Type Here to Get Search Results !

न्यू अहिरेगावात बांधकाम चालू असलेल्या इमारतीवरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Unfortunate death of a laborer after falling from a building under construction in New Ahiregaon


 

पुणे, दि. 14 सप्टेंबर 2023 (चेकमेट टाईम्स): न्यू अहिरेगावात (New Ahiregaon) बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या (Under Construction Building) तिसऱ्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू झाल्याची (Laborer Dies After Falling from Third Floor) दुर्दैवी घटना (Unfortunate Incident) समोर आली आहे. बाळू गोविंद माळी (वय. 44 रा. रामनगर, वारजे, पुणे) (Balu Govind Mali) असे इमारतीवरून पडल्याने मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. याबाबत वारजे पोलीस स्टेशन (Warje Police Station) मध्ये अकस्मात मयत दाखल करण्यात आला असून, वारजे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश बाबर (API Ramesh Babar) पुढील तपास करत आहेत.

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यू अहिरेगावातील विजयदुर्ग कॉलनी
(Vijaydurga Colony) मधील एका दोन मजली जुन्या इमारतीवर तिसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरु असून, तेथे बाळू माळी हे तीन ते चार मजूरांसह तेथे बांधकाम मजूर म्हणून कामाला गेले होते. दरम्यान, बुधवार दि. 13 सप्टेंबर 2023 दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान, जेवण केल्यानंतर माळी हे तिसऱ्या मजल्यावरून पडले. यावेळी मजुरांनी स्थानिकांसह माळी यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले (Moved to Hospital for Treatment). मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे (Death Before Treatment) रुग्णालय प्रशासनाने जाहीर केले. त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळून आल्या नाहीत. त्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव (Internal Bleeding) झाल्याने मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण (Cause of Death) समोर येईल, असे सहायक पोलीस निरीक्षक रमेश बाबर यांनी चेकमेट टाईम्सशी बोलताना सांगितले.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.