Type Here to Get Search Results !

वारजे पोलीस स्टेशनवर झाड पडले; पोलिसांसह महावितरणचे कर्मचारी थोडक्यात बचावले

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


tree fall on warje police station and msedcl office warje


 

पुणे, दि. 17 जुलै 2023 (चेकमेट टाईम्स): पावसामुळे जमीन भुसभुशीत होऊन शहरातील काही झाडं पडण्याच्या (Tree Fall) घटना घडत आहेत. त्याखाली चिरडून काहीवेळा गाड्यांचे नुकसान होते आहे. तर काहीवेळा मनुष्यहानी देखील होते. असाच एक प्रसंग वारजे (Warje) मध्ये घडला आणि त्यातून पोलीस (Warje Police Staff) आणि महावितरण कर्मचारी (Warje MSEDCL Staff) थोडक्यात बचावले. यावेळी शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ (Baba Dhumal) यांनी तत्काळ अग्निशमन दल (Fire Brigade), उद्यान विभागासह (PMC Garden Department) घटनास्थळी धाव घेत, झाड बाजूला केले.

 

 

शुक्रवार दि. 14 जुलै 2023 दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास वारजे पोलीस स्टेशन मागे ही घटना घडली. यामध्ये पोलीस स्टेशन मागे ‘मोहगणी’ (Mohagani Tree) जातीची काही झाडे आहेत. त्यातील एका झाडाची मुळे सैल होऊन, झाडं मुळातूनच एका अंगावर कलंडले. ते एका बाजूला जात असताना, थेट पोलीस स्टेशनच्या (Warje Police Station) वरील भागावर कोसळत असल्याचे पाहून पोलीस नाईक गोविंद फड (Police Naik Govind Fad) यांनी तत्काळ पोलीस स्टेशनच्या वरच्या भागात धाव घेऊन, काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना धोक्याचा इशारा देत, तत्काळ खाली घेऊन आले. त्याचवेळी महावितरणचे कर्मचारी संतोष अंबाड (Santosh Ambad) यांनी देखील महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. पण सुदैवाने वादळी वारे नसल्याने हे झाड पोलीस स्टेशनच्या पत्र्यावर सावकाश टेकले, अन्यथा मोठे नुकसान झाले असते.

 

 

याबाबत माहिती मिळताच शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्षांनी अग्निशमन दल आणि उद्यान विभागा’सह घटनास्थळी धाव घेत, तत्काळ हे झाड व्यवस्थित कापून खाली उतरवले. त्यामुळे नंतर होणारे संभाव्य नुकसान देखील टळले. यामध्ये कोणाकडूनही काही क्षणांचा विलंब झाला असता आणि झाड वेगाने कोसळले असते, तर जीवित आणि वित्तहानी झाली असती. या पार्श्वभूमीवर उद्यान विभागाने अशा पद्धतीने कोणती झाडे कोसळू शकतात याचे सर्वेक्षण करून, तत्काळ अशी झाडे वेळीच (Precautionary Tree Cutting in Rainy Season) छाटून घ्यावीत अशी मागणी पुढे आली आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.