Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 7 ऑगस्ट 2023 (चेकमेट टाईम्स): कोंढवे धावडे (Kondhave
Dhawade) गावातून एकाचे अपहरण (Kidnapping)
करत, अपहरणकर्त्या टोळीने त्याला सांगलीला (Sangali) नेले,
तिकडे डांबून ठेऊन, जागा बदलण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला रस्त्यातच
पकडण्यात उत्तमनगर पोलिसांना (Uttamnagar Police) यश आले
आहे. तांत्रिक तपासाच्या (Technical Investigation) आधारावर
उत्तमनगर पोलिसांनी केलेली ही कामगिरी कौतुकास्पद (Admirable Investigation) असल्याचे बोलले जाते आहे. काही दिवसांपूर्वी याच कोंढवे धावडे मधून एकाचे
अपहरण करून, त्याला गुजरातला (Wapi, Gujrat) नेण्यात आले
होते. त्याचे आरोपी पकडण्यात यश आल्यानंतर, आता ही आणखीन एक कौतुकास्पद कामगिरी
उत्तमनगर पोलिसांकडून झाली आहे. विशेष म्हणजे त्या घटनेतील आरोपी हे सातारा
(Satara) मधील होते, तर या घटनेतील आरोपी सांगली मधील असल्याने हा
एक अजब योगायोग (Coincidence) समोर आला आहे.
याबाबत उत्तमनगर पोलिसांनी दिलेल्या
माहितीनुसार, शनिवार दि. 5 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी उत्तमनगर पोलीस स्टेशन (Uttam Nagar Police Station) कार्यक्षेत्रातील
कोंढवे धावडे येथून संबंधित तरुणाचे घरामध्ये घुसून अपहरण (Kidnapping From
Home) करण्यात आले होते. त्याबाबत अपहरण झालेल्या तरुणाच्या पत्नीने
उत्तमनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली होती. यामध्ये अपहरण करणाऱ्या टोळीतील
संशयित तरुण हा अपहरण केलेल्या तरुणाच्या पत्नीला “नेपाळ” देशातील मोबाईल क्रमांकावरून
(Threat from Nepal Telecom Mobile Number) व्हॉट्सअप कॉल (Whats
App Call) करून, त्याला सुखरूप सोडायचे असेल तर 25 लाख रूपये (Extortion) दे, नाहीतर त्याचे बरेवाईट
होईल, अशा प्रकारची धमकी देत होता.
याबाबत माहिती मिळताच सदर प्रकारचे गांभीर्य लक्षात
घेवून, पुणे शहर पोलिसांच्या दक्षिण प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त प्रविण पाटील (Additional Commissioner of Police Pravin
Patil), परिमंडळ 3 चे पोलीस उप-आयुक्त सुहेल शर्मा (DCP
Suhail Sharma), कोथरूड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे
(ACP Bhimrao Tele) यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमनगर पोलीस
स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर (PI Kiran Balwadkar),
पोलीस निरीक्षक अजय
वाघमारे (PI Ajay
Waghmare), गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शबनम शेख (PI
Shabnam Shaikh), सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे (API
Umesh Rokade), पोलीस हवालदार किरण
देशमुख (Kiran
Deshukh), संग्राम केंद्रे
(Sangram Kendre), समीर पवार (Sameer Pawar), ज्ञानेश्वर तोडकर (Dnyaneshwar Todkar), अनिरूध्द गायकवाड (Aniruddha Gaikwad),
सागर हुवाळे (Sagar Huwale) आणि पुणे शहर
पोलीस दलाच्या खंडणी विरोधी पथक (Anti Extortion Squad) 1 आणि 2 यांनी संयुक्तपणे तपास सुरु केला.
दरम्यान उत्तमनगर पोलीस स्टेशन कडील एटीसी पथकातील (ATC Team) संग्राम केंद्रे यांनी
तांत्रिक विश्लेषण करून संशयित आरोपी हे सांगली येथे असल्याची माहिती प्राप्त झाली.
त्यानंतर सदर आरोपीला ताब्यात घेण्यासाठी उत्तमनगर पोलिसांचे पथक सांगली येथे रवाना
झाले. मात्र दरम्यान संशयित अपहरणकर्त्यांनी जागा बदलण्यासाठी गाडीने पुण्याकडे येत
असल्याबाबत, संग्राम केंद्रे यांच्या तांत्रिक विश्लेषणात समोर आले. त्यानंतर तात्काळ
उत्तमनगर पोलिसांच्या एका पथकाने खेडशिवापुर टोल नाका (Khed Shivapur Toll
Plaza) येथे सापळा रचून, संशयितांना गाडीसह ताब्यात घेतले. यावेळी
त्यांना विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत अपहरण केलेल्या तरुणाला, सांगली
जिल्ह्यातील तासगाव (Tasgaon Sangali) येथे ठेवल्याचे निष्पन्न
झाले.
अपहरण झालेल्या तरुणाचा ठावठिकाणा लागल्याने
लागलीच सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे, किरण देशमुख, समीर पवार आणि अनिरूध्द गायकवाड यांचे पथक सांगली येथे
रवाना झाले. माहिती मिळालेल्या ठिकाणी गावाच्या बाहेर असलेल्या एका बंद पत्र्याच्या
खोलीमधून अपहरण झालेल्या तरुणाला, काही अपहरणकर्त्यांसह अगदी फिल्मी स्टाईलने (Filmy Style Kidnapping) ताब्यात
घेण्यात यश मिळवत, अपहरण झालेल्या वैभव श्रीकृष्ण जाधव (वय. 27 सध्या राहणार -
स्वामी चैतन्य, खडकवस्ती, कोंढवे धावडे, पुणे, मूळ राहणार – घोटी बुद्रुक, ता.
खानापूर, जि. सांगली) (Vaibhav Shrikrishna Jadhav) या
तरुणाची सुटका केली. तर अपहरणकर्ते अक्षय मोहन कदम (रा. गोरी खुर्द, ता. खानापुर, जि.सांगली)
(Akshay Mohan Kadam), विजय मधुकर नलावडे (Vijay Madhukar
Nalavde), प्रदिप किसन चव्हाण (Pradeep Kisan Chavan), महेश नलावडे (Mahesh Nalawade), अमोल मोरे
(Amol More), रणजित भोसले (Ranjeet Bhosale) (सर्वजण राहणार तासगाव, सांगली) यांना
ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत, त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केल्याने,
त्यांना अटक करण्यात आली आहे.
या घटनेबाबत अपहरण झालेल्या तरुणाची पत्नी पूनम वैभव
जाधव (वय 26) (Poonam
Vaibhav Jadhav) यांनी तक्रार दिली आहे. तर वैभव जाधव हा तरुण ओला, उबेर
गाडी चालकाचे (Ola, Uber Driver) काम करतो. तर अपहरणकर्ता
असलेला अक्षय कदम हा दिल्ली (Delhi) मध्ये सोन्या चांदीचा व्यवसाय
(Gold and Silver Business) करत होता, अशी माहिती समोर आली आहे.
त्यामुळे या टोळीने वैभव जाधव याचे अपहरण कोणत्या कारणाने केले, याबाबत महिला पोलीस
उपनिरीक्षक शितल अनुसे (LPSI Shital Anuse) अधिक तपास करत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या 9730307227 या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag
करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो
करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर
फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84