Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 13 जुलै 2023
(चेकमेट टाईम्स): पती पत्नीच्या भांडणाला वैतागून, पत्नीने पती गाढ झोपेत असताना,
त्याचा काटा काढण्याचा डाव आखून, त्याच्या अंगावर उकळते पाणी टाकून (Boiled
Water Thrown on Body), त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Wife
Attempt to Kill Husband) केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील शिवणे
(Shivane Pune) भागातून समोर आली आहे. यामध्ये पती गंभीर जखमी
(Seriously Injured) झाला असून, त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार
सुरु आहेत. याबाबत वारजे पोलीस स्टेशन (Warje Police Station) मध्ये पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिला अटक करण्यात आली
आहे. (Pune Crime News)
याबाबत वारजे पोलिसांनी दिलेल्या
माहितीनुसार, 12 वर्षांपूर्वी विवाह झालेले हे भाजी विक्रेते (Vegetable Seller) असलेले पती पत्नी शिवणे मधील दांगट इस्टेट (Dangat Estate) मध्ये असलेल्या आदित्य हॉटेल (Aditya Hotel) जवळील काजल
हाईटस (Kajal Heights) मध्ये राहतात. तर या महिलेच्या पतीने
पत्नीच्या भावाला व्यवसायासाठी हात उसने (Loan without Interest) म्हणून 2 लाख 40 हजार रुपये दिलेले होते. मात्र अनेक दिवस होऊन देखील आणि
वारंवार मागून देखील मेहुणा पैसे परत देत नव्हता. यावरून पती पत्नीमध्ये किरकोळ
बाचाबाची होत होती. याला कंटाळून पत्नीने आज गुरुवार दि.13 जुलै 2023 पहाटे
साडेतीनच्या सुमारास कळशी मध्ये पाणी उकळून, गाढ झोपेत (Deep Sleep) असलेल्या पतीच्या अंगावर टाकून, त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान या उकळत्या पाण्याने पती 30
ते 35 टक्के भाजला असून, त्याच्यावर शिवणे मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत माहिती मिळताच वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापुरकर (Senior PI
Sunil Jaitapurkar), पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय कुलकर्णी (Crime
PI Ajay Kulkarni), सहायक पोलीस निरीक्षक बापू रायकर (API
Bapu Raikar) यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत, सदरील महिलेला
ताब्यात घेतले असून, कविता महादेव जाधव (वय 28, रा. काजल हाईटस, जे. एस.
एन्टरप्राईजेस शेजारी, आदित्य हॉटेल जवळ, शिवणे, पुणे) (Kavita Mahadeo
Jadhav) असे त्या हल्लेखोर महिलेचे नाव आहे. तर महादेव अर्जुन जाधव (वय
30) (Mahadeo Arjun Jadhav)) असे जखमी पतीचे नाव आहे. सहायक
पोलीस निरीक्षक रमेश बाबर (API Ramesh Babar) पुढील तपास करत
आहेत.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप
करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर
फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84