Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 7 ऑगस्ट 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे शहरातील वाहतुक
(Pune City Traffic) सुरक्षित व सुरळीतपणे (Safely and Smoothly) होणेकरीता महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या नोटीफिकेशननुसार मोटार वाहन कायद्याच्या
(Motor Vehicle Act) कलमाचा वापर करून पुणे शहर वाहतूक पोलीस नेहमीच
निरनिराळे निर्णय घेत असतात, प्रयोग करत असतात. असेच काही बदल सिंहगड रोड वाहतूक
विभागाने (Sinhagad Road Traffic Department) घेतले आहेत. त्याबाबत
पोलीस उप-आयुक्त (वाहतुक) विजयकुमार मगर (DCP Traffic Vijay Magar)
यांच्या सहीने एक पत्र प्रसिद्ध करण्यात आले असून, त्यात सिंहगड रोड वाहतुक विभागातील काही रस्त्यांवर
पार्किंग नियमाबाबत (Parking
Slots) बदल करण्यात आले आहेत.
1. गोयलगंगा चौकाकडुन (Goel Ganga Chowk) सिंहगड रोड क्षेत्रिय
कार्यालयाकडे (Sinhgad Road Ward Office) जाताना गोयलगंगा चौक
ते आयसीआयसीआय बँकेपर्यंत (ICICI Bank Sinhgad Road) (दुभाजक
संपेपर्यंत) रोडचे दोन्ही बाजूला 50 मीटर पर्यंत नो पार्किंग झोन (No
Parking Zone) तयार करण्यात येत आहे.
2. गोयलगंगा चौकाकडुन सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाकडे
जाताना गोयलगंगा चौक ते आयसीआयसीआय बैंक ते अमृतगंगा सोसायटी (Amrut Ganga Society) गेट नं. 4
(शोरबा हॉटेल) (Shorba Hotel Sinhgad Road) पर्यंत रोडचे डाव्या
बाजुला फक्त दुचाकी वाहनांकरीता पार्किंग (Two Wheelers Parking) व्यवस्था करण्यात येत आहे.
3. गोयल गंगा चौकाकडुन सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय
चौकाकडे जाताना रोडच्या उजव्या बाजूस दुभाजक संपलेनंतर मनपा प्रस्तावित नाटयगृह (PMC Pune Proposed Theater) ते अतिथी
हॉटेल (Atithi Hotel Sinhgad Road) पर्यंत फक्त चारचाकी वाहनांकरीता
पार्किंग (Four Wheeler Parking) व्यवस्था करण्यात येत आहे.
4. गोयलगंगा चौकाकडुन सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय
चौकाकडे जाताना रोडच्या उजव्या बाजूस एचडीएफसी बँकेपासून (HDFC Bank Sinhgad Road) ते सोवा
ऑप्टिमा सोसायटीचे (Sowa Optima Society) गेट व्यवस्था करण्यात
येत आहे. (प्रेमाचा चहा) (Premacha Chaha Sinhgad Road) पर्यंत
फक्त दुचाकी वाहनाकरीता पार्किंग असेल.
5. सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाकडून गोयलगंगा
चौकाकडे जाताना सिंहगड क्षेत्रिय कार्यालय चौक ते दुभाजक संपेपर्यंत रोडचे दोन्ही बाजूस 100 मीटर
पर्यंत नो पार्किंग करण्यात येत आहे.
6. वडगाव (Vadgaon Bk) ते पाउंजाई माता मंदीर (Paunjai
Mata Mandir) रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक चौक
(Statue of Shivaji Maharaj) ते विष्णु पुरम सोसायटीच्या (Vishnu
Puram Society) गेट पर्यंत रोडचे दोन्ही बाजुला 50 मीटर पर्यंत नो पार्किंग
करण्यात येत आहे.
हे बदल करण्यात येत असून (Changes will be Applicable), नागरीकांनी
याबाबत आपल्या काही सुचना असल्यास त्या पोलीस उप-आयुक्त वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफीस, बंगला नं 6, जेल रोड, पुणे यांचे कार्यालयात
रविवार दि. 6 ऑगस्ट 2023 ते रविवार दि. 20 ऑगस्ट 2023 पर्यंत लेखी स्वरूपात कळवाव्यात.
नागरीकांच्या सूचना व हरकती
(Suggestions and Objections) विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने
(उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहीका इ.) (Fire Brigade, Police Vehicles, Ambulance
etc.) खेरीज करून अंतिम आदेश काढण्यात येतील, असे वाहतूक विभागाच्या
वतीने कळवण्यात आले आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या 9730307227 या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag
करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो
करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर
फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes