Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 4 जुलै 2023
(चेकमेट टाईम्स): तब्बल 5 लाख रुपयांच्या कॉमन बजेट (PMC Pune Common Budget) मधून नुकत्याच बांधण्यात आलेल्या
शिवणे येथील स्मशानभूमीतील (Shivane Graveyard) स्वच्छतागृहांची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड करून नुकसान (Vandalism
of Common Toilets) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत माहिती
मिळताच वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहायक आयुक्त राजेश गुर्रम
(Rajesh Gurram Municipal Assistant Commissioner of Warje Karvenagar Ward Office) यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी केली. तर येथे सुरक्षा रक्षक
(Security Guard) नसल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याने
सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या अनिता तुकाराम इंगळे
(Pune ZP Member Anita Tukaram Ingale) यांनी केली आहे.
या स्मशानभूमीमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने अंत्यविधी (Funeral) करिता आलेल्या ज्येष्ठ
नागरिक (Senior Citizen) आणि महिलांची (Womens Toilet) गैरसोय होत होती. यावर उपाय म्हणून, जिल्हा परिषदेच्या सदस्या अनिता
इंगळे यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून, या ठिकाणी स्वच्छतागृह
बांधण्यास प्रशासनाला भाग पाडले होते. मात्र हे चांगले काम होत असताना, काही समाजकंटकांनी
या स्वच्छतागृहाची मोडतोड केल्याची समोर आले आहे. त्यामध्ये भिंतीला लावलेल्या टाईल्स
(Wall Tiles), युरीनल पॉट (Urinal Pot) आणि बेसिनची
(Wash Basin) तोडफोड करण्यात आली असल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी चेकमेट
टाईम्सशी बोलताना सांगितले. तर याबाबत उत्तमनगर पोलिसांना (Uttamnagar
Police Station) तक्रारीचे पत्र देखील देण्यात आले असल्याचे
सांगितले.
याबाबत बोलताना अनिता इंगळे म्हणाल्या की, महापालिकेत समावेश केलेल्या
शिवणे (Shivane Graveyard),
न्यू कोपरे (New Kopare Graveyard), कोंढवे धावडे (Kondhave Dhawade Graveyard) व उत्तमनगर
(Uttam Nagar Graveyard) येथील चारही स्मशानभूमीत पुणे
महानगरपालिकेचे सुरक्षारक्षक (PMC Pune Security Guard) नाहीत.
त्यामुळे चोरीचे प्रकार सुरू आहेत. या चारही स्मशानभूमीत सुरक्षा रक्षक नेमण्याबरोबरच
या भागात सीसीटीव्ही (CCTV) लावण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे
केली आहे. या स्मशानभूमी जवळून नांदेड सिटी (Shivane Nanded City Road) भाग जोडला जातो. त्यामुळे या भागातून रात्री अपरात्री कारखान्यांमध्ये
काम करणाऱ्या कामगारापासून, पासून आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी
कर्मचाऱ्यांची वर्दळ या रस्त्याला असते. त्यात महिलांची संख्या देखील लक्षणीय
असते. त्या सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या स्मशानभूमीत 24 तास कार्यरत
सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही असल्यास वास्तू आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न
सुटण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे इंगळे यांनी चेकमेट टाईम्सशी बोलताना
सांगितले.
या भागातून ज्या पटीत कर संकलन (Tax
Collection in Shivane, Uttam Nagar, Kondhave Dhawade, New Kopare)
केले जाते. त्या पद्धतीने महानगरपालिका प्रशासन सेवा आणि विकासकामे (Service
& Development) करत नाही. सदरील स्वच्छतागृहाच्या कामात देखील
ठेकेदाराकडून दर्जा आणि गुणवत्ता (Quality & Standards by PMC
Contractor) याचे यथोचित पालन करण्यात आले नव्हते. विहित पद्धतीने
केलेले चांगल्या दर्जाचे काम असते, तर त्याचे नुकसान झाले नसते. नळ फिटिंग आणि
सर्वच वस्तू निकृष्ठ दर्जाच्या (Inferior Quality) होत्या, असा
आरोप काही स्थानिक ग्रामस्थांनी केला असून, नुकसान झालेले काम असले तरी, त्याला
ठेकेदाराच जबाबदार असून, ते काम पूर्ण करून घेतल्याशिवाय या ठेकेदाराचे बिल अदा
करण्यात येऊ नयेत, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप
करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर
फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84