Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 13 सप्टेंबर 2023 (चेकमेट टाईम्स): आगामी विधानसभा
निवडणुकीच्या तयारीला लागा (Prepare
for Upcoming Vidhan Sabha Election), असे आदेश नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी
कॉंग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या बैठकीत (NCP Sharad Pawar Gat Meeting) पक्षाध्यक्ष शरद पवार
(NCP President Sharad Pawar) यांनी दिले आहेत. त्यात पुण्यातील हडपसर
विधानसभा मतदारसंघात (Hadapsar Vidhansabha) कामाला लागण्याचे
आदेश शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP Pune City President Prashant Jagtap) यांना दिले असल्याचे खुद्द प्रशांत जगताप यांनी माध्यमांशी बोलताना
सांगितले. त्याचबरोबर “संघर्ष विचारांचा, निर्धार विजयाचा ! लढणार आणि जिंकणार !” अशा आशयाची
फेसबुक पोस्ट (Facebook
Post) टाकत जगताप यांनी हडपसरचे रणशिंग फुंकले (Blew the Trumpet) आहे. त्यातच आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड विधानसभा मतदार
संघातून (Kothrud Vidhansabha) राष्ट्रवादी युवकचे शहर
अध्यक्ष (NCP Pune Youth President) किशोर कांबळे (Kishor
Kambale) यांना देखील तयारीला लागण्याचे आदेश (Preparation) दिले गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या बंडामुळे उभी फूट पडली आहे. पक्षामध्ये दोन गट पडले असून, एक गट सत्तेमध्ये (in Power) तर एक गट विरोधामध्ये
(in Opposition) आहे. अजित पवारांच्या बंडामुळे अनेक आमदार, जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये
विभागणी झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये जे काही 70-80 जागा राष्ट्रवादीकडे येतील तिथे जोरदार तयारी करण्याच्या
सूचना पक्षाध्यक्षांकडून देण्यात आल्या आहेत. त्यात पुण्यातील हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे
चेतन तुपे (MLA Chetan
Tupe) हे सध्या आमदार आहेत. मात्र प्रशांत जगताप यांना बैठकीमध्ये तयारीला
लागण्याचे आदेश देण्यात आले आहे. प्रशांत जगताप हे या आधी झालेल्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी देखील इच्छुक
उमेदवार (Interested
Candidate) होते. मात्र तेव्हा चेतन तुपे यांना संधी देण्यात आली. आता
मात्र शरद पवार गटाकडून हडपसर विधानसभा मतदारसंघाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा जगताप
यांनी व्यक्त केली असून, पक्षश्रेष्ठींनी तयारीचे आदेश दिले आहे. मधल्या काळात प्रशांत जगताप
पुणे शहर लोकसभेच्या (Pune
Loksabha) उमेदवारीसाठी देखील इच्छुक होते. त्यामुळे शहरात राष्ट्रवादीच्या
दोन उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरु झाली होती. मात्र त्यानंतर फुट पडली आणि
पोटनिवडणूक देखील लागण्याची चिन्हे दिसत नसल्याने तो विषय मागे पडला असून, आता विधानसभेची
तयारी सुरु करण्याचे आदेश दिले गेले असल्याचे दिसते.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या शहर युवक अध्यक्षपदी
निवड झाल्यापासून, प्रशांत जगताप यांच्याबरोबर सावलीप्रमाणे राहत असलेल्या किशोर
कांबळे यांना देखील कोथरूड विधानसभा मतदार संघातून तयारी करण्यास सांगितले
असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी
मध्ये फुट पाडल्यानंतर किशोर कांबळे हे जगताप यांच्याबरोबर अर्थात शरद पवारांबरोबर
राहिले. त्यानंतर प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात दिल्ली (Delhi) मध्ये शहरातील सर्व
पदाधिकारी मिळून शरद पवारांना पाठींबा देण्यासाठी गेले होते. त्यात कांबळे हे
समर्थकांसह (with Supporters) दिल्ली मध्ये दाखल झाले होते.
तर काही दिवसांपूर्वी मणिपूर (Manipur) मधील महिलांसोबत
रक्षाबंधन (Rakshabandhan) साजरे करण्याबाबरोबरच, त्यांना
मदतीचा हात (Helping Hand) पुढे करण्यात कांबळे जगताप
यांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसले. त्याचबरोबर युवकच्या शहर
अध्यक्षपदी निवड झाल्यापासून प्रशांत जगताप यांची त्यांनी क्षणासाठीही साथ सोडली
नसल्याने, त्यांना ही जबाबदारी दिली जाणार असल्याचे सूत्रांनी आवर्जून सांगितले. याबाबत किशोर कांबळे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या 9730307227 या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag
करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो
करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर
फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84