Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 1 सप्टेंबर 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे
माळवाडी (Warje
Malwadi) मधील अतुलनगर (Atulnagar) भागात
असलेल्या राघवदास शाळा (Raghavdas
Vidyalaya) सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेस वाहतुकीची कोंडी
(Traffic Jam) होत असल्याची बाब नित्याची झाली असून, त्यामुळे पालक
(Parents), विद्यार्थी (Students),
विद्यार्थ्यांना न्यायला येणारे ज्येष्ठ नागरिक (Senior Citizen), महिला (Women’s) आणि इतर वाहनचालकांना वाहतूक कोंडीत
अडकून पडावे लागत असल्याचे प्रकार दररोज (Daily Traffic Issue) घडत आहेत. त्यावर उपाययोजना करण्याची मागणी पालक आणि नागरिकांनी केली
आहे.
या शाळेच्या समोर तसा मोठा रस्ता आहे. मात्र काही
वाहनचालक रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्किंग (Both Side Parking) करतात. त्यातच शालेय विद्यार्थ्यांची
वाहतूक करणाऱ्या शाळेच्या बस (School Bus) वगळता, इतर
बाहेरील वाहनचालक विद्यार्थ्यांना सोडायला आणि घ्यायला आल्यानंतर प्रसंगी डबल
पार्किंग (Double Parking) करतात. अशावेळी कोणी ज्येष्ठ
नागरिक किंवा महिला आपल्या पाल्यांना सोडायला अथवा न्यायला आले असतील आणि त्याना
अडथळ्याला सामोरे जावे लागले आणि त्यांनी वाहन बाजूला घेण्याबाबत विनंती केली तर
या शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून, विशेषतः
रिक्षाचालकांकडून महिला, ज्येष्ठांना अर्वाच्य शब्दातील शिवीगाळ (Abusing
Words) ऐकून घ्यावी लागते. प्रसंगी हे रिक्षाचालक (Rickshaw
Drivers) अंगावर धावून येण्याच्या देखील घटना घडतात. मात्र मुलांसमोर
तमाशा नको, आपल्या मुलांना रोज शाळेत यायचे आहे, या भावनेतून पालक संयम बाळगतात.
मात्र यामुळे अशा बेशिस्त वाहनचालकांची मुजोरी
वाढली असून, त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी पालकांमधून होऊ लागली आहे. त्याला
काही इतर पालकही तेवढेच जबाबदार असून, आपल्या मुलांना सोडायला अथवा न्यायला येताना,
ते पालक देखील बेशिस्तपणे वाहने
(Mannerless Parking) लावतात, त्याचे पर्यवसन वाहतूक कोंडीत होत
असल्याचे पालकांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर चेकमेट टाईम्सशी बोलताना
सांगितले. यामध्ये विशेषतः जवळपास राहणाऱ्या नागरिकांची अधिक दादागिरी (Local
Parents Bullying) असून, भांडणे नको म्हणून महिला आणि ज्येष्ठ नागरिक
वादात पडत नाहीत. मात्र याबाबत शाळा प्रशासन (School Administration), सामाजिक संस्था (Social Institutions) अथवा पोलीस
प्रशासनाने (Police Administration) शाळा भरण्याच्या आणि
सुटण्याच्या वेळांमध्ये वाहतुकीची आणि पार्किंगची व्यवस्था लावण्याबाबत नियोजन
करणे गरजेचे असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले असून, भविष्यात एखादी मोठी घटना
घडण्यापूर्वी, उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या 9730307227 या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag
करा. खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो
करा...!
आम्हाला गुगल न्यूज’वर
फॉलो करा: https://news.google.com/s/CBIw3PaDon8?sceid=IN:mr&sceid=IN:mr&sceid=IN:mr&r=0&oc=1
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes