Type Here to Get Search Results !

रामनगर मधील मोक्यातील त्या फरार आरोपीच्या सिंहगड रोड पोलीसांनी आवळल्या मुसक्या

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


The Sinhagad Road police caught the fugitive accused in a raid in Ramnagar (MCOCA)


 

पुणे, दि. 30 जुलै 2023 (चेकमेट टाईम्स): 16 नोव्हेंबर 2022 रोजी एका तरुणावर हत्याराने वार करून गंभीर जखमी करत सिंहगड रस्ता (Sinhgad Road) भागात नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगार विनोद जामदारे याच्यासह टोळीतील तिघांच्या विरोधात पोलिसांनी फेब्रुवारी 2023 मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) (Sinhgad Road MCOCA) कारवाई केली होती. त्यातील फरार असलेल्या एकाला पकडण्यात सिंहगड रोड पोलिसांना यश आले आहे. या टोळीने सिंहगड रस्ता, वडगाव (Vadgaon), धायरी (Dhayari), हिंगणे (Hingane), माणिकबाग (Manikbaugh), दत्तवाडी (Dattawadi Police Station), वारजे (Warje Police Station) आणि हवेली (Haveli Police Station) परिसरात गुन्हे केले आहेत.

 

 

सिंहगडरोड पोलीस स्टेशन (Sinhgad Road Police Station) मध्ये दाखल असलेल्या आर्म अॅक्ट (Arm Act) आणि अनेक गुन्हेगारी कलमांसह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) नुसार विनोद शिवाजी जामदारे (वय 32, रा. सर्वोदय लॉन, वडगाव, मूळ रा. लोणारवाडी, जि. उस्मानाबाद) (Vinod Shivaji Jamdare), आकाश सुभाष गाडे (वय 21, रा. रामनगर, माणिकबाग, सिंहगड रस्ता, पुणे) (Akash Subhash Gade), गणेश दिलीप म्हसकर (वय 23, रा. कुमार अपार्टमेंट, माणिकबाग, सिंहगड रस्ता, मूळ रा. आंबी, ता. पानशेत, पुणे) (Ganesh Dilip Mhaskar) अशी मोका कारवाई केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. त्यातील आकाश गाडे याचा सिंहगड पोलीस शोध घेत होते.

 

 

दरम्यान गुरुवार दि. 27 जुलै 2023 रोजी पोलीस अंमलदार देवा चव्हाण (Deva Chavan) आणि सागर शेडगे (Sagar Shedage) यांना त्याचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी (Information by Informer) मिळाली की, मोक्का गुन्ह्यातील पाहीजे असलेला आरोपी आकाश सुभाष गाडे हा भुमकर चौकाजवळ (Bhumkar Chowk), स्वामी नारायण मंदिर (Swami Narayan Mandir Pune) जवळ येथे थांबलेला आहे. सदर माहितीच्या अनुषंगाने परिमंडळ 3 चे पोलीस उप - आयुक्त सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma), सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (PI Abhay Mahajan), गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर (PI Jayant Rajurkar), सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम (API Sachin Nikam), पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी (PSI Ganesh Mokashi), आबा उत्तेकर (PSI Aaba Uttekar), सहायक पोलीस फौजदार संजय शिंदे (ASI Sanjay Shinde), विकास पांडुळे, विकास बांदल, देवा चव्हाण, सागर शेडगे, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, स्वप्नील मगर, दक्ष पाटील, अमोल पाटील, राजु वेंगरे, अविनाश कोंडे यांच्या पथकाने माहिती मिळालेल्या ठिकाणी चारही बाजूने एकाचवेळी घेराव करून, आकाश गाडे याला ताब्यात घेतला.

 

 

त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारता त्यांने त्याचे नाव आकाश सुभाष गाडे (वय 25 रा. रामनगर, राम मंदिर जवळ, माणिकबाग, सिंहगड रोड, पुणे) असे सांगितले. त्याचेकडे दाखल गुन्हयाबाबत अधिक तपास केला असता, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास दाखल गुन्ह्याचे तपास कामी अटक करण्यात आली. पुढील तपास सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे करत आहेत.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Sinhagad Road Police has succeeded in nabbing absconding accused Akash Subhash Gade in an action under the Maharashtra Control of Organized Crime Act (MCOCA). The gang has committed crimes in Sinhagad Road, Vadgaon, Dhayari, Hingane, Manikbagh, Dattawadi, Warje and Haveli areas.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.