Type Here to Get Search Results !

भुगाव येथे बाह्यवळण रस्ता तर घोटावडे फाटा येथे उड्डाणपुलाची सुळेंची केंद्राकडे मागणी

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news

supriyas sule on bhugaon ghotawade fata paud traffic


 

पुणे, दि. 18 जुलै 2023 (चेकमेट टाईम्स): मुळशी (Mulshi) तालुक्यातील भूगाव येथे रस्ता रुंदीकरणास (Bhugaon Road Winding) वाव नसल्याने बाह्यवळण रस्ता (Bhugaon Bypass) केल्यास वाहतूक कोंडी (Bhugaon Traffic Jam) टाळता येईल. ही बाब लक्षात घेऊन याठिकाणी बाह्यवळण रस्ता करावा. तसेच घोटावडे फाटा येथे उड्डाणपूल (Fly Over for Ghotawade Phata) उभारावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केली आहे.

 

 

केंद्रीय केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Central Minister of Roads and Highways Nitin Gadkari) यांच्याकडे सुळे यांनी पत्राद्वारे ही मागणी केली असून, तसे ट्वीटही (Supriya Sule Tweet) केले आहे. भूगाव व घोटावडे फाटा येथून पुणे ते कोलाड हा राष्ट्रीय महामार्ग (Pune Kolad State Highway) जातो. येथील भूगाव या ठिकाणी मंदिर व गावठाण असल्याने रस्त्याच्या रुंदीकरणास वाव नाही. त्यामुळे या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. भूगाव येथे बाह्यवळण रस्ता केल्यास वाहतूक कोंडी टाळता येईल, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

 

 

त्याचबरोबर घोटावडे फाटा या ठिकाणी रीहे खोरे (Rihe Mulshi), मुठा खोरे (Mutha), धरण भागातून (पौड) (Pune Paud) तसेच पुण्याकडून येणारी वाहने यामुळे चौफुला तयार होत आहे. येथे उड्डाणपूल केल्यास वाहतूक कोंडी टाळता येणे शक्य आहे. यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. तरी यासंदर्भात सकारात्मक विचार करुन निर्णय घ्यावा, असे सुळे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.