Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 8 ऑगस्ट 2023 (चेकमेट टाईम्स): बारामती लोकसभा मतदार संघातून
(Baramati Lok Sabha Constituency) जाणारे विविध राष्ट्रीय महामार्ग
(National Highway) आणि त्यांवरील प्रलंबित तसेच चालू असलेली कामे
(Painding and Development Work) लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केंद्रिय
रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Roads and Highways Minister
Nitin Gadkari) यांच्याकडे केली. तर ते रस्ते कुठले कुठले आहेत, काय
काय कामे करायची आहेत, याची भली मोठ्ठी यादीच (Huge List of Work) सुळे यांनी गडकरी यांना दिली आहे. ती यादी वाचून खुद्द गडकरींना देखील
धक्का बसला असेल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तर खासदार सुळे यांच्या या मागणीला
गडकरी कितपत न्याय देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
खासदार सुळे यांनी दिल्ली येथे गडकरी यांची भेट घेऊन
या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून लेखी निवेदन दिले आहे. यात पालखी मार्गावरील (Palkhi Marga) नीरा जंक्शन
(Neera Junction) आणि लोणंद सातारा रस्ता (Lonand Satara
Rasta) हे राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करणे, पुणे सोलापूर रस्त्यावर (Pune Solapur Road) इंदापूर
(Indapur) तालुक्यातील भिगवण (Bhigwan) येथे भुयारी
मार्ग (Subway) तयार करणे तसेच लोणी काळभोर (Loni
Kalbhor), उरुळी
कांचन (Uruli
Kanchan), यवत (yawat), वरवंड (Varvand), पाटस (Patas) आदी गावांतील नागरिकांना
रस्ता ओलांडण्यासाठी आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना करणे ही कामे तातडीने पूर्ण
करण्याची गरज असल्याचे सुळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. त्याचबरोबर सोलापूर
राष्ट्रीय महामार्गावर दौंड (Daund) तालुक्यात वरवंड विभागात
भुयारी मार्ग आणि सहजपुर (Sahajpur) येथे उड्डाणपूल उभारणे अत्यावश्यक
असून, याबाबत स्थानिक नागरिक सातत्याने मागणी करत असल्याचे सुळे यांनी गडकरी यांना
दिलेल्या पत्रात अधोरेखित केलेले असून, त्यात ही बाब आपण यापूर्वीही लक्षात आणून दिल्याचे
म्हटले आहे. तर पुरंदर (Purandar) तालुक्यात सासवड रस्त्यावर
(Saswad Road) हडपसर ते दिवे घाट (Hadapsar to Dive
Ghat) या पालखी महामार्गाचे रुंदीकरण, भोर (Bhor) तालुक्यात करंदी-कांबरे (Karandi Kambare) आणि भाटघर धरणाकडे (Bhatghar Dam) राजगड वेळवंड
(Rajgad Velvand) खोऱ्यातून जाणाऱ्या राज्य रस्त्यावर (State
Highway) पूल उभारणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
वेल्हा (Velha) तालुक्यातील अत्यंत महत्वाचा मढेघाट (Madhe
Ghat) मार्गे महाड (Mahad) मध्ये जाणारा रस्ता
राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्याबाबत खासदार सुळे यांनी पुन्हा एकदा आठवण करून
देत निधीचीही मागणी केली आहे. याबरोबरच मुळशी (Mulshi) तालुक्यातील
भुगाव (Bhugaon) आणि घोटावडे फाटा येथे उड्डाणपूल (Ghotawade
Phata Fly Over) उभारणी करण्याबाबत त्यांनी निवेदनात उल्लेख केला आहे.
याबाबत यापूर्वीही सुळे यांनी मागणी केलेली आहे. हवेली (Haveli) तालुक्याच्या शहरी भागात येणाऱ्या खडकवासला मतदार संघात (Khadakwasla
Vidhansabha) मुंबई बंगळूर बाह्यवळण (Mumbai Benglore Bypass) महामार्गाला संलग्न असा वडगाव बुद्रुक येथील उड्डाणपुलापासून वारजे पर्यंत
मुठा नदीवर बारा मीटर रुंदीचा पूल उभारणी (Vadgaon Bk to Warje Mutha River
Bridge) करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यापूर्वी सुप्रिया सुळे
यांनी या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून, त्याबाबतचे ट्वीट (Supriya Sule
Tweet) करून, ते गडकरी यांना टॅग देखील केले होते. (आपण खाली
सुप्रिया सुळे यांनी भेट देऊन केलेल्या पाहणीचा व्हिडीओ पाहू शकता)
बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांबाबत या वरील
सर्व मागण्यांचा सरकारने सकारात्मक विचार करून तातडीने उपाययोजना कराव्यात, असे सुळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले
आहे. दिल्ली येथे केंद्रिय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट
घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना आपल्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली आणि
लेखी निवेदन दिले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या 9730307227 या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag
करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो
करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर
फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes