Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news, khadakwasla vidhan sabha, khadakwasla vidhan sabha result 2011, khadakwasla vidhan sabha 2009, khadakwasla vidhan sabha map, khadakwasla assembly constituency number, pune vidhansabha election, pune election results, pune election news pune election study, khadakwasla vidhansabha study,
पुणे, दि. 14 ऑगस्ट 2023 (चेकमेट टाईम्स): सध्या
राज्यात एकनाथ शिंदे (Eknath
Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
आणि अजित पवार (Ajit Pawar) असे ट्रिपल इंजिन (Triple
Engine Sarkar) महायुतीचे सरकार आहे. त्याची झलक आता राज्यभर
निरनिराळ्या कार्यक्रमांमध्ये तिन्ही पक्षाचे लोकप्रतिनिधी एकत्र येऊन कार्यक्रम
करत असल्यातून पहायला मिळते. असेच एक चित्र खडकवासला विधानसभा मतदार संघात (Khadakwasla
Assembly Constituency) देखील समोर आले असून, एकमेकांच्या विरोधात
निवडणूक लढवलेले (Contested Against Each Other) विधानसभेचे
उमेदवार (Legislative Assembly Candidates) आमदार भिमराव
तापकीर (MLA Bhimrao Tapkir) आणि सचिन दोडके (Sachin
Dodke) “हर घर तिरंगा” (Har Ghar Tiranga)
उपक्रमाचे राष्ट्रध्वज (National Flag) वाटपाच्या
कार्यक्रमात एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. या खडकवासला मतदार संघातून तापकीर हे
सलग तीन वेळा निवडून आलेले आमदार (Hat Trick MLA) आहेत.
मागच्यावेळी त्यांना निसटता विजय (Escape Victory) मिळाला
होता. त्यातच काही दिवसांपूर्वी खडकवासला मतदार संघात भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर
बावनकुळे (BJP President Chandrashekhar Bawankule) यांच्या
उपस्थित झालेल्या “टिफिन पर चर्चा” (Discussion on Tiffin) बावनकुळे यांनी “कोणालाही उमेदवारीची शाश्वती देता येत नाही. मलाही
पक्षाने उमेदवारी नाकारली. त्यामुळे कोणीही भ्रमात राहू नका.” असा सूचक इशारा दिला
होता. त्यामुळे आता पुढे या शिंदे – फडणवीस - पवार महायुती मध्ये खडकवासल्याची
जागा कोणाला जाणार याच्या चर्चा रंगत असताना, झालेल्या या उपक्रमामुळे खडकवासला
विधानसभा मतदार संघात चर्चांना उधाण (Gossip on Politics)
आले आहे.
सध्याचे
खडकवासला विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार भिमराव तापकीर हे भाजपाचे उमेदवार सलग
तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. स्व. सोनेरी आमदार म्हणून ओळख असलेल्या रमेश वांजळे (Goldman MLA
Ramesh Wanjale) यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर
झालेल्या पोटनिवडणुकीत (Khadakwasla Vidhansabha ByElection 2011) तापकीर यांनी बाजी मारत पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून गेले. अण्णा हजारे
(Anna Hajare) यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलन (Anti-Corruption
Movement), जनलोकपाल आंदोलनाच्या (Jan Lokpal Movement) पार्श्वभूमीवर 13 ऑक्टोबर 2011 ला झालेल्या या निवडणुकीत तापकीर यांना “आण्णा
- आण्णा” या घोषणाबाजी मध्येच निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले होते. त्यामुळे
एकीकडे हर्षदा वांजळे (Harshada Wanjale) यांनी मनसे
(MNS) मधून बाजूला जात राष्ट्रवादीशी (NCP)
केलेला घरोबा आणि दुसरीकडे अण्णा हजारे यांचा करिष्मा जुळून येऊन, तापकीर यांनी 3
हजार 625 मतांनी विजय संपादन केला होता. 32.76 टक्के अर्थात 1 लाख 18 हजार
मतदारांनी मतदान केलेल्या या निवडणुकीच्या मतमोजणीत
(Khadakwasla Vidhansabha Votes Counting) एकूण 27 फेऱ्या होत्या.
त्यात सुरवातीच्या 5 फेऱ्यांमध्ये हर्षदा वांजळे यांनी 5 हजार मतांची महत्त्वपूर्ण
आघाडी घेतली होती. मात्र भीमराव तापकीर यांनी 10 व्या फेरीनंतर आघाडी घेतली व ती
कायम ठेवत 3 हजार 625 मतांनी विजय खेचून आणला. यावेळी
भिमराव तापकीर यांना 59 हजार 634 मते मिळाली होती, तर हर्षदा वांजळे यांना 56 हजार
009 मते मिळाली होती.
त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि भाजपा आमनेसामने (NCP vs BJP)
आले. यावेळी हर्षदा वांजळे यांना डावलून दिलीप बराटे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी
(NCP Nominated Dilip Barate) दिली. तिसऱ्यांदा नगरसेवक (Hat
Trick Corporator) झालेल्या दिलीप बराटे यांनी पुणे महानगरपालिकेचे
उपमहापौर (Dy Mayor of PMC Pune) पद भूषवले होते. त्यातच
त्यांचे बंधू असलेल्या पैलवान अमोल बराटे (Wrestler Amol Barate) यांनी “मॅटवरील पहिला हिंदकेसरी” (First Hindkesari on the Mat) किताब पटकवला होता. त्यामुळे बराटे यांच्या
नावाच्या चर्चा मोठ्या प्रमाणात असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने बराटे
यांना उमेदवारी दिली. दरम्यान मितभाषी आणि सर्वांशी जुळवून घेणारे व्यक्तिमत्व
म्हणून भिमराव तापकीर मतदार संघात चांगलेच प्रसिद्ध (Famous MLA
in Khadakwasla) झाले होते. भाजपाने पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी
दिली. यावेळी मोदींच्या नावाची लाट (Wave of Narendra Modi)
मोठ्या प्रमाणात होती. या लाटेत महाराष्ट्रातील अनेक विधानसभा मतदार संघात भाजपने
धुराळा उडवला होता. तसाच काही प्रकार खडकवासला विधानसभा मतदार संघात देखील पाहायला
मिळाला. 2011 च्या पोटनिवडणुकीत ज्या भिमराव तापकीर यांना 59 हजार 634 मते मिळाली होती, त्याच तापकीरांच्या पारड्यात
यावेळी मतदारांनी तब्बल 51 हजार 897 अधिकची मते टाकून 1 लाख 11 हजार 531 मते दिली
होती. तर दिलीप बराटे यांना 48 हजार 505 मते मिळवता आली होती. एकूणच या निवडणुकीत तापकीर
यांनी दुसऱ्यांदा निवडून येताना बराटे यांचा तब्बल 63 हजार 026 मतांनी पराभव केला
(Defeated) होता.
तर 2019 ला
झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे दोनदा निवडून आलेले आमदार असलेल्या भिमराव
तापकीर यांना “आपला माणूस – साधा माणूस” (Aapla Manus – Sadha Manus) म्हणून प्रोजेक्ट करण्यात आले. दरम्यान यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसची
उमेदवारी वारजे मधीलच उभरते तरुण नेतृत्व (Emerging Youth Leadership in
Warje) असलेल्या सचिन दोडके (Sachin Dodke)
यांना जाईल, अशी अटकळ फार अगोदर बांधली गेली होती आणि झाले सुद्धा तेच, सचिन दोडके
यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. यावेळी भाजपाच्या गटातून आम्हाला निवडणूक
सोप्पी झाली असा फाजील आत्मविश्वास (Over Confidence) बोलू
दाखवू जाऊ लागला. मात्र स्व. रमेश वांजळे यांचे समर्थक असलेल्या दोडके यांनी “रमेशभाऊंचे
स्वप्न पूर्ण करायचंय, खडकवासला घ्यायचाय” (Dreams of Ramesh Wanjale) या टॅगलाईन जोरदार तयारी (Strong Preparation) केली
होती. मतदार संघातील 55 गावांचा बारकाईने अभ्यास (Deep Study) करत, दोडके यांनी जी मुसंडी मारली ती अविश्वसनीय (Incredible Performance) ठरली. मागच्या निवडणुकीला ज्या भिमराव तापकीर यांनी 63 हजार 026 मतांचे लीड घेत विजय मिळवला होता, त्यातले 60 हजार
431 मतांचे लीड तोडून दोडके यांनी तब्बल 1 लाख 17 हजार 923 मते मिळवली. तर तापकीर
यांना 1 लाख 20 हजार 518 मते मिळाली. यामध्ये दोडके यांचा जेमतेम 2 हजार 595 मतांनी
पराभव झाला. एकूणच तापकीर यांना हर्षदा वांजळे यांच्या विरोधात जेवढी आघाडी मिळाली
होती, त्यापेक्षा 1 हजार 030 मतांची आघाडी कमी मिळाली होती.
एकूणच
आता झालेली आणि सत्तेत असलेली महायुती कितपत टिकते, कोणत्या पक्षाला हा मतदार संघ
जातो इथंपासून ते कोणाला उमेदवारी मिळते इथंपर्यंत अनेक चर्चा घडणार आहेत. त्यातच
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असलेल्या रमेश कोंडे
(Ramesh Konde) यांनी देखील 2019 च्या निवडणुकीची जोरदार तयारी
(Strong Preparations For Election) केली होती. त्यांना देखील
चांगलेच समर्थन (Support) मिळत होते. मात्र हा मतदार संघ
शिवसेनेला (Shiv Sena) सुटला नाही. कोंडे यांनी उमेदवारी अर्ज
देखील दाखल केला. खडकवासला घेण्याचा निश्चयही जाहीर केला. मात्र पक्षातून आलेल्या
आदेशानंतर, त्यांना उमेदवारी मागे घेत, पुन्हा भाजपाचे (Khadakwasla
BJP) काम करावे लागले. त्यानंतर त्यांनी मतदार संघातील जाहीर संपर्क
कमी केला असला, तरी तो संपवलेला नाही. त्यांचे समर्थक असलेल्यांना त्यांनी पदे आणि
व्यवसायात साथ देणे चालू ठेवत, आतून तयारी चालू ठेवली असून, आयत्यावेळी पत्ते
टाकायचे असाच काही डावपेच त्यांचा असू शकतो, असे राजकीय विश्लेषक (Political
Analyst) सांगतात. त्यामुळे खडकवासला विधानसभा मतदार संघाच्या
उमेदवारीवरून तरी तिन्ही पक्षात रस्सीखेच होऊ शकते, असे दिसते. पण ते देखील “हे
तिघे एकत्र राहिले तर” असाच मुद्दा शेवटी येतो. पण सकाळी गडकरींच्या व्यासपीठावरून
(Chandani Chowk Flyover Innaugration Programme of Nitin Gadkari)
नाव न घेता प्रतिस्पर्ध्यावर टीका (Criticism) करणारे
तापकीर, संध्याकाळी त्यांच्याच बरोबर खांद्याला खांदा लावून उपक्रमात सहभागी
होतात, हे एक समंजस राजकारण असल्याचे उदाहरण (Example of Sensible Politics)
दोडके आणि तापकीर यांनी सर्वांसमोर मांडले आहे. हा उपक्रम एक निव्वळ
योगायोग (Coincidence) होता आणि तो जुळून आला होता, भाजपाच्या
सहकार आघाडीचे (BJP Cooperative Alliance) पुणे शहर अध्यक्ष
(Pune City President) सचिन दशरथ दांगट (Sachin
Dashrath Dangat) यांच्यामुळे. दोडके यांच्या विकासकामांतील
चुकांवरून त्यांना खिंडीत गाठून, टीका करणारे दांगट हे देखील दोडके यांच्याबरोबर
वारजेच्या विकासावर मनमुराद गप्पा (Gossips on Warje Development) मारताना दिसले. त्यामुळे “लढाई विचारांची असावी आणि ती विचारांनीच लढली
जावी”, (Battle of Thoughts) असा संदेश यातून समोर आला, असे
म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या 9730307227 या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag
करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो
करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर
फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84