Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 23 सप्टेंबर
2023 (चेकमेट टाईम्स): काही दिवसांपूर्वीच पुणे शहर भाजपाच्या उपाध्यक्ष (Vice President of Pune City BJP), सरचिटणीस (Secretary General), चिटणीस (Secretary) यांच्यासह विविध सेलच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या शहर अध्यक्ष धीरज
घाटे (President of Pune City BJP Dheeraj Ghate) यांनी
केल्या. त्यातच विविध विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या (Vidhansabha) देखील करण्यात आल्या असून, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar
Bawankule) यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीची पत्रे देखील देण्यात
आली. मात्र आता त्यानंतर खडकवासला विधानसभा मतदार संघातील भाजपाच्या अध्यक्ष
(Khadakwasla Vidhan Sabha President) निवडीवरून पेल्यातील वादळे
उठली असून, मतदार संघाचा अध्यक्ष बदलायला (Change) हवा होता,
अशी मागणी कार्यकर्त्यांकडून नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर पुढे येऊ लागली आहे.
संघ परिवारापासून
(RSS) काम करत असलेल्या भाजपाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी
(BJP Old Activist) दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला विधानसभा मतदार
संघ अस्तित्वात आल्यापासून त्याचे अध्यक्षपद सध्याचे विद्यमान आमदार भिमराव तापकीर
(MLA Bhimrao Tapkir), मनोहर बोधे (Manohar Bodhe), अरुण राजवाडे (Arun Rajwade) यांनी सांभाळली आहेत.
यामध्ये मनोहर बोधे यांच्या कारकिर्दीत मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी लढवलेली 2009 ची विधानसभा निवडणूक (Khadakwasla Vidhan
Sabha Election) आणि त्यानंतर सध्याचे विद्यमान आमदार भिमराव तापकीर
यांनी लढवलेली 2011 ची विधानसभा निवडणूक अशा 2 विधानसभा निवडणुका झाल्या. मात्र तापकीर
यांच्या विजयानंतर 2013 ला बोधे यांना बाजूला सारत, आंबेगावचे (Ambegaon bk) माजी सरपंच अरुण राजवाडे यांना खडकवासला विधानसभा मतदार संघाची जबाबदारी
देण्यात आली.
राजवाडे यांच्या कारकिर्दीत 2014 साली झालेल्या खडकवासला विधानसभा
मतदार संघाच्या निवडणुकीत मोदी लाट (Modi Wave), बोधे यांनी केलेले काम, राष्ट्रवादीच्या
विरोधात असलेली नाराजी (Resentment against NCP) आणि त्यात
राजवाडे यांचे प्रयत्न, तापकीर यांचा मितभाषी स्वभाव (Reticent Nature MLA) याचे गुणमिलन होऊन तापकीर यांना चांगली आघाडी मिळत, ते दुसऱ्यांदा आमदार
झाले. मात्र दरम्यानच्या काळात एकीकडे भाजपाची देशभरात ताकद वाढत असताना, पक्ष
संघटनेत संघापासून काम करत असलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जाऊ लागले
(being Old Activist Dropped), जे आता देशपातळीवर पण पाहायला मिळते
आहे. फक्त काही लोकांच्या मर्जीतील लोकांना प्राधान्य देण्याची परंपरा रूढ होऊ
लागली. त्यामुळे खडकवासल्यातील जुन्या जाणत्या पक्षसंघटनेची ताकद कमी झाली
(BJP Strength Reduced in Khadakwasla) असून, ती वाढवण्यासाठी
कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही. किंबहुना जुन्यांना डावलून, फक्त इतर पक्षातून
येणाऱ्यांना (Other Party Activist) आता अधिकचा मान मिळू
लागला असल्याने जुने कार्यकर्ते एकीकडे रोष व्यक्त करताना, दुसरीकडे पक्षाशी
प्रामाणिक राहत आहेत.
मात्र काही महिन्यांपूर्वी संघातून आलेल्या तळागाळातील कार्यकर्ता
म्हणून ओळख असलेल्या कट्टर हिंदुत्ववादी धीरज घाटे यांच्याकडे नेतृत्व आल्यानंतर जुन्या
कार्यकर्त्यांना धुमारे फुटले होते. आता पुन्हा नेतृत्व बदल होईल. ज्या विचारांनी
पक्ष मजबूत करण्यासाठी अगोदरच्या कार्यकर्त्यांनी काम केले. त्या विचारांच्या कट्टर
हिंदुत्ववादी व्यक्तींना मतदार संघांची जबाबदारी सोपवण्यात येईल अशी आशा व्यक्त
केली जात होती. मात्र त्यात कोणताही बदल न करता, (Disappointment of BJP Activist) धीरज घाटे यांनी काही
लोकांच्या मर्जीतील लोकांना स्थान दिल्याने पक्षाच्या विचाराचे कार्यकर्ते नाराजी
व्यक्त करताना दिसत आहेत. त्यांना अजूनही अपेक्षा आहे की, धीरज घाटे यांनी
पक्षाच्या विचाराच्या, धीरज घाटे यांच्यासारख्या विचाराच्या व्यक्तीला खडकवासल्याची
जबाबदारी दिली पाहिजे. अन्यथा खडकवासल्यात मागच्या वेळी ज्या प्रमाणात पक्षाची
पीछेहाट (BJP Step Back in Khadakwasla) झाली, त्यापेक्षा
अधिक फटका बसून, मतदार संघ हातातून जायला वेळ लागणार नाही, इथेपर्यंतच्या
प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त होऊ लागल्या आहेत.
याबद्दल बोलताना कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक काही गोष्टी चेकमेट
टाईम्सच्या लक्षात आणून दिल्या आहेत. त्यामध्ये सध्याच्या फेरनिवड झालेल्या
अध्यक्षांची फेसबुकवर शेवटची पोस्ट 1 मे 2023 रोजी करण्यात आली आहे. त्या अगोदरची
पोस्ट आणि त्यांची एकूणच फेसबुकवरची उपस्थिती नाहीच्या बरोबर आहे. ट्विटर वर मे
2020 नंतर अद्याप कोणतेही ट्विट नाही की पक्षातील मान्यवरांच्या ट्विट’चे री-ट्विट
पण केले गेलेले नाही. इंस्टाग्रामवर दोनच पोस्ट आणि त्यातील शेवटची मागच्या वर्षी गांधी
जयंतीला केलेली आहे. व्हाट्स अॅप ग्रुप अथवा व्हाट्स अॅप पोस्टच्या माध्यमातून
देखील आवश्यक त्या प्रमाणात ते कार्यरत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष असतील की शहर
अध्यक्ष यांचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याचे साधे काम देखील करण्यात
सध्याच्या फेरनिवड झालेल्या अध्यक्षांना यश आलेले नाही (Re Elected Khadakwasla Vidhan Sabha President
Presence on Social Media). फक्त काही ठराविक लोकांना बरोबर घेऊन,
आमदारांच्या वाढदिवसाचे उपक्रम (Birthday Activities of MLA)
राबवण्यापलीकडे ते अपेक्षेप्रमाणे काम करताना दिसत नसल्याची तक्रार कार्यकर्ते
करताना (Complaints of BJP Activist) दिसतात.
एकूणच त्यांचे आतापर्यंतचे काम मतदार संघातील पक्ष बळकटीला हातभार लावणारे (Contributing to Strength of BJP in
Khadakwasla) दिसत नसल्याचे भाजपाचे निष्ठावान पदाधिकारी,
कार्यकर्ते कुजबुजत आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रितपणे (One
Nation, One Election) लढल्या गेल्या, जर बारामती लोकसभा (Baramati
Loksabha) भाजपाने लढवली, तर या सगळ्या गोष्टींचा फटका पक्षाला
बसेल, असा अंदाज व्यक्त होताना दिसतो आहे. सध्या फेर निवड करण्यात आलेले अध्यक्ष
फक्त शिफारसीवर झालेले अध्यक्ष (President on Recommendation) असून, त्यामुळे जर पक्षाला पीछेहाट झाली तर ते कधीही भरून न येणारे
नुकसान (Irreparable Loss) ठरेल. एकूणच पुन्हा खडकवासल्यात
पूर्वी प्रमाणे आघाडी घ्यायची असेल तर, फेरनिवड झालेल्या अध्यक्षांच्या कामाची
गुणवत्ता पडताळणी करावी (Quality Verification), अशी मागणी
होऊ लागली आहे. त्यावर आता शहर अध्यक्ष काय निर्णय घेतात, एकाच मतदार संघात
देण्यात आलेले दुसरे अध्यक्ष कितपत कामात आघाडी घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार
आहे.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून
आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक
करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share