Type Here to Get Search Results !

या सामाजिक संस्थांनी राबवले कौतुकास्पद असे “स्वच्छ कोथरूड पोलीस स्टेशन अभियान”

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Swachh Kothrud Police Station Mission


 

पुणे, दि. 18 जुलै 2023 (चेकमेट टाईम्स): पोलीस स्टेशनचे स्वच्छतागृह असो की न्यायालयाचे (Police Station and Court Public Toilets), येथील स्वच्छतागृह ही स्वच्छतागृह आहेत की अ-स्वच्छतागृह (Dirty Toilets) असा प्रश्न नेहमीच पडतो. त्याला तेथील परिसर (Police Station and Court Premises) देखील अपवाद नसतो. यावर उपाय म्हणून प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती (Civil Security Action Committee), स्वयंसेवक पोलीस मित्र (Volunteer Police Friends), कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय (PMC Kothrud Bavdhan Ward Office) आणि कोथरूड पोलीस ठाणे (Kothrud Police Station) यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील “स्वच्छ कोथरूड पोलीस स्टेशन अभियान” (Swachh Kothrud Police Station Mission) राबवण्यात आले.

 

 

सर्वांनी स्वच्छतेची शपथ (Cleanliness Oath) घेऊन सुरू केलेल्या या अभियानात पोलीस स्टेशन परिसरातील सर्व कचरा, पालापाचोळा, राडारोडा, पुठ्ठा, प्लास्टिक अशा विविध प्रकारचा तब्बल दोन टेंपो कचरा (Garbage) गोळा करण्यात आला. यावेळी कोथरूड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Senior PI Hemant Patil), पोलीस उपनिरीक्षक बसवराज माळी (PSI Basavaraj Mali), समीर चव्हाण (PSI Samir Chavan) आणि कर्मचारीवर्ग उपस्थित होता. आरोग्य निरीक्षक लक्ष्मीकांत कुलकर्णी (SI Lakshmikant Kulkarni), विजय पाटील, संजय कांबळे, सचिन लोंढे आणि सफाई कामगार, स्वयंसेवक सुनिल सुतार, संदीप जाधव, राहुल जाधव, निवृत्ती सपकाळ, विकास यादव, मयुर सुर्वे, प्रवीण जोंधळे यांनी या अभियानात सहभाग नोंदवला. पोलीस मित्र संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष संदिप कुंबरे (Police Friends Association Pune City President Sandeep Kumbare) यांनी या अभियानाचे आयोजन केले होते.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.