Type Here to Get Search Results !

नितीन गडकरींना महाराष्ट्राची जबाबदारी?; देवेंद्र फडणवीसांना केंद्रात पाठवण्याचे संकेत

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Maharashtra's responsibility to Nitin Gadkari?; A signal to send Devendra Fadnavis to the Centre


पुणे, दि.26 सप्टेंबर 2023 (चेकमेट टाईम्स): काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल (Viral Video) झालेला सर्वांनी पाहिला, त्यामध्ये सोनिया गांधी (Sonia Gandhi) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना नमस्कार करताना दिसत आहेत. तसाच दुसरा एक व्हिडीओ देखील आला, त्यामध्ये मोदी सर्वाना नमस्कार करत असताना, नितीन गडकरी (Nitin Gadakari) मात्र हात बांधून उभे आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले होते. मात्र त्यामागचे रहस्य (Behind the Scene) सूत्रांच्या हवाल्याने समोर आले असून, नितीन गडकरी हे मोदींवर नाराज असल्याचे समजते आहे. त्याचे कारण गडकरी यांची इच्छा नसताना, आता त्यांना केंद्रातून (National Politics) महाराष्ट्रात (Maharashtra Politics) पाठवण्याच्या हालचाली सुरु झाल्या असल्याचे समजते आहे.

 

 

शिवसेना (Shiv Sena) फोडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने भाजपाला (BJP) दिलेली साथ, त्यापाठोपाठ राष्ट्रवादी (NCP) फोडून अजित पवार (Ajit Pawar) भाजपाला मिळाले. या घटनांमुळे भाजपावर महाराष्ट्रात प्रचंड नाराजी असल्याचे केंद्राने केलेल्या सर्वेक्षणात (Political Survey) समोर आले आहे. यामध्ये सर्व खापर उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या डोक्यावर फोडले जात असल्याचे या सर्वेक्षणात समोर आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचा फटका (Set Back) आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये (Upcoming Loksabha & Vidhan Sabha Election) बसू शकतो. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत पक्षाला सावरण्याची गरज असल्याचे समोर आले आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्रातील कारभार कमी करून, त्याठिकाणी नितीन गडकरी यांना पुन्हा महाराष्ट्राची जबाबदारी दिल्यासच हे डॅमेज कंट्रोल (Damage Control) होईल असा निष्कर्ष या सर्वेक्षणातून समोर आला असल्याचे सूत्र सांगतात.

 

 

नितीन गडकरी यांची रस्ते बांधणीच्या कामामुळे (Road Development Work) देशात जशी चर्चा आहे, तशी महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रियता आहे. भाजपा मध्ये नितीन गडकरीच असे एकमेव नेते आहेत, ज्यांचे महाराष्ट्रातील सर्व पक्षांमध्ये मैत्रीचे चांगले संबंध आहेत. राष्ट्रवादीचे शरद पवार (Sharad Pawar) असतील की मनसे’चे राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याशी नितीन गडकरी यांची विशेष मैत्री (Political Friendship) आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी देखील गडकरींचे तसूभरही वैर नसून, ते कधीही एकमेकांवर टीका करताना दिसत नाहीत. किंबहुना नितीन गडकरी यांचा स्वभावच कोणावर टीका करण्याचा नसल्याने, त्यांची सर्व पक्षांमधील वरिष्ठांपासून कार्यकर्त्यांबरोबर मैत्रीचे संबंध असल्याचे दिसते. त्यामुळे भाजपाचे झालेले हे डॅमेज, कंट्रोल होईल असा निष्कर्ष काढला जात आहे.

 

 

त्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (BJP President J. P. Nadda) यांची विशेष यंत्रणा कामाला लागली असून, बैठकांचे सत्र सुरु झाले असल्याचे समजते. नड्डा यांच्या टीमने राज्यभरातील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून, याबाबत एक अहवाल तयार केला असून, तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शाह (Amit Shah) यांच्यासमोर मांडला असता, मोदी आणि शाह यांनी गडकरी यांना महाराष्ट्रात पाठवण्याला हिरवा कंदील (Green Signal) दाखवला असल्याचे समजते आहे. याबाबत नितीन गडकरी यांना मोदी, शाह आणि नड्डा यांनी सांगितले असता, गडकरी यांनी “मी केंद्रातच ठीक आहे” असे म्हणत महाराष्ट्रात जाण्यास नकार दिल्याचे समजते. मात्र पक्षाची गरज ओळखून मोदी, शाह आणि नड्डा गडकरींची मनधरणी करत असल्याचेही समजते आहे. यामुळे गडकरी त्यांच्यावर नाराज असल्याचे समजत असून, त्यामुळेच मोदींनी केलेल्या अभिवादनाला गडकरी यांनी प्रतिउत्तर दिले नसल्याचे समजते आहे.

 

 

सूत्रांनी असेही सांगितले की, नितीन गडकरींची वाढती लोकप्रियता (Publicity of Nitin Gadakari), सोशल मिडीयावर (Social Media Topics) गडकरीच प्रधानमंत्री (Prime Minister) व्हावेत अशा प्रकारच्या फिरत असलेल्या पोस्टमुळे, गडकरी प्रधानमंत्री पदाचे दावेदार होऊ शकतात, त्याचा धोका प्रधानमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी इच्छुक असलेल्या इतर नेत्यांना बसू शकतो. त्यामुळे गडकरी यांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवले तर एका स्पर्धक कमी होईल आणि पक्षाचे झालेले डॅमेजही कंट्रोल होईल, असा निष्कर्ष काढला जात आहे. त्यात दिल्ली (Delhi) ला महाराष्ट्राची ताकद (Capability of Maharashtra) माहित आहे. दिल्लीच्या तख्तावर एकदा महाराष्ट्राचा माणूस (Maharashtrian) बसला, तर तो हलणार नाही, याची दुसरी भिती कायम दिल्लीला सतावत असते, हा इतिहास (History of Delhi Chair) आहे. एकूणच काहीही झाले तरी पक्षनिष्ठ असलेले नितीन गडकरी लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणात (Nitin Gadakari for Maharashtra Politics) सक्रीय होण्याचे संकेत मिळत असून, फडणवीसांची केंद्रात (Devendra Fadnavis for Central Politics) बढती केली गेली असल्याचे बोलले गेल्यास वावगे वाटायला नको.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.