Type Here to Get Search Results !

वारजे माळवाडी मध्ये चोऱ्यांचे सत्र सुरूच, घरफोडी करून अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास; पोलिसांसमोर आव्हान

 Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
warje police station thiefs

पुणे, दि. 6 जुलै 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे पोलीस स्टेशन (Warje Police Station) हद्दीतील चोऱ्यांचे सत्र (Thieves Session) थांबण्याचे नाव घेत नसून, पुन्हा एकदा बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत, अज्ञात चोरट्यांनी घरातील रोख रकमेसह मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला. याबाबत वारजे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्र कटरे (वय.36 रा. पाण्याच्या टाकीजवळ, सहयोग नगर पठार, वारजे माळवाडी, पुणे) (Ramchandra Katare, Sahayog Nagar Pathar, Warje Malwadi, Pune) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. कटरे यांचे घर सोमवार दि. 3 जुलै 2023 रोजी रात्री साडे नऊ वाजलेपासून मंगळवार दि. 4 जुलै 2023 रोजी सकाळी साडेसात वाजेपर्यंत, कुलूप लावून बंद असताना, अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप कशाचेतरी सहाय्याने उचकटून, घरात प्रवेश करत, बेडरूम मधील कपाटात ठेवलेले 1 लाख 39 हजार 900 रुपये रोख आणि सोन्या चांदीचे दागिने असा 2 लाख 39 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल घरफोडी करून, चोरून नेला. तपास पोलीस उपनिरीक्षक तृप्ती पाटील (PSI Trupti Patil) करत आहेत.

 

 

काही दिवसांपूर्वीच शकील रज्जाक शेख (वय 34, साईराज कॉलनी, गोकुळनगर पठार, वारजे) (Shakil Rajjak Shaikh, Gokulnagar Pathar, Warje Malwadi, Pune) यांचे राहते घर कुलूप बंद असताना, अज्ञात चोरट्यांनी घरातील 1 लाख 27 हजारांचा ऐवज चोरी करून नेला होता. त्याचबरोबर पुखराज ओमाराम चौधरी (34, रा. वारजे माळवाडी) यांचे रामनगर (Pukharaj Osaram Choudhari, Ramnagar, Warje, Pune) येथील किराणा मालाचे (Grossery Shop) दुकान फोडून 38 हजारांची रोकड आणि 5 हजारांची विविध कंपनीची सिगारेटची पाकिटे चोरट्यांनी चोरून नेली होती. तर याच सहयोगनगर पठार भागातील रणजीत सहानी (वय. 54 वर्ष) (Ranajit Sahani) यांचे घरातील 1 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे लंपास झाले होते. तसेच गोकुळनगर पठारावरील भोंदू नारायण करंदोळकर (वय.56) (Bhondu Narayan Karandolkar) यांच्याही घरी चोरट्यांनी हात साफ करत 55 हजार रुपयांची लुट केली होती.

 

 

एकूणच पठार भागात एका मागे एक घडलेल्या घरफोड्यांच्या घटनांमुळे भागात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिक आपल्या ऐवजाप्रती चिंतीत असल्याचे दिसते. त्यासाठी या भागातील रात्रीची पोलीस गस्त वाढवावी अशा प्रकारची मागणी या भागातील नागरिकांकडून व्यक्त केली जाऊ लागली आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.