Type Here to Get Search Results !

पुण्यातील 55 गुणवंत कामगारांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती; राज्यातील पहिलाच उपक्रम

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Appointment of 55 meritorious workers in Pune as Special Executive Officers; First of its kind initiative in the state


 

पुणे, दि. 5 जुलै 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्याचे जिल्हाधिकारी (Collector Pune) डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांच्या संकल्पनेतून राज्यातील पहिलाच अभिनव प्रकल्प (Innovative Project) पुणे जिल्ह्यात राबवण्यात आलेला असून, त्यामध्ये गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त कामगारांमधून (Meritorious Worker Welfare Awardee Worker) पुणे जिल्ह्यातील 55 कामगारांची विशेष कार्यकारी अधिकारी (Special Executive Officer) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या कामगारांना आज शुक्रवार दि.4 ऑगस्ट 2023 जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आणि गृह शाखेचे तहसीलदार धनंजय जाधव (Home Branch Tehsildar Dhananjay Jadhav), गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण (Dr. Bharati Chavan) यांच्या प्रमुख उपस्थितीत नेमणुकीचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र प्रदान करण्यात आले.

 

 

महसूल सप्ताहाअंतर्गत (Revenue Week), जिल्हाधिकारी कार्यालय आणि गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कमिन्स इंडियाच्या (Cummins India Ltd) कामगार भूषण कवी राजेंद्र वाघ (Rajendra Wagh), होम मिनिस्टर फेम बाळकृष्ण नेहरकर (Balkrishna Neharkar), संजय गोळे (Sanjay Gole), एकनाथ पिंगळे (Eknath Pingale) आणि संपत खैरे (Sampat Khaire) यांचीही विशेष कार्यकारी अधिकारीपदी त्यांच्या वयाच्या 70 व्या वर्षांपर्यंत मुदत असलेले पद सन्मानपूर्वक प्रदान (Respectfully Given) करण्यात आले.

 

 

देशाच्या, राज्याच्या जडणघडणीमध्ये अर्थव्यवस्थेच्या रुपाने उद्योग क्षेत्राचा मोठा वाटा आहे. राज्याच्या सकल राज्य उत्पादनामध्ये पुणे जिल्ह्याचा सुमारे 14 ते 15 टक्के वाटा असून, यात वाहन उद्योग, उत्पादन उद्योग आदींचे मोठे योगदान आहे. उद्योगांच्या वाढीसाठी पर्यायाने राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी गुणवंत कामगारांचे महत्वाचे योगदान आहे, असे गौरवोद्गार डॉ. देशमुख यांनी यावेळी काढले. आपल्या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कामगिरीमुळे गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित झालेल्या कामगारांना आता विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून आपल्या कार्यक्षेत्राबाहेर अधिक समाजाभिमुख भूमिका बजावण्याची संधी मिळाली आहे. आपली गुणवत्ता समाजोपयोगी कार्यासाठी उपयोगात आणावी, असे आवाहन डॉ. देशमुख यांनी यावेळी केले.

 

 

राज्यात प्रथमच पुण्यात नियुक्त्या

राज्यामध्ये गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त कामगारांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्याची तरतूद डिसेंबर 2015 च्या शासन निर्णयानुसार करण्यात आली आहे. मात्र त्यानंतर आतापर्यंत त्याची अंमलबजावणी करण्याचे धाडस कोणी दाखवले नव्हते. या पदावर शक्यतो सत्ताधारी पक्षाच्या आणि आमदारांच्या शिफारसीने नियुक्त्या केल्या जात असल्याच्या चर्चा आहेत. मात्र आता पुणे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या धाडसी पुढाकाराने अशा नियुक्त्या करण्यात आल्या असल्याच्या चर्चांना उधान आले आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.