Type Here to Get Search Results !

पपुल्या वाघमारे टोळीविरूध्द आणखीन एक मोक्का; मोक्काच्या हॅट्रीकचे रेकॉर्ड | Pune MCOCA News

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Another MCOCA against Papulya Waghmare Gang in Sahakar Nagar Police Station; MCOCA's hat-trick record on this gang


 

पुणे, दि. 13 ऑगस्ट 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्यातील कर्वेनगर (Karve Nagar Pune) आणि त्यानंतर सहकारनगर (Sahakar Nagar Pune) मध्ये मोठ्या प्रमाणात गाड्यांची तोडफोड (Vehicles Vandalism) करून, दहशत माजवणाऱ्या दिग्विजय ऊर्फ पपुल्या वाघमारे (Digvijay alias Papulya Waghmare) याच्यासह 9 जणांविरुद्ध आणखीन एक मोक्का (MCOCA Pune) कारवाई करण्यात आली आहे. पपुल्या वाघमारे टोळीवर टाकण्यात आलेली ही तिसरी मोक्का कारवाई असून, या टोळीचे मोक्का कारवाईचे हॅट्रीक रेकॉर्ड (Hat Trick of MCOCA) झाले आहे.

 

independence day lights show of tricolour in pune by anita tukaram ingale NDA Road




 

सोमवार दि. 19 जून 2023 रोजी फिर्यादी हे त्यांचा टेम्पो राहते घराचे बाहेर सार्वजनीक रोडवर पार्क करुन घरी जावुन रात्री जेवण करुन झोपले असताना, मंगळवार दि. 20 जून 2023 रोजी फिर्यादींचे घराचे बाहेर मोठ-मोठयाने आवाज ऐकु आल्याने फिर्यादी हे बाहेर येवुन पाहता, सात ते आठ अनोळखी इसम वसाहतीचे बाहेर रोडवर पार्क केलेल्या गाडयांच्या काचा त्यांचे हातातील लोखंडी हत्यार (Weapons) व दगडाने फोडताना दिसले. त्यावेळी गाडया फोडणाऱ्या इसमांना विचारता, त्यातील एका इसमाने त्यांचे हातातील लोखंडी हत्यार फिर्यादीना दाखवुन, जवळ याल तर याद राखा. पुढे येणाराला संपवुन टाकु, असे म्हणुन त्यांच्या हातातील हत्याराने दहशत निर्माण करून तेथे रस्त्यावर पार्क (Roadside Parking) केलेल्या एकुण 26 गाड्यांच्या काचा फोडुन नुकसान केल्याने फिर्यादींना दिसले. त्याबाबत फिर्यादी यांनी सहकारनगर पोलीस स्टेशन (Sahakar Nagar Police Station) येथे फिर्याद दिली होती.

 

 

यामधील आरोपी असलेल्या 1) टोळी प्रमुख दिग्विजय ऊर्फ पपुल्या तुकाराम वाघमारे (वय 20 वर्षे, रा. बराटे चाळ, दत्तनगर, रामनगर, वारजे, पुणे) (Gang Leader Digvijay alias Papulya Tukaram Waghmare) 2) कमल चक्रबहादुर साह (वय 19 वर्षे, रा. गल्ली नं.2, चव्हाण नगर, धनकवडी, पुणे) (Kamal Chakra Bahadur Sah) 3) भगवान धाकलू खरात (वय 20 वर्षे, रा. लेन नं. 10, श्रमिक वसाहत, कर्वेनगर, पुणे) (Bhagwan Dhaklu Kharat) 4) लिग्गाप्पा ऊर्फ नितीन सुरेश गडदे (वय 20 वर्षे, रा. वडारवस्ती, कर्वेनगर पुणे) (Liggappa alias Nitin Suresh Gadade) 5) देविदास बसवराज कोळी (वय 19 वर्षे, रा. घर नं.38, लेन नं.3, कॅनॉल रोड, कर्वेनगर, पुणे) (Devidas Basavaraj Koli) यांना दाखल गुन्ह्यात अटक (Arrest) करण्यात आली असुन 2 विधीसंघर्षीत बालक (Juvenile Criminals) यांना ताब्यात घेतले आहे. दाखल गुन्ह्यात अजुन 3 आरोपी फरार (Wanted) आहेत.

 

 

दाखल गुन्हयाच्या तपासामध्ये सदर टोळीवर एकुण 2 गुन्हे एकत्र केल्याची नोंद असून, स्वतंत्रपणे एकुण 12 गुन्हे असे एकुण 14 गुन्हे केल्याची नोंद आढळुन आली आहे. तसेच दिग्विजय ऊर्फ पपुल्या तुकाराम वाघमारे (टोळी प्रमुख) याने नव्याने आपली टोळी तयार केली असुन, टोळी वाढवत असल्याने, तसेच गुन्हे घडवून आणणे करीता विधी संघर्षीत बालकांचा वापर करत असुन, टोळी वाढवण्यासाठी टोळी सदस्य मुन्ना नदाफ (Munna Nadaf) तसेच लिग्गाप्पा ऊर्फ नितीन सुरेश गडदे, हे त्यास मदत करत आहेत. त्याचेवर व त्याचे इतर साथीदारांवर खुनाच्या प्रयत्नाचे (Attempt to Murder) गंभीर स्वरुपाचे गुन्हे (Serious Crimes) दाखल असुन, सहकारनगर परीसरात त्याने दहशत निर्माण केली होती. त्याने आपली संघटीत गुन्हेगारी (Organized Crime) कृत्य चालु ठेवली आहेत. विधी संघर्षीत बालकांना दारूचे व्यसन लावणे (Addiction of Alcohol), तसेच त्यांना पैशाचे आमिष दाखवुन (Lure of Money) गुन्हे घडवुन आणणे, आपले टोळीचे वर्चस्व वाढावे (Increase in Gang Dominance) तसेच जनमानसात दहशत (Dismay) राहावी हाच उद्देश ठेवुन त्यांनी हे गुन्हे केलेले आहेत.

 

 

आरोपी आपल्या गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व वाढवण्यासाठी त्यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे बेकायदेशिरपणे सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आल्याने, तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने (Change of Behavior) प्रस्तुत दाखल गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमाचा (Maharashtra Control of Organized Crime Act) अंर्तभाव करणेकामी सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे (PI Surendra Malale) यांनी परिमंडळ 2 च्या पोलीस उप-आयुक्त स्मार्तना पाटील (DCP Smartana Patil) यांचे मार्फतीने अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर प्रविणकुमार पाटील (Additional Commissioner of Police Pravin Kumar Patil) यांना अहवाल सादर केलेला होता. सदर प्रकरणाची छाननी करून पाटील यांनी मोक्का कारवाई करिता मान्यता दिली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) करत आहेत.

 

 

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर रितेश कुमार (CP Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक (Joint Commissioner of Police Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदिप देशमाने (PI Sandeep Deshmane), सर्व्हेलन्स पथकाकडील (Surveillance Squad) पोलीस अंमलदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad), मंगेश खेडकर (Mangesh Khedkar), पुजा तिडके (Pooja Tidke), भाऊसाहेब आहेर (Bhausaheb Aher) यांनी केली. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्राणांवर बारकाईने लक्ष देवुन शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे (Offenses Against Body and Property) करणारे व नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणारे (Causing Terror Among Civilians) सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन (Mass Eradication of Crime) होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अमंलदार यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही 46 वी कारवाई आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.