Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 29 ऑगस्ट 2023 (चेकमेट टाईम्स): आगामी दहिहंडीच्या (Dahi Handi Festival)
पार्श्वभूमीवर वारजे माळवाडी पोलीस स्टेशन (Warje Malwadi Police Station) हद्दीतील कायदा सुव्यवस्था (Law & Order) अबाधित
राहण्यासाठी पथकाकडून हद्दीत गस्त (Police Patroling)
घालण्यात येत आहे. दरम्यान वारजे पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या
(Crime Disclosure Branch) अधिकारी कर्मचाऱ्यांनी एक दमदार कामगिरी
करत, एकाच दिवसात, दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत 2 पिस्तुलं (Pistol), 7 जिवंत काडतुसं (Cartridges) आणि 4 जणांना
ताब्यात घेतले आहे. त्यामधील 2 अल्पवयीनांचा (Juvenile)
समावेश आहे.
याबाबत वारजे माळवाडी पोलिसांनी दिलेल्या
माहितीनुसार, गुन्हे प्रगटीकरण शाखेचे पथक गस्त घालत असताना, त्यांना पोलीस कॉन्स्टेबल
श्रीकांत भांगरे (Shrikant
Bhangare) यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराने दिलेल्या बातमीवरून तपास
पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंडे (PSI Narendra Mundhe) यांनी पोलीस नाईक प्रदिप शेलार (Pradip Shelar), पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत भांगरे, विक्रम खिलारी (Vikram Khilari) व अजय कामठे
(Ajay Kamthe) यांचेसोबत धनगरबाबा बसस्टॉपचे (Dhangar Baba
Bus Stop Shivane) मागे असलेल्या एनडीएच्या ग्राउंडमध्ये (NDA Ground) सापळा रचून 2 संशयित
इसमांना ताब्यात घेवून, त्यांचेपैकी सराईत गुन्हेगार सुरज शिवाजी भरडे (वय 23 वर्षे, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, बौद्ध विहार शेजारी, राहुलनगर, शिवणे, पुणे) (Suraj Shivaji Bharde) यांचेकडून
1 देशी बनावटीचे पिस्टल व 4 जिवंत काडतूसे जप्त केले आहे. तसेच त्याचेसोबत असणाऱ्या
अल्पवयीन बालकाकडुन 1 लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान सदरची कारवाई चालू असतानाच, तपास पथकातील
पोलीस कॉन्स्टेबल विजय भुरुक
(Vijay Bhuruk) यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराने दिलेल्या बातमीवरुन
निगराणी पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विशाल मिंडे (PSI Vishal Minde) यांनी पोलीस नाईक अमोल राऊत (Amol Raut), पोलीस कॉन्स्टेबल विजय भुरुक, अमोल सुतकर (Amol Sutkar) व राहुल हंडाळ
(Rahul Handal) यांचेसोबत वारजे स्मशानभूमी (Warje Cemetery) समोरील पुलाखाली (Warje Mutha River Bridge) सापळा रचून
2 संशयित इसमांना ताब्यात घेतले. त्यांचेपैकी इसम नामे अनिकेत अनुरथ आदमाने (वय 21 वर्षे, रा. पांडुरंग अपार्टमेंट, वारजे माळवाडी, पुणे) (Aniket Anurath Admane) यांचेकडुन 1 देशी बनावटीचे पिस्टल
व 3 जिवंत काडतुसे जप्त केले आहे. तसेच त्याचेसोबत असणाऱ्या अल्पवयीन बालकाकडुन 1 लोखंडी
कोयता जप्त करण्यात आला आहे.
एकूणच वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे
सतर्कतेमुळे (Vigilance) एकाच दिवशी 2 पिस्टल व 7 जिवंत काडतुसांसह 4 जणांना ताब्यात घेऊन गंभीर गुन्हा
घडण्यास प्रतिबंध (Prevention of Serious Crime) घालण्याचा
प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र या भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात एकामागे एक
कोंबिंग ऑपरेशन्स (Combing Operations) राबवण्यात आल्यानंतर
देखील या शस्त्रांचे हद्दीत मिळणे ही चिंतेची बाब (Matter of Concern) असल्याचे यातून समोर येते आहे. त्यामुळे आगामी काळात वारजे माळवाडी
पोलिसांना आणखीन सतर्क राहण्याची गरज असल्याचे दिसते आहे. कोंबिंग ऑपरेशन्स
राबवल्यापासून हद्दीत मोठी घटना घडली नसली, तरी ही वादळापूर्वीची शांतता (Calm
before Storm) तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात असताना,
मिळालेल्या या 2 पिस्तुल, 7 काडतुसे आणि 2 कोयत्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले
आहे.
सदरची कामगीरी ही पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार (Pune CP Ritesh Kumar),
सह - पोलीस आयुक्त
संदिप कर्णीक (Joint CP
Sandeep Karnik), पश्चिम प्रादेशिक
विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील (Upper Police Commissioner Pravin Kumar Patil),
परिमंडळ 3 चे पोलीस उप आयुक्त सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma), कोथरुड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त भिमराव
टेळे (ACP Bhimrao
Tele) यांचे मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस
निरीक्षक सुनिल जैतापुरकर (PI Sunil Jaitapurkar), पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय कुलकर्णी (PI Ajay Kulkarni) यांच्या आदेशान्वये
तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, विशाल मिंडे, पोलीस नाईक प्रदिप शेलार, अमोल राऊत, पोलीस अंमलदार विजय भुरुक, श्रीकांत भांगरे, विक्रम खिलारी, अजय कामठे, अमोल सुतकर व राहुल हंडाळ यांनी केलेली
आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या 9730307227 या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag
करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो
करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर
फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84