Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 4 जुलै 2023
(चेकमेट टाईम्स): सहयाद्री शाळा (Sahyadri
National School) ते खान वस्ती (Khan Vasti) पर्यंत
जाणाऱ्या रामनगर रस्त्यावर (Warje Ramnagar Road) ठेकेदाराने
केलेल्या अर्धवट कामामुळे अगणित खड्डे (Path Holes) पडले
असून, त्यामुळे सामान्य नागरिकांना अपघातांना (Accidents)
सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर वारजे विकास कृती समितीने (Warje
Vikas Kruti Samiti) वारजे पोलिस स्टेशन (Warje Police
Station) जवळ असलेल्या दशरथ दागंट चौकात (Dashrath Dangat
Chowk) पुणे महानगरपालिकेच्या
विरोधात रास्ता रोको आंदोलन
(Road Block Movement against PMC Pune) करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत
वारजे विकास कृती समितीने पुणे महानगरपालिकेचा पथ विभाग (PMC Road Department), वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पोलिस आयुक्त कार्यालय,
वारजे वाहतूक विभाग (Warje
Traffic Police) यांना पत्र देऊन कळवले आहे.
यापूर्वी देखील वारजे विकास कृती समितीने कर्वेनगर (Karvenagar) ते जुना जकात नाका
(Old Jakat Naka Warje) या टप्प्यात होत असलेल्या वाहतूक कोंडीबाबत
(Traffic Jam) डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात (Dr Babasaheb
Ambedkar Chowk) निदर्शने केली होती. त्यामुळे रस्त्याच्या कामासाठी
पुन्हा एकदा कृती समिती रस्त्यावर उतरणार असल्याचे यातून समोर येते आहे. यामध्ये सहयाद्री
स्कुल ते खान वस्ती कॅनॉल रोड (Warje Canol Road) या रस्त्याला
मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून, ठेकेदाराने रस्त्याचे काम अर्धवट केल्यामुळे मोठया
प्रमाणात चिखल झालेला असल्याचे कृती समितीने लक्षात आणून दिले आहे.
पुणे महानगरपालिकेच्या ठेकेदाराने चांगल्या स्थितीतील रस्ता मशीन द्वारे
उखडून टाकला असून, सदरचे काम वर्षभर बंद आहे. या रस्त्यावरून दिवसभर पीएमपीएल बससेवा
सुरू असते. त्याच प्रमाणे विद्यार्थी, कामगार वर्ग मोठया प्रमाणात या रस्त्याने ये जा करत
असल्याने मोठे अपघात होत असतात. या रस्त्याच्या दुरावस्थेला महापालिका प्रशासन व
ठेकेदार जबाबदार असून, सदरच्या प्रशासकीय अधिकारी व ठेकेदारावर कायदेशीर कार्यवाही (Legal Proceedings against PMC Pune and Road Contractor) करून, त्यांना बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी कृती समितीने एका
पत्राद्वारे केली आहे. तर पत्राची दखल न घेतल्यास मंगळवार दि. 8 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी
10 वाजता दशरथ दांगट चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्याबरोबरच, पुढील कालावधीत धरणे
आंदोलने (Protest), मोर्चे, उपोषण (Hunger Strike) व न्यायालयामध्ये दाद मागण्याचा
इशाराही दिलाय.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप
करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या
सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर
फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes