Type Here to Get Search Results !

स्वातंत्र्यदिनानिमित्त एनडीए रोडवर देण्यात येणार अनोखी मानवंदना; लाईट शो पाहायला नक्की जायला हवं

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


A unique tribute to be given at NDA Road on the occasion of Independence Day; Must go to see the light show


 

पुणे, दि. 14 ऑगस्ट 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्यातील कर्वेनगर (Karve Nagar Pune) ते कोंढवा गेट (Kondhawa Gate) या रस्त्याला एनडीए रस्ता (NDA Road) म्हणून ओळखले जाते. याच रस्त्यावरून एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा (National Defence Academy) पाया रचला गेला. एनडीए’ने देशाच्या संरक्षण यंत्रणेला अनेक बलशाली आणि सामर्थ्यवान अधिकारी (Strong and Powerful Officers) दिले. त्याला कारणीभूत असलेल्या या रस्त्यावर स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्युतरोषणाई (Lighting on Independence Day) करून, देशभक्तीपर गीतांच्या स्वरांमध्ये (Patriotic Songs) आनंदोत्सव साजरा (Independence Day Celebration) करण्यात येणार आहे. त्याला देशप्रेमींनी भेट देऊन, या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अनिता तुकाराम इंगळे (ZP Pune Member Anita Tukaram Ingale) यांनी केले आहे.

 

 

अनिता इंगळे यांनी एनडीए रस्त्याच्या विकासासाठी (Development of NDA Road) अनेक प्रयत्न केलेले आहेत. त्यामध्ये खडकवासला धरणापर्यंत (Khadakwasla Dam) रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे (Street Lights) लावणे असेल, की एनडीए रोडच्या शिंदे पूल (Shinde Bridge) ते अहिरे गेट (Ahire Gate) टप्प्यात पाम वृक्षांचे रोपण (Palm Tree Plantation) करून, रस्ता शोभिवंत करण्याचा प्रयत्न केला. शिवणे उत्तमनगर (Shivane Uttam Nagar) भागात प्रवेश करणाऱ्या नागरिकांच्या स्वागतासाठी डिजिटल फलक (Welcome Boards) उभारून सौंदर्यात भर घातलेली आहे. गणपती माथा (Ganapati Matha) ते शिंदे पूल या टप्प्यातील वृक्ष उन्हाळ्यात सुकायला लागले होते. त्यांना स्वत:च्या खर्चातून पाण्याचे टँकरने (Water Tanker) पाणी घालून, त्या झाडांना जीवदान (Give Life to Trees) देण्याचे काम अनिता इंगळे यांनी केले आहे. त्यामुळे या टप्प्यातील वृक्ष आता अधिक डौलदार झालेले दिसतात. त्यामुळे याच गणपती माथा ते शिंदे पूल टप्प्यात विद्युत रोषणाई करून देशाला आणि निसर्गाला मानवंदना देण्याचा दुहेरी संगम अनिता आणि तुकाराम इंगळे यांच्या माध्यमातून साधण्यात येणार असल्याचे अनिता इंगळे यांनी चेकमेट टाईम्सशी बोलताना सांगितले.

 

 

आज सोमवार दि.14 ऑगस्ट 2023 सायंकाळी 6 वाजता, देशसेवेसाठी कटिबद्ध असलेले वारजे पोलीस स्टेशनचे (Warje Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापुरकर (PI Sunil Jaitapurkar), उत्तमनगर पोलीस स्टेशनचे (Uttam Nagar Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर (PI Kiran Balwadkar), वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे (Warje Karvenagar Ward Office) महापालिका सहायक आयुक्त (Municipal Assistant Commissioner) राजेश गुर्रम (Rajesh Gurram), परिसरातील वीर माता (Heroic Mother), सैनिक पत्नी (Soldier's Wife), सर्व माजी सैनिकांच्या (EX Soldier’s) हस्ते, सर्व स्थानिक आजी माजी नगरसेवक, सर्वपक्षीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या विद्युत रोषणाईचे उद्घाटन करण्यात येणार असून, उद्या मंगळवार दि.15 ऑगस्ट 2023 रात्री 10 वाजेपर्यंत हा तिरंगी राष्ट्रध्वजाचा डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहे. यावेळी जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन, सोहळ्याचा आनंद घेण्याचे आवाहन अनिता तुकाराम इंगळे यांनी केले आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.