Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 12 ऑक्टोबर 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे पोलीस
स्टेशनचे (Warje Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक
सुनील जैतापुरकर (PI Sunil Jaitapurkar) यांचे अनोख्या
गुन्ह्याने स्वागत करणाऱ्या अक्षय सावंत (Akshay Sawant)
याच्यासह मंगेश कदम’ला (Mangesh Kadam) पुणे जिल्हा, पिंपरी
चिंचवड आणि सातारा जिल्ह्यातून (Pune – Pimpri Chinchwad – Satara District) जैतापुरकर यांनी 2 वर्षांकरिता तडीपार (Deportation)
केले आहे. परिमंडळ 3 चे पोलीस
उप-आयुक्त सुहेल शर्मा (DCP Suhail
Sharma) आणि कोथरुड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे
(ACP Bhimrao Tele) यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत वारजे पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या (Warje Malwadi Police Station) हद्दीमधील
रेकॉर्डवरील आरोपी (Accused on Record) अक्षय शांताराम सावंत
(रा. कर्वेनगर, पुणे) (Akshay Shantaram Sawant) याच्यावरती मारामारी
करणे, अवैधरित्या दारु
विक्री करणे असे गुन्हे दाखल असून, मंगळवार दि.20 जून 2023 रोजी पहाटे 2 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत 8 जणांच्या
टोळक्याने कर्वेनगर (Karve Nagar) आणि सहकारनगर (Sahakar
Nagar) मध्ये धुडगूस घालत जवळपास 45 वाहनांच्या
काचा फोडल्याची घटना घडली होती. यामध्ये रस्त्यावरून जात असलेल्या तिघां
निष्पापांवर या टोळक्याने हल्ला केला होता. यातील अनुप अनंता वाळंजकर (Anup
Walunjkar) याला गंभीर दुखापत झालेली होती, तर
यासिन इस्माईल शेख (Yasin Ismail Shaikh) आणि विशाल विष्णू
चाटे (Vishal Vishnu Chate) हे या हल्ल्यात जखमी झाले होते.
यानंतर वारजे पोलिसांच्या तपास पथकाने (Detection Branch)
तपासाची चक्रे फिरवत 2 अल्पवयीनांसह पपुल्या उर्फ दिग्विजय
तुकाराम वाघमारे (Papulya alias Digvijay Tukaram Waghmare), नितीन सुरेश गडदे (Nitin Suresh Gadade), देविदास
बसवराज कोळी (Devidas Basawraj Koli) आणि भगवान धाकलू खरात
(Bhagwan Dhakalu Kharat) या 4 जणांना ताब्यात
घेतले होते. यातील पपुल्या वाघमारे टोळीवर एक नव्हे, दोन नव्हे तर तीन मोक्काचे
गुन्हे (MCOCA) दाखल झाले आहेत.
मात्र पपुल्या वाघमारेने हे कांड केले ते ठिकाण आणि
त्याला कारणीभूत अक्षय सावंत याची रात्रभर चालू असलेली बेकायदा मद्य विक्री (Illeagal Liquor Sales) असल्याचे पोलिसांच्या
तपासात समोर आले. त्याचबरोबर यापूर्वीही अनेक वेळा अक्षय सावंत याच्यावर मारामारी करणे, अवैधरित्या दारु विक्री करणे असे गुन्हे
दाखल आहेत. त्याला वारंवार समज देऊन देखील त्याच्या वर्तणुकीत सुधारणा होत
नसल्याने त्याच्यावर दोन वर्षाकरिता पुणे जिल्हा, पिंपरी चिंचवड आयुक्तालय आणि
सातारा जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली असल्याचे वारजे पोलिसांनी
चेकमेट टाईम्सशी बोलताना सांगितले.
त्याचबरोबर मंगेश
गंगाराम कदम (रा. रामनगर, वारजे माळवाडी, पुणे) (Mangesh Gangaram Kadam) याचेवरती शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध
गुन्हे दाखल आहेत. त्यांचेमुळे वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सामान्य
नागरीकांच्या मनामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे सदर गुन्हेगारीला
आळा घालण्यासाठी त्यांचेवरती वारजे माळवाडी पोलीस स्टेशनकडुन हद्दपारीचा प्रस्ताव सादर
करून, त्यालाही दोन वर्षाकरीता पुणे पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे जिल्हा व सातारा जिल्हा कार्यक्षेत्रातून
हद्दपार करण्यात आले आहे. मंगेश कदम याने महिला दिनाच्या (Womens Day) दिवशीच, महिला
दिनाची रॅली संपवून घरी परतणाऱ्या एका समुदायाच्या महिलेची छेडछाड केली होती.
यामुळे वारजे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा (Law and Order) मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र वारजे पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी
मोठ्या शिताफीने हद्दीतील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न केले आणि
त्यात ते यशस्वी ठरले होते.
या
पार्श्वभूमीवर परिमंडळ 3 चे पोलीस उप-आयुक्त सुहेल शर्मा आणि कोथरुड विभागाचे सहायक
पोलीस आयुक्त भिमराव टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ
पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर
(PI Sunil Jaitapurkar), पोलीस निरीक्षक
(गुन्हे) अजय कुलकर्णी (PI Ajay
Kulkarni) यांच्या आदेशान्वये
निगराणी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विशाल मिंडे (PSI Vishal Minde), तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र
मुंढे (PSI Narendra Mundhe), पोलीस अंमलदार संभाजी दराडे (Sambhaji Darade), पोलीस अंमलदार विजय खिलारी (Vijay Khilari), पोलीस अंमलदार अजय कामठे (Ajay Kamthe) व पोलीस अंमलदार प्रतिक
मोरे (Pratik More) यांनी ही कारवाई केलेली आहे.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून
आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक
करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share