Type Here to Get Search Results !

कात्रज देहूरोड बायपासवर दोन लुटीच्या घटना; वारजे आणि भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हा दाखल

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Two incidents of robbery on Katraj Dehur Road Bypass; Warje and Bharti Vidyapeeth police registered a case


 

पुणे, दि. 2 जुलै 2023 (चेकमेट टाईम्स): खडकवासला विधानसभा मतदार संघात (Khadakwasla Vidhansabha) कायदा सुव्यवस्थेचे (Law & Order) धिंडवडे उडाले असून, आंबेगाव-कात्रज (Ambegaon Katraj) येथे रिक्षाचालकाने प्रवाशाला लुटल्याची (Rickshaw Driver Robbed Passenger) घटना ताजी असतानाच, आता वारजे (Warje) मधून एकाला कात्रज बोगद्याजवळ (Katraj Tunnel) नेऊन लुटण्याची घटना घडली. तर रिक्षाचालकाने प्रवाशाला चाकूच्या धाकाने लुटण्याची (Robbed at Knife Point) आणखीन एक घटना कात्रज येथील वंडर सिटी (Wonder City Katraj) ते नवले पूल (Navale Bridge) दरम्यान घडली. त्यामुळे या लुटमारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाला कडक धोरण अवलंबावे लागणार असल्याचे दिसते.

 

 

यामध्ये पहिल्या घटनेत, वारजे मधील स्व. सोनेरी आमदार रमेश वांजळे हायवे चौकातील (Late MLA Ramesh Wanjale Chowk Warje) मजूर अड्ड्यावर कामाच्या शोधात थांबलेल्या तरुणाला लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी हरिओम रमेश देवकते (वय 18, रा. कोंढवे धावडे, पुणे) (HariOm Ramesh Deokate) यांनी वारजे पोलीस स्टेशन (Warje Police Station) मध्ये तक्रार दिली आहे. हरिओम देवकते हे कामाच्या शोधात वारजे माळवाडी येथील पुलाखाली (Warje Bridge) थांबला होता. त्या वेळी दुचाकीवरून दोघे आले. काम देतो, असे सांगून त्यांनी देवकते याला कात्रज बोगद्याच्या पुढे नेले. तेथे त्याला मारहाण करून, दमदाटी करत, जमिनीवर बसायला लावून, त्याच्या गळ्यातील सोन्याचा बदाम, चांदीची चैन आणि मोबाइल असा 16 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हिसकावला. वारजे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश बाबर (API Ramesh Babar) तपास करत आहेत.

 

 

तर दुसऱ्या घटनेत रिक्षाचालकाने प्रवाशाकडील अंगठी, मोबाईल, रोकड असा एकूण 27 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. या प्रकरणी अजित कन्हेरकर (वय 41, रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) (Ajit Kanherkar) यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन (Bharti Vidyapeeth Police Station) तक्रार दिली आहे. त्यावरून रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कन्हेरकर रिक्षातून घरी जात होते. यावेळी कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ रिक्षाचालकाने रिक्षा थांबविली. कन्हेरकर यांना चाकूचा धाक दाखवून त्यांना लुटले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड (API Vaibhav Gaikwad) तपास करत आहेत.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.