Type Here to Get Search Results !

वारजे माळवाडी मधील हातभट्टीवाल्या अट्टल गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई; दगडू हाके यांचा जाता जाता दणका

 

MPDA Action taken by pune city police in warje malwadi criminal

पुणे, दि. 4 जुलै 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या (Warje Malwadi Police Station) हद्दीमध्ये तडीपारी सारखी गंभीर कारवाई झालेली असताना देखील, वारंवार गुन्हे करणारा हातभट्टी दारू (Hatbhatti Daru) व्यावसायिक, अट्टल गुन्हेगार (Warje Criminal) असलेल्या तरुणाविरुध्द एमपीडीए कायद्यान्वये कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह (Kolhapur Central Jail), येथे 1 वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत करण्यात आले आहेत. याबाबत तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके (Senior PI Dagadu Hake) आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे  (Crime PI Dattaram Bagwe) यांनी प्रस्ताव सादर केला होता, त्याला मंजुरी देण्यात आली असून, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Ritesh Kumar) यांची ही 21 वी स्थानबद्धतेची कारवाई आहे.

 

 

लखन मुन्ना बिरे (वय 26, रा. श्वेता हाईटस, वारजे जकात नाका, पुणे) (Lakhan Munna Bire) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोखंडी कोयता, चाकू यासारख्या जीवघेण्या हत्यारांसह जबरी चोरी, गंभीर दुखापत, दुखापत, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील 5 वर्षामध्ये त्याचेविरूध्द 5 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक कायदा सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.

 

 

या पार्श्वभूमीवर नमूद इसमास स्थानबध्द करण्याबाबत वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दगडू हाके आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक पीसीबी गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी प्रस्ताव व सह कागदपत्रांचे सादरीकरण केले होते. त्यानुसार प्राप्त कागदपत्रांची पडताळणी करुन पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी नमूद इसमाचे विरुध्द एमपीडीए कायद्यान्वये कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर येथे 1 वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत.

 

 

पोलीस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार यांनी शहरात दहशत निर्माण करणाऱ्या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले असून, पोलीस आयुक्तांनी कार्यभार स्विकारल्यानंतरची एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची ही 21 वी कारवाई असुन, यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार असल्याचे एका पत्रकाद्वारे सूचित करण्यात आले आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.