Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 20 जुलै 2023
(चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी (Warje
Malwadi) मधील गोकुळनगर (Gokul Nagar) आणि
सहयोग नगर (Sahayog Nagar) पठारावर हातभट्टी दारूच्या
(Country Liquor) धंद्यांनी हैदोस घातलेला असून, त्यावर अंकुश आणणार
का असा सवाल या भागातील रहिवाश्यांनी केला आहे. दिवसेंदिवस येथे एक एक हातभट्टीचा
गुत्ता वाढत असून, या पठार भागात प्रवेश करताच, बेवड्यांकडून (Alcoholic
Peoples) नागरिकांचे स्वागत होताना दिसते. बेवड्यांच्या टोळ्याच्या-टोळ्या
भर चौकात अक्राळविक्राळ अविर्भाव (Monstrous Absence) करत
थांबलेले दिसतात. यामुळे महिला आणि लहान मुलांच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना
(Womens & Childrens Insecurity Sense) बळावताना दिसत आहे. मात्र
असे असताना देखील उत्पादन शुल्क विभाग (Excise Department)
अथवा स्थानिक पोलिसांकडून (Warje Police Station) त्यावर
कारवाई का होत नाही? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.
तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित (Senior PI Machhindra Pandit)
यांनी जुलै 2020 मध्ये वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचा चार्ज घेतल्यानंतर पहिल्या
दोन आठवड्यांच्या आतमध्येच या भागातील हातभट्टी धंद्यांवर छापा टाकून शेकडो लिटर
गावठी दारू नष्ट (Alcohol Destroyed) केली होती. वारजे पोलीस
स्टेशनचा चार्ज घेतल्यानंतर एवढ्या कमी कालावधी मध्ये या पठार भागाला भेट देणारे
आणि प्रत्यक्ष कायदेशीर कारवाई करणारे ते पहिले पोलीस निरीक्षक (First PI
in Warje) ठरले होते. आपण छायाचित्रात पाहू शकता वारजे पोलीस
स्टेशनच्या तत्कालीन महिला सहायक पोलीस निरीक्षक सोनाली कथले (API Sonali
Kathale), पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले (PSI Ashok Yeole) यांच्या पथकासह आजपासून बरोब्बर 3 वर्षांपूर्वी, अर्थात 20 जुलै 2020
रोजी मच्छिंद्र पंडित यांनी छापा मारल्यानंतर (Rade in Warje) ताब्यात घेण्यात आलेले हातभट्टी दारूचे कॅन.
त्यापूर्वी तत्कालीन वरिष्ठ पोलीस
निरीक्षक आणि काही काळापूर्वी दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त
झालेले सुनील दरेकर (ATS ACP Sunil Darekar) यांनी देखील या भागातील
बेकायदेशीर हातभट्टी धंदे आणि गुन्हेगारीवर नियंत्रण (Control of Crime) आणण्यासाठी मोठे काम केले होते. मात्र त्यानंतर या भागात राजरोस दारूचे
धंदे जैसे थे सुरु असल्याचे दिसतात. त्यावर कारवाई केल्या तरी हे धंदे सुरु होत
असल्याचे वारंवार आढळून आले. त्यामुळे या धंद्यांवर कठोर कारवाई करावी (Take
Serious Action) अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय भिलारे
(Social Worker Dattatray Bhilare) यांनी केली आहे. त्याबाबत ते
पुणे शहर पोलीस आयुक्तांची (CP Ritesh Kumar) भेट घेऊन,
याबाबत निवेदन देणार असल्याचे भिलारे यांनी चेकमेट टाईम्सशी (Checkmate
Times) बोलताना सांगितले.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप
करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर
फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84