Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 18 सप्टेंबर
2023 (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते आणि कट्टर
हिंदुत्ववादी व्यक्तिमत्व असलेल्या धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांची भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहर
अध्यक्षपदी (BJP Pune City
President) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)
यांनी निवड जाहीर केल्यानंतर तब्बल 2 महिन्यांनी शहरातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या
नियुक्त्या करण्याला मुहूर्त लागला असून, यामध्ये 18 उपाध्यक्ष (Vice President), 8 सरचिटणीस (General Secretary) आणि 18
चिटणीसांसह (Secretary), युवा
मोर्चा अध्यक्ष (BJP Yuva Morcha President), महिला
मोर्चा अध्यक्ष (BJP Mahila Morcha President), ओ.बी.सी.
मोर्चा अध्यक्ष (BJP OBC Morcha President), अनुसूचित
जाती मोर्चा अध्यक्ष (BJP Scheduled Caste
President), अल्पसंख्याक
आघाडी अध्यक्ष (BJP Minority Cell President) आणि व्यापारी
आघाडी अध्यक्षांची (BJP Merchant Cell President) नावे
जाहीर करण्यात आली आहेत. त्यात खडकवासला विधानसभा मतदार संघाला (Khadakwasla Vidhansabha) तब्बल
3 उपाध्यक्ष लाभले असून, 1 सरचिटणीस आणि 1 वारजे माळवाडी मधील माजी नगरसेवक किरण
बारटक्के (Kiran Bartakke)
यांची चिटणीस पदी निवड झाली आहे.
यामध्ये खडकवासला
विधानसभा मतदार संघातील उपाध्यक्षपदी निवड झालेल्यांमध्ये आंबेगावचे माजी
सरपंच अरुण राजवाडे (Arun Rajwade) यांची
फेरनिवड करण्यात आली आहे, तर माजी नगरसेविका मंजुषा नागपुरे (Manjusha Nagpure), आणि
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, माजी नगरसेवक हरिदास चरवड (Haridas Charwad)
यांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. तर भाजपा महिला आघाडी पुणे शहर प्रभारी, माजी
नगरसेविका वर्षा तापकीर (Varsha Tapkir)
यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. तर चिटणीसपदी माजी नगरसेवक आणि शहर
सुधारणा समितीची माजी अध्यक्ष किरण बारटक्के यांची निवड जाहीर झाली आहे. बारटक्के
यांनी 2007 ते 2012 पर्यंत वारजे माळवाडी भागातील नगरसेवक म्हणून दमदार कामगिरी
बजावली आहे. यामध्ये त्यांना शहर सुधारणा समितीचे अध्यक्षपद देखील भूषवण्यास
मिळाले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी वारजे माळवाडी मध्ये कै. ह.भ.प. अरविंद
बारटक्के रुग्णालय (Arvind Bartakke
Hospital), कै. ह.भ.प. गणपतराव बारटक्के जलतरण तलाव (Ganpatrao Bartakke Swimming Pool) आणि
ज्ञानेश्वरी उद्यान (Dnyaneshwari Garden) या 3
मोठ्या प्रकल्पांसह दिगंबरवाडी शाळेचे (Shamrao Barate School) नूतनीकरण
करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
हे आहेत शहराचे नवनियुक्त उपाध्यक्ष
१ विश्वास ननावरे (Vishwas Nanaware)
२ प्रशांत हरसुले (Prashant Harsule)
३ मंजुषा नागपुरे (Manjusha Nagpure)
४ जीवन जाधव (Jeevan Jadhav)
५ सुनील पांडे (Sunil Pandey)
६ शाम देशपांडे (Shyam Deshpande)
७ प्रमोद कोंढरे (Pramod Kondhare)
८ अरुण राजवाडे (Arun Rajwade)
९ तुषार पाटील (tushar Patil)
१० स्वरदा बापट (Swarda Bapat)
११ योगेश बाचल (Yogesh Bachal)
१२ भूषण तुपे (Bhushan Tupe)
१३ संतोष खांदवे (Santosh Khandave)
१४ महेंद्र गलांडे (Mahendra Galande)
१५ रुपाली धाडवे (Rupali Dhadawe)
१६ हरिदास चरवड (Haridas Charwad)
१७ गणेश कळमकर (Ganesh Kalamkar)
१८ प्रतिक देसर्डा (भा.ज.यु.मो. पुणे शहर प्रभारी) (Pratik Desarda)
हे आहेत शहराचे नवनियुक्त सरचिटणीस
१ वर्षा तापकीर (भा.ज.पा. महिला आघाडी पुणे शहर प्रभारी) (Varsha tapkir)
२ राजेंद्र शिळीमकर (Rajendra Shilimkar)
३ रवी साळेगावकर (Ravi Salegaonkar)
४ सुभाष जंगले (Subhash Jangale)
५ राघवेंद्र मानकर (Raghavendra Mankar)
६ पुनीत जोशी (Punit Joshi)
७ राहुल भंडारे (Rahul Bhandare)
८ महेश पुंडे (Mahesh Punde)
हे आहेत शहराचे नवनियुक्त चिटणीस
१ कुलदीप सावळेकर (Kuldeep Savlekar)
२ किरण कांबळे (Kiran Kambale)
३ किरण बारटक्के (Kiran Bartakke)
४ अजय खेडेकर (Ajay Khedekar)
५ आदित्य माळवे (Aditya Malve)
६ राहूल कोकाटे (Rahul Kokate)
७ विवेक यादव (Vivek Yadav)
८ उदय लेले (Uday Lele)
९ विशाल पवार (Vishal Pawar)
१० लहू बालवडकर (Lahu Balwadkar)
११ उमेश गायकवाड (Umesh Gaikwad)
१२ सुनील खांदवे (Sunil Khandave)
१३ प्रविण जाधव (Pravin Jadhav)
१४ हनुमंत घुले (Hanumant Ghule)
१५ रेश्मा सय्यद (Reshma Sayyad)
१६ अनिल टिंगरे (Anil Tingare)
१७ आनंद रिठे (Anand Rithe)
१८ दुष्यंत मोहोळ (Dushyant Mohol)
करण मिसाळ (Karan Misal) यांची युवा मोर्चा अध्यक्ष, हर्षदा फरांदे (Harshada Farande) यांची महिला मोर्चा
अध्यक्ष, नामदेव माळवदे (Namdeo Malwade) यांची ओ.बी.सी. मोर्चा अध्यक्ष, भीमराव साठे (Bhimrao Sathe) यांची अनुसूचित जाती
मोर्चा अध्यक्ष, इम्तियाज मोमीन
(Imtiyaz Momin) यांची अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष, उमेश शहा (Umesh Shaha) यांची व्यापारी आघाडी अध्यक्षपदी निवड
जाहीर करण्यात आली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या 9730307227 या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag
करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो
करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर
फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84