Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 12 जुलै 2023 (चेकमेट टाईम्स): कन्स्ट्रक्शन कामात वापरल्या जाणाऱ्या सेंट्रिंग
प्लेटांची चोरी (Centring Plates Theft) करून पळून
जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला पकडण्यात उत्तमनगर पोलिसांना यश आले आहे.
एखाद्या चित्रपटात शोभेल असा हुबेहूब प्रसंग (Filmy Seen)
उद्भवलेल्या या चोरीच्या घटनेत 25 हजार रुपये किमतीच्या 45 सेंट्रिंग प्लेटांसह, टेंपो
आणि तीन चोरट्यांना (Caught Thiefs) ताब्यात घेऊन
त्यांच्यावर उत्तमनगर पोलीस स्टेशन (FIR in Uttam Nagar Police) मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
याबाबत उत्तमनगर पोलिसांनी दिलेल्या
माहितीनुसार, आज बुधवार दि.12 जुलै 2023 रोजी पहाटे 1 च्या सुमारास, मांडवी खुर्द (Mandvi) येथील, ऐरावत हॉटेल
(Airawat Hotel) समोर असणाऱ्या शेतामधील मोकळया जागेत सेंट्रींगच्या
लोखंडी प्लेटा ठेवण्यात आल्या होत्या. त्यातील 25 हजार रुपये किंमतीच्या एकूण 45 लोखंडी
प्लेटा तीन चोरट्यांनी संगनमत करून GJ 15 AV 4706
क्रमांकाच्या टेंपो मधून चोरी करून घेऊन जात होते. यावेळी काही ग्रामस्थांना
त्याची चाहूल लागली. त्यांनी तत्काळ गोळा होत, या टेंपोचा पाठलाग सुरु केला. मात्र
टेंपो काही केल्या थांबत नव्हता. यावेळी ग्रामस्थांनी तत्काळ उत्तमनगर पोलीस
स्टेशनला संपर्क साधून याबाबत माहिती दिली.
त्यानंतर उत्तमनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ
पोलीस निरीक्षक किरण बालवडकर (Senior PI Kiran Balwadkar), पोलीस
निरीक्षक (गुन्हे) शबनम शेख (Crime PI Shabnam Shaikh)
यांच्या मार्गदर्शनाखाली, उत्तमनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे
पवार (API Dadaraje Pawar), सहायक पोलीस फौजदार प्रसाद जोशी (ASI Prasad Joshi),
आनंद घोलप (Anand Gholap), दत्तात्रय मालुसरे (Dattatray Malusare),
शाहू भोस (Shahu Bhos), अजित शेडगे (Ajit Shedge) व संभाजीराजे कोंढावळे (Sambhajiraje
Kondhavale) यांच्या पथकाने प्रसंगाचे गांभीर्य ओळखून अहिरे गेट (Ahire Gate) येथे साचेबद्ध नाकाबंदी केली. यात भरधाव वेगात आलेल्या टेंपो’सह तीनही
चोरट्यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात यश आले आहे.
दरम्यान, एक दिवस अगोदर मंगळवार दि.11
जुलै 2023 रोजी पहाटे 3 च्या सुमारास, मांडवी खुर्द येथीलच, शंकर भाऊसाहेब तनपुरे (Shankar Bhausaheb Tanpure)
यांच्या मालकीच्या 35 लोखंडी सेंट्रिंग प्लेट्स चोरीला गेल्या होत्या. त्याचे
सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCTV Footage) दिसलेला तोच टेंपो
धाडस करून दुसऱ्या दिवशी पुन्हा या भागात आला, त्यातील चोरट्यांनी प्लेट्स टेंपो
मध्ये भरल्या आणि पळ काढला. मात्र एकामागे एक होत असलेल्या चोरीच्या घटनांच्या
पार्श्वभूमीवर ग्रामस्थ सावध होते आणि त्यातूनच पुन्हा तोच टेंपो दिसल्याने या
टेंपोचा पाठलाग झाला. मात्र तो काही केल्या थांबत नव्हता. तर या टेंपोचा पाठलाग करून,
टेंपो थांबवण्याचा प्रयत्न करत असलेल्या पल्सर मोटारसायकलला ‘न्याती’ (Nyati
NDA Road) जवळ असलेल्या धुमाळ तळी (Dhumal Tali) भागात चोरट्यांच्या टेम्पोने धडक दिली. यामध्ये निखील तनपुरे (Nikhil
Tanpure) हा तरुण जखमी झाला आहे.
याबाबत अंकुश सखाराम तनपुरे (वय 26, रा. मांडवी खुर्द, ता.
हवेली, जि. पुणे) (Ankush
Sakharam Tanpure) यांनी उत्तमनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली
असून, ऋषिकेश उत्तम लोंढे
(वय 24, रा. जिल्हा परिषद शाळेजवळ, खडकवाडी, ता. हवेली, जि. पुणे) (Rishikesh Uttam Londhe), आतिश बलदेव
कोरी (वय 21, रा. गोकुळधाम बिल्डींग, वी 21, चिखली घरकुल, पुणे) (Atish
Baldev Kori) आणि संजय संतोष चव्हाण (वय 32, रा. जयहिंद कॉलनी, रहाटणी
बस स्टॉप जवळ, रहाटणी, पुणे) (Sanjay Santosh Chavan) असे
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना शुक्रवार दि. 14 जुलै 2023
पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली असून, त्यांच्याकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस
येण्याची खात्री वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी
वर्तवली आहे. गुन्ह्याचा पुढील
तपास सहायक पोलीस निरीक्षक अमृता चौरे (API Amruta Chaure) करित आहेत.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप
करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर
फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84