnagar


 

पुणे, दि. 26 जुलै 2023 (चेकमेट टाईम्स): उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या (Uttamnagar Police Station) हद्दीतील कोंढवे धावडे (Kondhave Dhawade) मध्ये असलेल्या एका इमारतीच्या पार्किंग मध्ये उभी करण्यात आलेली इलेक्ट्रिक दुचाकी दोन अज्ञातांनी, अज्ञात कारणावरून पेटवल्याची (Electric Bike Fired) घटना समोर आली आहे. याबाबत उत्तमनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरु आहे.

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवे धावडे मधील खडकमाळ (Khadakmal) भागात असलेल्या संस्कार कॉलनी (Sanskar Colony) मध्ये हे कु-संस्काराचे दर्शन घडले आहे. या कॉलनी मधील फिर्यादी राहत असलेल्या इमारतीच्या पार्किंग मध्ये त्यांची इलेक्ट्रिक दुचाकी लावलेली होती. दरम्यान, सोमवार दि. 24 जुलै 2023 रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास दोन अनोळखी इसमांनी सदरील दुचाकी अज्ञात कारणावरून पेटवून देऊन, दुचाकीचे 48 हजार रुपये किमतीचे नुकसान केले आहे.

 

 

रोहित पायगुडे (वय.26 रा. संस्कार कॉलनी, खडकमाळ, कोंढवे धावडे, पुणे) (Rohit Paigude) यांनी उत्तमनगर पोलिसात फिर्याद दिली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर (PI Kiran Balwadkar), गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शबनम शेख (PI Shabnam Shaikh) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार तानाजी नांगरे (Tanaji Nangre) पुढील तपास करत आहेत.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.