Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 20 जुलै 2023
(चेकमेट टाईम्स): कोथरूड (Kothrud) मधून दोन दहशतवाद्यांना
ताब्यात (Most Wanted Terrorist Arrested in Kothrud Pune)
घेतल्याची घटना ताजी असतानाच, आज सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान एनडीए कमांड
हॉस्पिटल (NDA Command Hospital Pune) आणि अहमदनगर (Ahmednagar) मध्ये तीन जण बॉम्बस्फोट (Bomb Blast) घडवणार
असल्याचा कॉल “डायल 112” वर आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळताच
उत्तमनगर पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे (Uttam Nagar Police Investigation) फिरवली. यामध्ये तो बनावट कॉल (Fake Call) असून,
काही नातेवाईकांवर सूड उगवण्यासाठी (Revenge on Relatives)
केला असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीस यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला.
दरम्यान त्या कॉल करणाऱ्याला उत्तमनगर पोलिसांनी एक तासाच्या आत ताब्यात घेण्यात
यश मिळवले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या
माहितीनुसार, आज गुरुवार दि. 20 जुलै 2023 सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान
पोलिसांच्या “डायल 112” या पोलीस मदत कक्षास एकाने फोन करून, तीन जण एनडीए कमांड
हॉस्पिटल आणि अहमदनगर मध्ये बॉम्बस्फोट करणार असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर
त्या तीन जणांची नावे आणि मोबाईल क्रमांक देऊन, त्या व्यक्तीने फोन कट केला.
यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाने याबाबत तत्काळ उत्तमनगर पोलीस स्टेशनशी संपर्क
करून, एनडीएच्या सुरक्षेबाबत (NDA Security) कळवत, कॉल
करणाऱ्याने दिलेली माहिती पुरवली.
यावरून पुणे शहर पोलीस दलाच्या
परिमंडळ 3 चे पोलीस उप-आयुक्त सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma),
कोथरूड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे (ACP Bhimrao Tele) यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर (Senior
PI Kiran Balwadkar), पोलीस निरीक्षक (गुन्हे) शबनम शेख (Crime
PI Shabnam Shaikh), सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार (API
Dadaraje Pawar), उमेश रोकडे (API Umesh Rokade), सहायक पोलीस फौजदार प्रसाद जोशी (ASI
Prasad Joshi), किरण देशमुख (Kiran Deshmukh),
संग्राम केंद्रे (Sangram Kendre), तानाजी नांगरे (Tanaji
Nangare), दत्तात्रय मालुसरे (Dattatray
Malusare), संभाजीराजे कोंढावळे (Sambhajiraje
Kondhavale), विनोद शिंदे (Vinod Shinde),
तुषार किंद्रे (Tushar Kindre) यांच्या पथकाने
प्रसंगाचे गांभीर्य ओळखून निरनिराळ्या टीम तयार करून तपास करत, कॉल करणाऱ्याला
ताब्यात घेतले.
त्या बॉम्बस्फोट करणार असलेल्या
व्यक्तींचे नाव आणि क्रमांकावर उत्तमनगर पोलिसांनी संपर्क साधल्यानंतर एका महिलेने
सदरील फोन कॉल उचलला. यावेळी पोलिसांना ज्या नंबर वरून कॉल आला, तो नंबर सांगून,
तो कोणाचा आहे याची माहिती घेतली असता, सदरील महिलेने तिच्या पतीचा तो क्रमांक
असून, तो उत्तमनगर मध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना दिली. यामध्ये मिळालेल्या
पत्त्यावर पोलिसांनी धाव घेत, दारूच्या नशेत झोपलेल्या अवस्थेत अमोल महादेव वाघ (वय.33
सध्या रा. जुनी स्मशानभूमी, इंदिरा वसाहत, उत्तमनगर, पुणे, मूळ राहणार – कोरेगाव,
तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर) (Amol Mahadeo Wagh) याला ताब्यात
घेऊन, उत्तमनगर पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली असता, त्याने सदरील कॉल त्याचे
वडील (Father), सासरा (Father in Law)
आणि मेव्हण्याचा (Brother in Law) बदला घेण्यासाठी केल्याचे
प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
अमोल वाघ हा टेंपो चालक (Tempo Driver) असून, त्याने त्याचा मालक “मोदी” यांच्या मोबाईलवरून “डायल 112” ला कॉल
लावला होता. त्यामुळे ‘मोदी’ यांच्या नावावर रजिस्टर असलेल्या मोबाईल वरून कॉल
गेल्याने त्यांनाही पोलिसांच्या तपासाला सामोरे जावे लागले. तर त्याचे वडील त्याला
संपत्ती मध्ये हिस्सा देत नाहीत. सासरे आणि मेव्हणा पत्नीला नांदायला पाठवत नाहीत.
सगळे एक झालेत आणि याला मात्र किंमत देत नाहीत. या गोष्टीचा सूड उगवण्यासाठी त्या
तिघांची नावे आणि नंबर सांगून वाघ याने “डायल 112” ला कॉल लावला होता. मात्र
पोलिसांनी केलेल्या तपासात त्याचा बनावटपणा उघडं होऊन, आता त्या कायदेशीरला
कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
वारजे मधून मुख्यमंत्र्यांना
उडवण्याची देण्यात आली होती धमकी
मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath
Shinde) यांना उडवणार आहे, असे म्हणून एकाने सोमवार
दि. 10 एप्रिल 2023 रोजी रात्री 112
या हेल्पलाईनवर कॉल करून धमकी दिली होती. यावेळी देखील पुण्यात प्रचंड खळबळ उडाली होती. यावेळी पोलिसांनी (Pune
Police) युध्दपातळीवर तपास करून आरोपीला वारजे मधून ताब्यात घेतले
होते. त्याला आता तीन महिने उलटत नाहीत, तोच आता आणखीन एक घटना समोर आली आहे.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप
करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर
फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes