Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादीच्या कोथरूड विधानसभा मतदार संघाची जबाबदारी पुन्हा स्वप्नील दुधाने यांच्या खांद्यावर

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


swapnil dudhane elected as kothrud vidhansabha president of ncp

पुणे, दि. 13 जुलै 2023 (चेकमेट टाईम्स): महानगरपालिका निवडणुक (Pune Municipal Elections 2022) च्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर 2021 मध्ये शहर राष्ट्रवादी (NCP Pune) मध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर कोथरूड विधानसभा मतदार संघाचे (Kothrud Vidhansabha) तत्कालीन अध्यक्ष स्वप्नील दुधाने (Swapnil Dudhane) यांना शहरावर उपाध्यक्षपदी बढती (Promoted to Pune City DyPresident) देण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा स्वप्नील दुधाने यांच्या खांद्यावर कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या मजबुतीकरणाचे काम देण्यात आले असून, त्यांची नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरद पवार गट) (NCP Sharad Pawar Gat) कोथरूड विधानसभा अध्यक्षपदी, शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap), खासदार वंदना चव्हाण (MP Vandana Chavan) यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन, नियुक्ती करण्यात आली.

 

 

याबाबत बोलताना स्वप्नील दुधाने म्हणाले की, गेल्या दहा ते बारा वर्षांपासून समाजसेवेचे व्रत अंगिकारलेले असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध विकासकामे करण्याचा योग आला. आजवरच्या या प्रवासात कोणत्याही पदाची अपेक्षा न करता एक सच्चा कार्यकर्ता आणि समाजाचा सेवक म्हणून कार्य करण्याची संधी प्राप्त झाली. या काळात शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), अजित पवार (Ajit Pawar), वंदना चव्हाण, प्रशांत जगताप, अंकुश काकडे (Ankush Kakade) आणि माझ्या मातोश्री नगरसेविका लक्ष्मी दुधाने (Laxmi Dudhane) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची आणि अनेक गोष्टी शिकण्याची सुवर्णसंधी मिळाली. या ज्येष्ठ नेतृत्वाखाली अनेक विकासकामांना आकार देता आल्याचे स्वप्नील दुधाने यांनी म्हटले आहे.

 

 

तर उपमुख्यमंत्री अजित पवार गटात न जाता शरद पवार गट स्वीकारण्याचे कारण काय? याबाबत स्वप्नील दुधाने यांना विचारले असता, ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्यात झालेल्या राजकिय भूकंपामुळे (Political Crises in Maharashtra) अवघे राज्य हादरले असताना, आमची भूमिका स्पष्ट करणे क्रमप्राप्त होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आमचे निस्सीम प्रेम आहे आणि ते आताही तसूभरही कमी झालेले नाही, किंवा भविष्यातही होणार नाही. मात्र ज्या पवार साहेबांच्या नावाच्या छताखाली आम्ही सारे एकत्र आलो, त्या साहेबांबद्दल मनात असणारा आदरही तितकाच अधिक आहे आणि हेच कारण होते, ज्या संघटनेने आम्हाला मोठे केले, प्रेम दिले, त्या संघटनेच्या सोबत, राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहण्याचे.

 

 

तर आजवर ज्या निष्ठेने आणि निस्वार्थी भावनेने एक कार्यकर्ता म्हणून समाजकार्य आणि पक्षाचे हित सांभाळण्याचे काम करत आलो, तीच धडाडी पुढेही सुरू ठेवण्यासाठी वचनबद्ध असल्याचे दुधाने यांनी म्हटले आहे. दुधाने यांची ओळख वंदना चव्हाण यांच्या निसर्गप्रेमी (Nature Lover) गटाचा कार्यकर्ता म्हणून देखील आहे. त्यामुळे वंदना चव्हाण जिथे, स्वप्नील दुधाने तिथे असे समीकरण जुळले असावे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.