Type Here to Get Search Results !

पॉप्युलर - गिरीधर नगर सोसायटीच्या अध्यक्षपदी दैनिक सकाळच्या महादेव पवार यांची निवड

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Daily Sakal's Mahadev Pawar elected as President of Popular - Giridhar Nagar Society


 

पुणे, दि. 30 जुलै 2023 (चेकमेट टाईम्स): वारजेतील सर्वात मोठी सोसायटी (Biggest Society in Warje) असलेली पॉप्युलर गिरीधर नगर फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत (Popular Giridhar Nagar Federation Election) पहिल्यांदाच सर्व नवीन सदस्य निवडून आले आहेत. या 11 सदस्या मधून आज रविवार दि.30 जुलै 2023 निवडणूक निर्णय अधिकारी नितीन साळुंके (Nitin Salunke) यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटीच्या अध्यक्षपदी महादेव पवार (Mahadeo Pawar) यांची बिनविरोध निवड (Uncontested Choice) झाली.

 

 

यावेळी अध्यक्ष (President) पदासाठी महादेव पवार (Mahadev Pawar), सचिव (Secretary) पदासाठी संदीप पारखी (Sandeep Parkhi) व खजिनदार (Treasurer) पदासाठी रविद्र सुतार (Ravindra Sutar) यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली. तर महिला गटातून भावना पाटील (Bhavana Patil) आणि विजया डुंबरे (Vijaya Dumbare) यांची बिनविरोध सदस्य म्हणून निवड झाली होती. रविवार दि.23 जुलै 2023 रोजी झालेल्या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून संदीप पारखी, दिनेश भिलारे, रविंद्र सुतार, महादेव पवार, बाबुराव दोडके, विजय देसाई यांनी बाजी मारली होती. तर राखीव गटातून आशिष क्षिरसागर, संतोष ढाकणे व निळकंठ शिंदे यांनी आपआपल्या गटातून  निवडणूक जिंकली. त्यानंतर एक आठवड्याने आज अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली.

 

 

पॉप्युलर गिरीधर नगर फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवडून आलेले महादेव बाळू पवार हे दैनिक सकाळ (Daily News Paper Sakal) मध्ये वारजे प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. यापूर्वी त्यांनी दैनिक लोकमत (Daily News Paper Lokmat) आणि दैनिक पुढारी (Daily News Paper Pudhari) मध्ये वारजे प्रतिनिधी (Warje Reporter) म्हणून काम पाहिले आहे. तर मुळशी पत्रकार संघाचे (Mulshi Journalists Association) ते यापूर्वी उप-अध्यक्ष राहिले आहेत. शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेले महादेव पवार हे अर्थशास्त्राचे (Economics) उत्तम शिक्षक म्हणून देखील ओळखले जातात. त्यामुळे आगामी काळात सोसायटीच्या प्रगतीसाठी ते मोठी कामगिरी बजावतील असा विश्वास सोसायटी सदस्यांनी व्यक्त करताना, आनंद व्यक्त केला आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.