Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 14 जुलै 2023 (चेकमेट टाईम्स): अलंकार पोलीस स्टेशनच्या (Alankar
Police Station) हद्दीत झालेल्या तब्बल 98 लाख 15 हजार रुपयांच्या
घरफोडीची (Burglery) उकल करण्यात अलंकार पोलीस स्टेशनच्या
तपास पथकाला (Detection Bureau) यश आले आहे. या घरफोडीच्या
गुन्ह्यातील जोडीला अटक (Thiefs Couple Arrested)
करण्याबरोबरच त्यांच्याकडून 79 लाख 84 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल रिकव्हर
(Diamond Gold and Silver Jewellery Recovered from thiefs) करून, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Ritesh Kumar) यांच्या हस्ते
मूळ मालकाला नुकताच सुपूर्द करण्यात आला. (Pune Crime
News)
दि. 27 नोव्हेंबर 2022 रोजी सदरील घटना घडली होती. यावेळी फिर्यादी यांचे
घरातील 98 लाख 15 हजार रुपये किमतीचे डायमंड व सोन्या - चांदीचे दागिने घरफोडी करून चोरी केलेबाबत अलंकार
पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दाखल गुन्ह्याच्या घटनास्थळाचे तांत्रिक
विश्लेषणाव्दारे (Technical Analysis) तपास चालू केला असता, अलंकार पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील (Detection Branch) पोलीस अंमलदार
धीरज पवार (Dheeraj Pawar), सागर केकाण (Sagar Kekan) व नितीन राऊत (Nitin Raut) यांना एक पुरुष व एक महिला संशईतरित्या घटनास्थळाच्या आजूबाजूला फिरताना आढळून
आले.
त्याआधारे आणखीन तपासणी केली असता. एका दुचाकीवरून एक पुरूष व एक महिला
त्या ठिकाणी आली असल्याचे दिसून आले. त्यावरून तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अमलदार
यांनी संशईत इसम राजु दुर्योधन काळमेघ (वय 45 वर्षे, रा. एन. बी. पर्ल सोसायटी, क्रांतीनगर, वडगाव बुद्रुक, पुणे) (Raju Duryodhan Kalmegh) यास ताब्यात घेतले. यानंतर त्याच्याकडे
दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता, त्याने सदरचा गुन्हा हा त्याची महिला साथीदार
सोनिया पाटील असे दोघांनी मिळून केला असल्याचे कबुल केले.
त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाचे आधारे माहिती मिळालेल्या सोनिया पाटील
या महिला आरोपीचा शोध घेणेकामी वेग-वेगळ्या ठिकाणी तपास पथके रवाना करण्यात आली
होती. त्यामध्ये पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगिता पाटील (Crime Pi Sangeeta Patil) यांचे
पथकाने आरोपी महिला सोनिया पाटील ही दाखल गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल घेवून पळून
जाण्याचे तयारीत असताना, वाकड (Wakad) या ठिकाणावरून ताब्यात
घेतले. यामध्ये सदरील महिलेचे पूर्ण नाव सोनिया श्रीराम पाटील (वय 32 वर्षे, रा. रा. एन. बी. पर्ल सोसायटी, क्रांतीनगर, वडगाव बुद्रुक, पुणे) (Sonia Shreeram Patil) हिस मुद्देमालासह अटक करण्यात आली.
दाखल गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल अटक आरोपी इसम व महिला यांचेकडून
हस्तगत करण्यात आल्यानंतर तो जप्ती पंचनाम्याने जप्त करून मुद्देमाल कक्षात जमा करण्यात
आला होता. सदरचा मुद्देमाल दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांना परत करणेबाबत न्यायालयाचे
आदेश प्राप्त झाल्यानंतर, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे हस्ते 79
लाख 84 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल फिर्यादी यांना परत करण्यात आला आहे. यावेळी परिमंडळ 3 चे पोलीस उप-आयुक्त
सुहेल शर्मा (IPS Suhail
Sharma), अलंकार पोलीस स्टेशनचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश तटकरे (Senior PI Rajesh Tatkare), पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगिता पाटील उपस्थित होते. यावेळी
कौतुकास्पद कामगिरी केलेल्या संगिता पाटील यांचा पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे हस्ते
पुष्पगुच्छ देवून सत्कार देखील करण्यात आला.
https://www.youtube.com/watch?v=vVLk2y5iTl8
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप
करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर
फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84