पुणे, दि. 5 जुलै 2023 (चेकमेट टाईम्स): सिंहगड रोड पोलीस ठाणे (Sinhgad Road Police Station) परिसरात
दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर (Criminal) पुणे शहर पोलीस
आयुक्त रितेश कुमार (Pune CP Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई
केली. आयुक्त रितेश कुमार यांची ही 23 वी कारवाई आहे.
पुणे शहरातील सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल
गुन्हेगार नामे महेश उर्फ दाद्या
उर्फ रोहित कुंडलिक मोरे (वय 21 वर्षे, रा. वडगावचा राजा
गणपती मंदिरामागे, वडगाव, पुणे) (Mahesh alias Dadya alias Rohit Kundalik More) हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह सिंहगड
रोड पोलीस स्टेशनच्या
हद्दीत चाकू, कोयता, सुरा या सारख्या जीवघेण्या हत्यारांसह
खुनाचा प्रयत्न, सरकारी नोकरावर हल्ला, जबरी चोरी, दुखापत दंगा बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे (Crimes of a serious nature) केले
आहेत.
मागील 5 वर्षामध्ये महेश उर्फ दाद्या उर्फ रोहित मोरे याच्यावर 3 गुन्हे
दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस (Law And Order on Sinhgad Road)
बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल
या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते. या पार्श्वभूमीवर प्राप्त प्रस्ताव
व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी नमुद इसमाचे विरुध्द
एमपीडीए कायद्यान्वये अमरावती मध्यवर्ती कारागृह (Amravati Central Jail), अमरावती येथे 1 वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत
केले आहेत.
नमूद इसमास स्थानबध्द करण्यामध्ये सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस
निरीक्षक अभय महाजन (Senior PI
Abhay Mahajan), पी.सी.बी. गुन्हे
शाखा पुणे शहरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (PCB Crime PI Vaishali Chandgude) यांनी याबाबत प्रस्ताव सादर केला होता.
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दहशत निर्माण करणाऱ्या व सक्रिय अट्टल
गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. पोलीस आयुक्त यांनी
कार्यभार स्विकारल्यानंतरची एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची ही 23 वी कारवाई असुन, यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे
कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप
करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर
फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84