Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 12 ऑक्टोबर 2023 (चेकमेट टाईम्स): उत्तमनगर पोलीस
स्टेशन (Uttamnagar Police Station) हद्दीमधून एक धक्कादायक
घटना (Shocking Incident) समोर आली असून, भर वर्दळीच्या
रस्त्यावर, दिवसा उजेडी एका 10 वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न (Attempt
to Kidnap) झाला आहे. अपहरणाचा प्रयत्न करत, विनयभंग (Molestation) केलेप्रकरणी 23 वर्षीय तरुणाला गजाआड करण्यात उत्तमनगर पोलिसांना यश आले
आहे. मात्र भरदिवसा ही धक्कादायक घटना घडल्याने या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे
वातावरण पसरले असून, हद्दीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गस्त वाढवण्याची मागणी
(Patroling) नागरिकांमधून होऊ लागली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या
माहितीनुसार, सदरील 10 वर्षांची मुलगी मंगळवार दि.10 ऑक्टोबर 2023 सायंकाळी 6
वाजण्याच्या सुमारास शिकवणी (Tuition) वरून घरी जात असताना, कोंढवा गेट (Kondhwa Gate)
समोर मागून लाल रंगाचा टी शर्ट आणि नारंगी रंगाची पँट घातलेल्या तरुणाने त्या
मुलीला मागून आवळून धरत, उचलून नेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या ठिकाणी नुकतेच
दोन तरुण दुचाकीवरून येऊन थांबले होते, शिवाय काही महिला देखील रस्त्यावर होत्या. त्यांच्यासमोर
या तरुणाने हे गैरकृत्य (Misdemeanor) केले. यावेळी मुलीने
त्या तरुणाच्या कृतीला जोरदार विरोध करत आरडाओरडा केला. हे पाहून दुचाकीवरील एका
तरुणाने लगेच त्या मुलीला, त्या तरुणाच्या तावडीतून सोडवत, त्याला प्रसाद देऊन
पकडून ठेवले.
याबाबत लगेचच उत्तमनगर
पोलिसांना (Uttam Nagar Police) झाल्या घटनेची
माहिती देण्यात आली. पोलीस दाखल होईपर्यंत नागरिकांनी संबंधित तरुणाला पकडून ठेवले
होते. पोलीस आल्यानंतर नागरिकांनी तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी
त्याला उत्तमनगर पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली असता, त्याने आपले नाव धरमगिरी
प्रेमगीरी गोस्वामी (वय 23 रा. एनडीए, पुणे)
(Dharamgiri Premgiri Goswami) असल्याचे सांगितले. मुलीच्या आईच्या
फिर्यादीवरून त्याच्यावर पोक्सो (POCSO Act) आणि अपहरणाच्या
(Kidnapping) प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, धरमगिरी
गोस्वामी याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दादाराजे
पवार (API Dadaraje Pawar) करत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून
आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक
करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share