Type Here to Get Search Results !

वारजे मार्शलच्या सोशल मिडीयावरील हातखंड्याने महिलेला मिळाले घर

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


warje police team of amol sutkar _ vitthal shinde _ dnyaneshwar mane _ santosh nangre


 

पुणे, दि. 26 जुलै 2023 (चेकमेट टाईम्स): सोशल मिडियाचे फायदा तोटा (Loss & Profit of Social Media) जो जसा वापर करेल तसा होताना दिसतो. या सोशल मिडियाचा वापर आता पोलीस तपासात करताना दिसतात (Social Media usage in Police Investigation). त्याचे आणखीन एक उत्तम उदाहरण वारजे (Warje) मधून समोर आले असून, वारजे मार्शलने (Warje Police Patroling Marshall) एका रस्ता चुकलेल्या आणि घरचा पत्ता न सांगता येणाऱ्या आज्जीला तिच्या घरी पोचवण्यात सोशल मीडियाची मदत घेतली आणि तिला तिच्या घरी पोचवण्यात यश आले आहे.

 

 

वारजे पोलीस स्टेशनचे (Warje Police Station) पेट्रोलिंग मार्शल अमोल सुतकर (Amol Sutkar) आणि ज्ञानेश्वर माने (Dnyaneshwar Mane) हे हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना मध्यरात्रीच्या (Midnight Patroling of Pune Police) वेळी एक आज्जी गोंधळलेल्या अवस्थेत रस्त्याने फिरताना आढळल्या. यावेळी सुतकर आणि माने यांनी त्या आज्जींकडे आपुलकीने एवढ्या रात्री रस्त्यावर फिरण्याचे कारण, राहत असलेल्या घराचा पत्ता, इतर माहिती विचारली असता, त्यांना ती सांगता येत नव्हती. यावेळी आज्जींना स्मृतिभ्रंश (Dementia) झाला असावा आणि पावसाची रात्र, रस्त्यावर पडलेली थंडी (Rainy Cold Season) अशा वातावरणात आजींच्या आरोग्याची काळजी म्हणून सुतकर आणि माने यांनी क्षणाचाही विलंब न लावता, त्यांना वारजे पोलीस स्टेशन येथे आणून आसरा (Shelter) देण्याचे काम केले.

 

 

एवढ्यावर थांबतील ते पोलीस कसले, त्या आज्जींना त्यांच्या घरी पोचवण्यासाठी वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापुरकर (PI Sunil Jaitapurkar), गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी (PI Ajay Kulkarni) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विठ्ठल शिंदे (Vitthal Shinde), पोलीस नाईक संतोष नांगरे (Santosh Nangre), पोलीस शिपाई अमोल सुतकर, ज्ञानेश्वर माने, योगेश वाघ (Yogesh Wagh) यांच्यासह वारजे पोलीस स्टेशनची यंत्रणा कामाला लागली. हद्दीत आणि आजूबाजूच्या कोणत्या चौकीला मिसिंग दाखल झाली आहे का याची माहिती घेतली गेली. पण कुठेही धागेदोरे मिळत नव्हते.

 

 

यावेळी पोलीस शिपाई अमोल सुतकर यांनी त्या आजींचा फोटो काढून, सोशल मिडिया स्टेटस आणि ग्रुपवर (Social Media Status and Groups) शेअर केला. वेळ मध्यरात्रीची होती आणि सगळे गाढ झोपेत होते, त्यामुळे सोशल मिडीयावरून देखील लवकर प्रतिसाद मिळाला नाही. मात्र सकाळच्या सूर्याच्या उगवत्या किरणांबरोबर सुतकर यांना त्यांच्या संपर्कातील एकाने फोन करून आज्जीला ओळखत असून, घर माहित असल्याचे सांगितले. झालं लागली पुन्हा टीम कामाला, ज्या तरुणाने माहिती दिली, त्याला पाचारण करत, तत्काळ त्या आजीला कर्वेनगर मधील वडार वस्ती (Vadar Vasti Karvenagar) मध्ये असलेल्या तिच्या घरी पोचवण्यात आले. रस्ता चुकलेल्या या आज्जींचे नाव वैजयंती तुळशीराम बनसोडे (Vaijayanti Tulshiram Bansode) असून, त्यांचा मुलगा विश्वास तुळशीराम बनसोडे (वय 38 रा. साईबाबा मंदिर, वडार वस्ती, कर्वेनगर, पुणे) (Vishwas Tulshiram Bansode) यांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले. यापूर्वीही गस्तीवर असताना अमोल सुतकर यांनी वाट चुकलेल्या अनेकांना आपापल्या घरी पोचवण्याचे काम केले आहे. त्यामुळे अमोल सुतकर यांच्यासह वारजे पोलिसांच्या या टीमवर कौतुकाचा वर्षाव (Shower of Praise) होत आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.