Type Here to Get Search Results !

वारजे मधील ते रास्ता रोको आंदोलन स्थगित; पहा काय आहे कारण

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Te Rasta Roko movement suspended in Warje; See what is the reason


 

पुणे, दि. 7 ऑगस्ट 2023 (चेकमेट टाईम्स): सहयाद्री शाळा (Sahyadri National School) ते खान वस्ती (Khan Vasti) पर्यंत जाणाऱ्या रामनगर रस्त्यावर (Warje Ramnagar Road) ठेकेदाराने केलेल्या अर्धवट कामामुळे अगणित खड्डे (Path Holes) पडले असून, त्यामुळे सामान्य नागरिकांना अपघातांना (Accidents) सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर वारजे विकास कृती समितीने (Warje Vikas Kruti Samiti) वारजे पोलिस स्टेशन (Warje Police Station) जवळ असलेल्या दशरथ दागंट चौकात (Dashrath Dangat Chowk) पुणे महानगरपालिकेच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन (Road Block Movement against PMC Pune) करण्याचा इशारा दिला होता. यानंतर आता पुणे महानगरपालिकेने वारजे विकास कृती समितीला एका पत्राद्वारे रस्ता करण्याचे आश्वासन दिल्यानंतर (Letter by PMC Pune) हे आंदोलन तात्पुरत्या स्वरुपात स्थगित केले असल्याचे (Protest Adjourned Temporarily) कृती समितीने कळवले आहे.

 

 

रास्ता रोको आंदोलन करण्याबाबत वारजे विकास कृती समितीने पुणे महानगरपालिकेचा पथ विभाग (PMC Road Department), वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पोलिस आयुक्त कार्यालय, वारजे वाहतूक विभाग (Warje Traffic Police) यांना पत्र देऊन आंदोलनाबाबत कळवले होते. यानंतर कुंभकर्णी झोपेत (Deep Sleep) असलेले प्रशासन जागे झाले आणि महापालिका सहाय्यक आयुक्त वारजे-कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय (Municipal Assistant Commissioner Warje-Karvenagar Ward Office), मलःनिसारण व देखभाल दुरुस्ती विभाग (Sewage and Maintenance Repair Department) व पथ विभाग (Road Department) यांचेकडील अधिकारी यांनी सदर रस्त्याची संयुक्त पाहणी (Joint Inspection Visit) केली. या संयुक्त पाहणीमध्ये सहयाद्री स्कुल ते खान वस्ती या दरम्यान रस्त्यावर जिथे खड्डे पडलेले आहेत, तिथे खड्डे दुरुस्तीचे काम पॅचवर्क (Pothole Repair Work in Patchwork) मध्ये सुरु करण्यात आले असल्याचे पालिकेने दिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यापूर्वी मे महिन्यामध्ये निळवादळ चौक ते खानवस्ती येथे डांबरीकरणाचे काम पॅचवर्क मध्ये करण्यात आले होते. पावसाळा कालावधी (Rainy Season) मध्ये सदर पॅचवर्क मध्ये करण्यात आलेले डांबरीकरणाचे काम पूर्णतः निघालेले असून तेथे खड्डे पडलेले असल्याचे पालिकेने आपल्या पत्रात कबूल केले आहे.

 

 

तर पुणे महानगरपालिकेने कृती समितीला दिलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, सदरचे कामाचा कार्यादेश ठेकेदार कंपनी “गाजुल कन्स्ट्रक्शन” (Gajul Constructions) यांना देण्यात आलेला आहे व कामाची मुदत 9 महिने इतकी आहे. सदर कामामधून ठेकेदार यांनी कॅनॉल रस्त्यावरील सह्यादी संकुल पासून ते निळवादळ चौक - खान वस्ती या दरम्यान 440 रनिंग मीटरचे रस्त्याचे मिलींगचे (Road Milling Work) काम केलेले आहे. त्या मिलींग केलेल्या ठिकाणी जिथे खड्डे पडलेले आहेत ते खड्डे दुरुस्तीचे काम सुरु केलेले आहे. तसेच खानवस्ती दांगट इस्टेट (Dangat Estate) - दफनभूमी येथील 400 रनिंग मीटर कॅनॉल रस्त्याचे रुंदीकरणाचे (Warje Canol Road Winding) काम अस्तित्वातील रस्ता सोडून सुरु केलेले आहे. त्या रस्ता रुंदीकरणाच्या कामामध्ये खोदाई करणे, मुरुम पुरविणे, जीएसबी पुरविणे, डब्ल्यू. एम. एम. पुरविणे इत्यादी कामे सुरु केलेली आहेत. सदर रस्त्याच्या कामामध्ये थर्ड पार्टी यांनी टेस्टींग केल्यानंतर रस्त्याच्या कामाबाबत काही सुचना दिलेल्या आहे. त्या सुचनेप्रमाणे कॅनॉल रस्त्याचे काम करणे सुरु होते, परंतू सहयाद्री शाळा खानवस्ती दांगट इस्टेट या कॅनॉल रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पाऊस सुरु झाला असल्याने करता आले नसल्याचे पालिकेने कळवले असून, सदर कॅनॉल रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पाऊस उघडल्यानंतर पूर्ण करण्यात येईल, असे आपल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे तूर्तास तरी या भागातील फक्त खड्डे पॅचवर्क करुन बुजवण्यात येतील आणि पावसाळा संपल्यावर नवीन रस्ता करण्यात येणार असल्याची बाब समोर आली आहे.

 

 

यापूर्वी देखील वारजे विकास कृती समितीने कर्वेनगर (Karvenagar) ते जुना जकात नाका (Old Jakat Naka Warje) या टप्प्यात होत असलेल्या वाहतूक कोंडीबाबत (Traffic Jam) डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात (Dr Babasaheb Ambedkar Chowk) निदर्शने केली होती. त्यानंतर आता या रस्त्याच्या कामासाठी पुन्हा एकदा कृती समिती रस्त्यावर उतरणार होती. तर या रस्त्याच्या दुरावस्थेला महापालिका प्रशासन व ठेकेदार जबाबदार असून, सदरच्या प्रशासकीय अधिकारी व ठेकेदारावर कायदेशीर कार्यवाही (Legal Proceedings against PMC Pune and Road Contractor) करून, त्यांना बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी कृती समितीने एका पत्राद्वारे केली होती. तर पत्राची दखल न घेतल्यास मंगळवार दि. 8 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजता दशरथ दांगट चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्याबरोबरच, पुढील कालावधीत धरणे आंदोलने (Protest), मोर्चे, उपोषण (Hunger Strike) व न्यायालयामध्ये दाद मागण्याचा इशाराही दिला होता. मात्र पालिकेने दिलेल्या प्राथमिक आश्वासानंतर हे आंदोलन तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात आले आहे. (आपण पालिकेने कृती समितीला दिलेल्या पत्राची प्रत खाली वाचू शकता)

 

Te Rasta Roko movement suspended in Warje; See what is the reason

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.