Type Here to Get Search Results !

या वाहनांसाठी कात्रज नवीन बोगदा ते नवले पुलाची वेगमर्यादा आणखीन घटवली; पावती पडण्यापूर्वी पहा तुमचे वाहन या श्रेणीत तर नाही ना

 Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


navale bridge road speed limit


 

पुणे, दि. 19 जुलै 2023 (चेकमेट टाईम्स): मुंबई - बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai Benglore National Highway) कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल भागात (Katraj Tunnel to Navale Bridge) वारंवार होणारे अपघातांवर नियंत्रण आणण्याकरीता (Control Accidents) पुणे शहर वाहतूक पोलिसांकडून (Pune City Traffic Police) वारंवार उपाययोजना सुरु आहेत. त्यात पुन्हा एकदा अपघात कमी करण्यासाठी या परिसरातून वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणणे आवश्यक असल्याच्या निष्कर्षावर वाहतूक पोलीस आलेले असून, आता काही वाहनांसाठी 40 किलोमीटर प्रती तास एवढ्या नियंत्रणात वेग मर्यादा (Speed Limit) ठरवण्यात आली असल्याचे वाहतूक पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या एका पत्रकात म्हटले आहे.

 

 

महाराष्ट्र शासन गृह विभागच्या नोटीफिकेशननुसार मोटार वाहन कायद्याच्या कलमांमधून (Motor Vehicle Act) प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन, नागरिकांसह सामाजिक संस्थांकडून प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांचा (Objections and Suggestions) विचार करून, पुणे शहर वाहतुक पोलीस उप-आयुक्त विजयकुमार मगर (DCP Vijaykumar Magar) यांनी सदरील आदेश लागू केलेले आहेत. यामध्ये मुंबई - बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील कात्रज बोगदा ते नवले पूल या दरम्यान वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या जड, अवजड वाहनांकरीता (Heavy Vehicles) उदाहरणार्थ ट्रॅक्टर - ट्रेलर कॉम्बीनेशन (Tractor - Trailer Combination), ट्रक – ट्रेलर (Truck - Trailer), अर्टीक्युलेटेड व्हेइकल्स मल्टी अॅक्सल वाहने (Multi Axle Articulated Vehicles), कंटेनर (Container), मोठया आकाराची मालाची वाहतूक (Goods Carrier) करणाऱ्या वाहनांकरीता 40 कि.मी. / तास अशी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

 

 

वाहतूक विभागाच्या या नवीन निर्णयामुळे या भागातील वाहतुकीचा वेग मंदावला जाईल, पर्यायाने अपघातांचे प्रमाण कमी होईल असा निकष काढण्यात आलेला आहे. असे असले तरी आता बहुतांशी सर्वच वाहनचालकांना आपल्या वाहनांची वेग मर्यादा 40 किलोमीटर प्रती तास एवढ्या कमी आणावी लागेल, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्याला कारण देखील तसेच असून, त्यापेक्षा अधिक वेगाने जाणाऱ्या वाहनांना स्वयंचलित कॅमेऱ्यातून आपोआप दंडाची पावती जाऊ शकते. त्यामध्ये अवजड वाहन असेलच असे नाही. त्यामुळे चुकून मोटारीला असा दंड आकारला गेल्यास, तो कमी करून घेण्यासाठी वाहनचालकांना मनस्ताप सहन करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे सर्वच वाहनांनी वेग मर्यादा पाळल्यास, आपोआपच अपघात कमी होण्यास मदत होईल, असे मत वाहतूक अभ्यासकांकडून व्यक्त होते आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.