Type Here to Get Search Results !

खडकवासला धरण क्षेत्रातून कोल्हापूर पद्धतीचे ढापे चोरणारी परप्रांतीय टोळी जेरबंद; उत्तमनगर पोलिसांची कामगिरी

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Immigrant gang stealing Kolhapur-style dhapa from Khadakwasla dam area jailed; Performance of Uttamnagar Police


 

पुणे, दि. 26 जुलै 2023 (चेकमेट टाईम्स): खडकवासला पाटबंधारे विभागाचे (Khadakwasala Irrigation Division) बहुली (Bahuli) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे (Kolhapur Style Dam) तब्बल 108 ढापे अर्थात लोखंडी प्लेट (Steel Plates) चोरुन नेणाऱ्या 6 परप्रांतीयांच्या टोळीला (Gang of Uttar Pradesh) उत्तमनगर पोलीसांकडुन (UttamNagar Police) अटक करून, त्यांच्याकडून 10 लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे. संशयातून अडवलेला टेंपो आणि त्यातून पळून गेलेल्या 5 जणांना ताब्यात घेण्यापासून मुद्देमाल हस्तगत करेपर्यंतची मोठी कामगिरी उत्तमनगर पोलिसांनी बारा तासांच्या आत पूर्ण करत, टीमने केलेल्या तपासाची वेगवान गती दाखवून दिली.

 

 

याबाबत उत्तमनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि. 21 जुलै 2023 रोजी मध्यरात्री 1 ते 3 च्या दरम्यान एमईएस गेट उत्तमनगर (MES Gate Uttamnagar) येथे उत्तमनगर पोलीस स्टेशनचे पेट्रोलिंग मार्शल पोलीस नाईक सचिन गायकवाड (Uttamnagar Marshal Sachin Gaikwad) यांना गस्त करत असताना महिंद्रा पिकअप क्रमांक MH 12 TV 7442 गाडीचा संशय आल्याने त्यांनी गाडी थांबवून चेक केली असता, पोलीसांना पाहुन गाडीतील 5 संशयित गाडी सोडुन पळुन गेले.

 

 

यावेळी गायकवाड यांना गाडीत कोल्हापुर पद्धतीच्या बंधाऱ्याचे पाणी अडवण्यासाठी वापरण्यात येणारे ढापे अर्थात लोखंडी प्लेट दिसून आल्या. हे चोरीचे असावे असा अंदाज आल्यानंतर गायकवाड यांनी याबाबत वरिष्ठांना कळवून, अपर पोलीस आयुक्त प्रविण पाटील (Additional Commissioner of Police Pravin Patil), परीमंडळ 3 चे पोलीस उप-आयुक्त सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma), कोथरुड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे (ACP Bhimrao Tele) यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर (PI Kiran Balwadkar), गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शबनम शेख (PI Shabnam Shaikh) यांच्या सूचनांप्रमाणे तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे (API Umesh Rokade), दादाराजे पवार (API Dadaraje Pawar), पोलीस अंमलदार तानाजी नांगरे, गणेश हजारे, सचिन गायकवाड, तुषार किंद्रे, ज्ञानेश्वर तोडकर, समीर पवार, परमेश्वर पाडाळे यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली.

 

 

यामध्ये वेगवेगळ्या टीमने तपास करत सदरील महिंद्रा पिक अपचा गाडीमालक सुरेंद्र चंदीका यादव (वय 25 वर्ष सध्या रा. कोंढवे धावडे, पुणे, मुळगाव- सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश) (Surendra Chandika Yadav) यास ताब्यात घेवून पोलीसांनी सखोल तपास केला असता, तपासात सुरेंद्र यादव व त्याचे इतर 6 साथीदारांनी बहुली गावाजवळील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यावरून लोखंडी प्लेट चोरल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी खडकवासला पाटबंधारे विभागाशी संपर्क करून खात्री केली असता मुठा नदीच्या कोल्हापुर पध्दतीच्या बंधाऱ्यावर एकूण 120 लोखंडी ढाप्यांपैकी 108 लोखंडी ढापे चोरीस गेलेले आहेत. त्याबाबत पाटबंधारे विभागाने पोलीसात तकार दिल्यानंतर पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यात आला.

 

 

या ढाप्यांची चोरी केलेप्रकरणी टेंपो मालक सुरेंद्र यादव, याच्यासह रामरक्षा पासवान (रा. विदया व्हॅली शाळेजवळ, सुपा पाषाण रोड, सुसगाव), मुनीराम यादव (Muniram Yadav), राहुल यादव (Rahul Yadav), प्रिन्स ऊर्फ मिथीलेश यादव (Prince alias Mithilesh Yadav), प्रदीप कनोजिया (Pradip Kanojiya) (सर्वजण राहणार सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश) (Siddhartha Nagar, Uttar Pradesh) यांना अटक करण्यात आली असून, चोरीस गेलेले 108 लोखंडी ढापे आणि चोरीकरता वापरलेली वाहने असा एकूण 10 लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त (Confiscation of Goods) करण्यात आला आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये उत्तमनगर पोलिसांनी केलेली ही दुसरी कौतुकास्पद कामगिरी आहे. काही दिवसांपूर्वी मांडवी (Mandvi) भागातून अशाच प्रकारे सेंट्रिंग प्लेट चोरी करणारी टोळी ताब्यात घेण्यात उत्तमनगर पोलिसांना यश आले होते. त्यामुळे उत्तमनगर पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.