Type Here to Get Search Results !

कर्वेनगर मधील रत्ना हॉटेल, चांदणी गेटला बांधकाम विभागाचा दणका; अनधिकृत शेडवर कारवाई

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Construction Department raid on Hotel Ratna Cuisine, Chandni Gate Resto Bar in Karvenagar; Action on unauthorized sheds


 

पुणे, दि. 1 सप्टेंबर 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिका बांधकाम विकास विभाग (PMC Pune Construction Development Department) झोन क्र. 6 च्या माध्यमातून कर्वेनगर (Karvenagar) मधील काकडे सिटी (Kakade City) भागात असलेल्या रत्ना हॉटेल (Ratna Veg Cuisine), वनदेवी मंदिरासमोरील (Vandevi Mandir) चांदणी गेट रेस्टो बार (Chandani Gate Resto Bar), गांधीभवन (Gandhi Bhavan) भागातील अनधिकृत पत्राशेड, फ्रंट मार्जिनमध्ये पालिकेची कोणतीही परवानगी न घेता बांधण्यात आलेल्या कच्च्या आणि पक्क्या बांधकामावर कारवाईचा बडगा उगारत सुमारे 22 हजार चौरसफूट क्षेत्रफळ अनधिकृत कच्चे, पक्के बांधकाम निष्कासित (Construction Demolished) करण्यात आले.

 

 

बांधकाम विकास विभाग झोन क्र. 6 चे कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे (Executive Engineer Bipin Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता श्रीकांत गायकवाड (Deputy Engineer Shrikant Gaikwad), शाखा अभियंता मुकेश पवार (Branch Engineer Mukesh Pawar), कनिष्ठ अभियंता ईश्वर ढमाले (JE Ishwar Dhamale), सागर शिंदे (JE Sagar Shinde), कामिनी होलप (JE Kamini Holap) यांच्या पथकाने 2 जेसीबी, 1 गॅस कटर, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांच्या सहाय्याने अतिक्रमण विभागाच्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. यामध्ये वनदेवी मंदिरासमोर असलेल्या चांदणी गेट रेस्टो बारच्या पुढे पार्किंग करिता राखीव (Parking Reserved Space) असलेल्या मोकळ्या जागेत पुणे महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता, पत्र्याचे शेड मारून ग्राहकांना सेवा दिली जात होती. त्यामुळे ग्राहकांना आपली वाहने पदपथावर (Padestrian Path Parking) लावावी लागत होती. यामुळे पादचारी आणि वाहनचालकांना मोठ्या अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. याबाबत पुणे महानगरपालिकेला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सदरील शेड जेसीबीच्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले.

 

 

तर काकडे सिटी भागात असलेल्या रत्ना हॉटेलच्या टेरेस वर अनधिकृतरीत्या बांधण्यात आलेल्या पत्राशेडवर गॅस कटरच्या सहाय्याने कारवाई करत, पत्राशेड काढून टाकण्यात आले. त्याचबरोबर डी – मार्ट (D Mart Karvenagar) भागातील एका पत्राशेडवर देखील कारवाई करण्यात आली. रूफटॉप आणि साईड मार्जिनमध्ये चालवण्यात येणाऱ्या रेस्टारंट, हॉटेल, बार यांना अंकुश बसवण्यासाठी महापालिकेने आता कठोर पावले उचलली आहेत. शहरात टेरेस, इमारत, बंगला आदींचे साईड मार्जिनमध्ये (Side Margine) मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यवसाय बेकायदेशीरपणे सुरू आहे. प्रामुख्याने काही ठिकाणी पब (Pub) आणि हुक्का पार्लरही (Hukka Parlour) चालवले जातात. मागील वर्षभरात कोंढवा (Kondhva) आणि औंध (Aundh) येथे रूफटॉप हॉटेल्समध्ये आगीच्या घटना घडल्या. यानंतर टीका झाल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाने हॉटेलवर कारवाई करून अनधिकृतपणे उभारलेल्या शेड पाडून टाकल्या होत्या. मात्र असे असतानाही पुन्हा पुन्हा अतिक्रमणे होत असल्याने पालिकेने आता कारवाई मध्ये सातत्य ठेवण्याचे धोरण निश्चित केले असल्याचे शाखा अभियंता मुकेश पवार यांनी चेकमेट टाईम्सशी बोलताना सांगितले.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.