Type Here to Get Search Results !

वारजे मधील सोसायटीच्या मेंटेनन्सवरून वाद; कुटुंबावर कोयत्याने हल्ला करणारे हल्लेखोर जेरबंद

 

koyta attack on family in warje malwadi mhada colony

पुणे, दि. 3 जुलै 2023 (चेकमेट टाईम्स): सोसायटीचा मेंटेनन्स देण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसन हाणामारी (Fighting for Maintenance of society) मध्ये होऊन एका कुटुंबावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना वारजे माळवाडी  (Koyta Attack in Warje Malwadi) मध्ये घडली. यामध्ये तीन महिलांसह पाच जण जखमी (Five Injured) झाले आहेत. यानंतर वारजे पोलिसांनी (Warje Police Station) तपासाची चक्रे फिरवत फरार झालेल्या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. (Pune Crime News)

 

 

यातील फिर्यादी महादेव शंकर कसबे (वय.35) (Mahadeo Shankar Kasbe) यांनी वारजे पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार शनिवार दि. 1 जुलै 2023 रोजी रात्री पावणे दहा ते साडे दहाच्या दरम्यान सदरील घटना घडली असून, जखमी महादेव कसबे हे राहत असलेल्या इमारतीच्या मेंटेनन्सची मागणी करण्याकरिता रेश्मा जगताच (Reshma Jagtap) यांचे घरी गेले होते. यावेळी पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या चंदू कांबळे व त्याचे इतर पाच साथीदारांनी कसबे यांना “आमचेकडे बिल्डींगचे मेंन्टेनस मागु नको” म्हणून हातात कोयता घेवुन मारहाण करत, शिवीगाळी केली.

 

 

यावेळी महादेव कसबे हे त्यांची पत्नी, आई व भाऊ आणि भावाच्या पत्नीसह वारजे पोलीस स्टेशन मध्ये दोन दुचाकींवरून तक्रार देण्यासाठी जात असताना, हल्लेखोर अनिकेत बापू कसबे यांनी त्यांच्या साथीदारांसह सोसायटी पासून मागे येत, रोझरी शाळेजवळ त्यांना अडवून, महादेव कसबे यांच्या डोक्यावर डाव्या बाजुस कोयत्याने गंभीर वार करून जखमी केले. त्याचबरोबर सर्वच कुटुंबियांना हाताने, कोयत्याने आणि दगडांनी मारहाण (Koyta Attack on Family) केल्याची तक्रार महादेव कसबे यांनी वारजे पोलिसात दिली असल्याचे वारजे पोलसांनी चेकमेट टाईम्सशी बोलताना सांगितले.

 

 

दरम्यान वारजे माळवाडी परिसरात पुन्हा कोयता गँगने डोके वर काढल्याने पुणे शहर पोलीस दलातील वरिष्ठांनी वारजे पोलिस स्टेशनला (Senior Police Officers Visit on the Spot) भेटी देत, हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. यानंतर पोलीस उप-आयुक्त परिमंडळ -3 सुहेल शर्मा (DCP Zone 3 Suhail Sharma), सहायक पोलीस आयुक्त कोथरुड विभाग भिमराव टेळे (ACP Kothrud Bhimrao Tele), यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन केलेल्या मार्गदर्शनानुसार वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापुरकर (Senior PI Sunil Jaitapurkar), गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी (Crime PI Ajay Kulkarni) यांच्या आदेशान्वये तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे (PSI Narendra Mundhe), रामेश्वर पारवे (PSI Rameshwar Parve), पोलीस नाईक प्रदिप शेलार (Pradeep Shelar), अमोल राऊत (Amol Raut), हणमंत मासाळ (Hanumant Masal), पोलीस शिपाई बंटी मोरे (bunty More), श्रीकांत भांगरे (Shrikant Bhangare), विकी खिलारी (Vicky Khilari), अजय कामठे (Ajay Kamthe), विजय भुरूक (Vijay Bhuruk) यांच्या पथकाने फरार झालेल्या हल्लेखोरांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बापू रायकर (API Bapu Raikar) पुढील तपास करत आहेत.

 

 

यामध्ये महादेव शंकर कसबे (वय 35 वर्षे रा. फ्लॅट नं 113, म्हाडा कॉलनी, ए बिल्डींग, वारजे माळवाडी, पुणे) (Mahadev Shankar Kasabe, Mhada Colony, Warje Malwadi, Pune) यांच्या तक्रारीवरून अनिकेत बापू कसबे (Aniket Bapu Kasabe), ओमकार दिपक जाधव (Omkar Deepak Jadhav), अनिल संजय जोगदंड (Anil Sanjay Jogdand), अविनाश कांबळे (Avinash Kambale) आणि चंद्रकांत कांबळे (Chandrakant Kambale) (सर्वजण राहणार म्हाडा कॉलनी, वारजे माळवाडी, पुणे) यांना अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीनाला (Juvenile Criminal) ताब्यात घेण्यात आले आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.