Type Here to Get Search Results !

पार्किंगच्या वादातून पुन्हा वाद, पाहुणा आलेल्या ज्येष्ठाचा दातच पाडला; वारजे माळवाडी मधील प्रकार

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


bike parking pune

पुणे, दि. 11 जुलै 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी (Warje Malwadi) मधील एका सोसायटीत मेंटेनन्स (Society Maintenence) शुल्कावरून कोयता हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच, आता दुसऱ्या एका सोसायटी मध्ये बाहेरून पाहुणा आलेल्या ज्येष्ठाने सार्वजनिक पार्किंग (Public Parking) मध्ये गाडी लावल्याने वाद झाल्याची घटना घडली. यामध्ये सोसायटीच्या अध्यक्षाने (Chairman) केलेल्या मारहाणीत त्या ज्येष्ठ नागरिकाचा दात देखील पडला. मात्र नंतर सामोपचाराने वाद मिटवण्यात आला.

 

 

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी मधील हायवेच्या परिसरात (Warje Highway) असलेल्या एका मोठ्या सोसायटी मध्ये सदरील घटना घडली. यामधील ज्येष्ठ नागरिक हे त्यांच्या परिचयातील एका व्यक्तीकडे त्या सोसायटी मध्ये आले होते. यावेळी त्यांनी पाऊस असल्याने, त्यांची दुचाकी सोसायटीच्या सार्वजनिक पार्किंग मध्ये लावली. दरम्यान सोसायटीचे अध्यक्ष आल्यानंतर त्यांना बाहेरील कोणाचीतरी दुचाकी सोसायटीच्या आवरत लागलेली दिसली. यावेळी त्यांनी चिडून सदरील दुचाकीच्या चाकांमधील हवा काढून टाकली.

 

 

मात्र ते अध्यक्ष महोदय तेवढ्यावरच थांबले नाहीत. त्या गाडीचे चालक मालक येण्याची त्यांनी तेथेच थांबून वाट पाहिली. काही वेळाने ज्येष्ठ नागरिक आपल्या गाडीजवळ आले आणि निघण्याच्या प्रयत्नात होते. मात्र त्यांना गाडीच्या चाकातील हवाल गेल्याचे लक्षात आले. तेवढ्यात सदरील सोसायटीच्या अध्यक्षांनी त्या ज्येष्ठ नागरिकांना सोसायटी मध्ये गाडी का आणली याचा जाब विचारत वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्या ज्येष्ठांनी देखील त्यांना उलट उत्तर देत, सार्वजनिक पार्किंग असल्याचा वास्तववादी उल्लेख केला. त्यामुळे चिडलेल्या अध्यक्षांनी त्यांना मारहाण केली. यामध्ये त्या ज्येष्ठाचा एक दात पडला.

 

 

दरम्यान ज्यांच्याकडे ते आले होते, त्यांनी मध्यस्थी करून भांडणे सोडवली. मात्र ज्येष्ठ नागरिक काही केल्या ऐकायला तयार नव्हते. तर अध्यक्ष देखील तेवढ्याच रागात होते. यावेळी ज्येष्ठांनी वारजे पोलिसात धाव घेत, सदरील प्रकरणावर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनीही क्षणाचाही विलंब न करता, त्या अध्यक्षाला पोलिसी खाक्या दाखवत चौकीत आणले. एव्हाना अध्यक्षाला आपली चूक लक्षात आली होती. त्याने पोलिसांसमोर ज्येष्ठाची माफी मागितली. ज्येष्ठाने देखील वाद न वाढवता, मोठ्या मनाने अध्यक्षाला माफी दिली. मात्र भविष्यात पुन्हा अशी कृती कोणाच्याही बाबतीत घडल्यास “पोलीस माफ करणार नाहीत” असा इशारा पोलिसांनी त्या अध्यक्षाला दिला.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.