Type Here to Get Search Results !

ज्येष्ठाच्या विरोधापुढे मनपा प्रशासन हतबल; कारवाई अर्धवट टाकून परतण्याची नामुष्की

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Municipal administration is helpless before the opposition of the elder; A shame to leave the operation in Warje Tapodham area half way and return


 

पुणे, दि. 14 सप्टेंबर 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकेच्या (PMC Pune) बांधकाम विकास विभाग (Construction Development Department) झोन क्र. 3 च्या माध्यमातून वारजे तपोधाम (Warje Tapodham) परिसरात पालिकेची परवानगी न घेता बांधण्यात आलेल्या (Construction Without Permission) व्यावसायिक पत्राशेडवर करण्यात येत असलेल्या निष्कासन कारवाई मध्ये जागामालक असलेल्या ज्येष्ठ नागरिकाने (Senior Citizen) केलेल्या तीव्र विरोधानंतर (Strong Opposition) पथकावर कारवाई अर्धवट टाकून परतण्याची (Abort the Action and Return) नामुष्की ओढवली.

 

 

बुधवार दि. 13 सप्टेंबर 2023 दुपारी पुणे महानगरपालिकेचे पथक कारवाई करिता दाखल झाल्यानंतर पहिली कारवाई पूर्ण करून, दुसऱ्या कारवाईकरिता पथकाने तपोधाम परिसराकडे मोर्चा वळवला. येथील मेट्रो रेल्वे (Pune Metrol Rail Project) अथवा लाईट रेल ट्रांझिट (LRT - Light Rail Transit) आरक्षण बाधित (PMC Pune Reservation) असलेल्या जागेमध्ये पुणे महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता, बांधण्यात आलेल्या व्यावसायिक पत्राशेडवर कारवाई करण्यास सुरुवात केली असतानाच, दाखल झालेल्या जागामालकांनी कारवाईला तीव्र विरोध केला. यामध्ये येथील दोन पत्राशेड पाडल्यानंतर ज्येष्ठांचा विरोध आणखीन तीव्र झाला. यावेळी त्यांनी शिवीगाळ, दगडफेक करण्याचा पवित्रा घेत, जेसीबी समोर बसून, आंदोलन (Protest) सुरु केले.

 

 

यानंतर मात्र पालिकेच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने जवळपास एक तास ज्येष्ठांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्येष्ठ नागरिक काही केल्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते कडक उन्हात जेसीबी समोर बसून होते. काही केल्या ऐकत नव्हते. त्यांच्या या जागेवर 1992 साली आरक्षण टाकण्यात आले असून, पालिकेने कोणताही मोबदला देखील दिलेला नसून, बांधकामास परवानगी देखील देत नसल्याने, पालिकेने पैसे द्यावे (Compensation) आणि जागा ताब्यात घ्यावी, अन्यथा मोबदला देत नाही, तोपर्यंत कारवाई करू नये, असा कडक पवित्रा घेतला. सदर ज्येष्ठांची मागणी रास्त असल्याची चर्चा यावेळी उपस्थितांमध्ये होती. अखेर पालिकेच्या पथकाला कारवाई अर्धवट टाकून माघारी फिरावे लागले. सदर कारवाई मध्ये अंदाजे सुमारे 4 हजार 500 चौरसफूट अनधिकृत बांधकाम आणि पत्राशेड निष्कासित करण्यात आले आहे.

 

 

सदर कारवाई पुणे महानगरपालिकेचे अधिक्षक अभियंता युवराज देशमुख (Superintending Engineer of PMC Pune Yuvraj Deshmukh), बांधकाम विकास विभाग झोन क्र. 3 चे कार्यकारी अभियंता श्रीकांत वायदंडे (Executive Engineer Shrikant Waydande) यांच्या मार्गदर्शनाखाली उप-अभियंता निवृत्ती उतळे (Sub-Engineer Retirement), कनिष्ठ अभियंता योगेश भोसले (Junior Engineer Yogesh Bhosale), टूलीप इंजिनियर शुभांगी मेश्राम (Shubhangi Meshram), अंकुश तायडे (Ankush Tayade) यांच्या पथकाने अतिक्रमण विभागाकडील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात, 2 जेसीबी, 1 गॅस कटर, 1 ब्रेकर, 10 अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांच्या सहाय्याने ही कारवाई केली.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला गुगल न्यूजवर फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.