Type Here to Get Search Results !

खंडणीच्या मागणीसाठी कॅबचालकाचे कॅबसह अपहरण करणारे अपहरणकर्ते गजाआड; वारजे पोलिसांची कामगिरी

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news

 

Kidnappers abduct cab driver with cab for ransom demand; Performance of Warje Police


 

पुणे, दि. 17 ऑक्टोबर 2023 (चेकमेट टाईम्स): सिंहगड रोडवरून (Sinhgad Road) हडपसर’ला (Hadapsar) जाऊन परत येण्यासाठी लोकल ट्रिपचे बुकिंग (Local Cab Booking) घेतलेल्या वारजे (Warje) मधील कॅबचालकाचे कॅब’सह अपहरण (Cab Driver Kidnapped with Car) करून, त्यांची सुटका करण्यासाठी कॅबचालकाच्या कुटुंबियांकडे खंडणी (Extortion) मागणाऱ्या अपहरणकर्त्यांना औरंगाबाद मधून अटक करण्यात (Kidnappers Arrested from Aurangabad) वारजे पोलिसांना (Warje Police) यश आले आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांनी यापूर्वी अशाप्रकारचे अनेक गुन्हे केलेले असून (Wanted Criminals), ते पुण्यातील अनेक पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी या संशयितांच्या मागावर होते. असे असताना त्यांच्या मुसक्या आवळण्याची कामगिरी वारजे पोलिसांनी केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

 

 

याबाबत वारजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे मधील कॅबचालक असलेल्या 42 वर्षीय व्यक्तीस, सिंहगड रोड’वरून एका प्रवाशाला घेऊन हडपसर येथे जायचे आहे आणि तेथून परत यायचे आहे, अशाप्रकारची लोकल ट्रीप शनिवार दि.14 ऑक्टोबर 2023 एका पर्यटन कंपनीच्या (Tours & Travels Company) मध्यस्थीने मिळाली होती. त्यानुसार कॅबचालकाने मिळालेल्या पत्त्यावरून आपल्या स्विफ्ट डिझायर क्र. MH 12 SF 2485 मधून प्रवाशांना घेऊन हडपसरच्या दिशेने प्रस्थान केले. मात्र दरम्यानच्या काळात कॅबचालकाला मारहाण करून, त्याच्या कुटुंबियांकडून 10 हजार रुपयांची खंडणी मागत, अपहरणकर्त्यांनी चालकाला सासवड (Saswad) येथे नेले. यावेळी भयभीत झालेल्या कॅबचालकाच्या कुटुंबीयांनी वारजे पोलीस स्टेशन (Warje Police Station) मध्ये धाव घेत, मदत मागितली.

 

 

अपहरणाची माहिती मिळताच, परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma), कोथरूड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त भीमराव टेळे (ACP Bhimrao Tele) यांचे आदेशान्वये, वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर (PI Sunil Jaitapurkar), पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय कुलकर्णी (PI Ajay Kulkarni) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्याने तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे (PSI Narendra Mundhe), पोलीस हवालदार प्रदीप शेलार (Pradip Shelar), पोलीस नाईक हनुमंत मासाळ (Hanumant Masal), पोलीस शिपाई विजय भुरूक (Vijay Bhuruk), अजय कामठे (Ajay Kamthe), श्रीकांत भांगरे (Shrikant Bhangare) यांच्या पथकाने निरनिराळ्या पद्धतीने तांत्रिक तपास (Technical Analysis) सुरु केला. यामध्ये सदरील अपहरण करण्यात आलेल्या चालकाचे लोकेशन (Mobile Location) सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात (Madha, Solapur) दिसत होते. दरम्यान, पोलिसांचा तपास सुरु असताना कॅब चालकाच्या कुटुंबीयांनी अपहरणकर्त्यांच्या मागणीनुसार चालकाच्या खात्यात 10 हजार रुपये टाकले. यादरम्यान वारजे पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर होते. मात्र ते जागा बदलत असल्याने हाती येत नव्हते.

 

 

पैसे खात्यात आल्यानंतर अपहरणकर्त्यांनी टेंभूर्णी (Tembhurni) मधील एका पेट्रोल पंपावर (Petrol Pump in Tembhurni) कार्ड स्वाईप (Debit Card Swipe) करून 10 हजार रुपये काढून घेतले. याबाबतची माहिती मिळताच, पोलिसांचे पथक तिथे पोचले, मात्र तोपर्यंत त्यांनी जागा बदलली होती. मात्र या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) मध्ये आरोपीचा चेहरा पोलिसांना मिळाला. त्यांनी त्या चेहऱ्याच्या व्यक्तीचा शोध चालू केला असता, तो सिंहगड रोड पोलिसांना हवा असलेला आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान पोलीस त्यांचा शोध घेत असताना, त्यांचे लोकेशन औरंगाबाद (Aurangabad) येथे येत असल्याचे समोर आल्यानंतर, तत्काळ औरंगाबाद गुन्हे शाखेच्या (Aurangabad Crime Branch) मदतीने, सिडको (CIDCO) येथे सापळा रचून गाडीसह अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळण्यात वारजे पोलिसांच्या पथकाला अखेर यश आले.

 

 

यानंतर वारजे माळवाडी पोलीसांनी कॅब चालक सुनील शंकर हाके (वय 42 वर्ष, रा. स्वेदगंगा सोसायटी, वारजे माळवाडी, पुणे) (Sunil Shankar Hake) यांची सुटका करत, त्यांच्या फिर्यादीवरून रेकॉर्डवरील आरोपी, अपहरणकर्ते सुनील लक्ष्मण गवळी (वय 40 वर्ष, रा. धायरी फाटा, जयभवानी हॉटेल जवळ, धायरी, पुणे) (Sunil Lakshman Gawali - Age 40 years, Res. Dhayari Fata, Near Jaibhavani Hotel, Dhayari, Pune) आणि शरद मोहन पंडित (वय 45 वर्ष, रा. गेवराई, बीड) (Sharad Mohan Pandit - Age 45 years, Res. Gevrai, Beed) यांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. या मधल्या काळात अपहरणकर्त्यांनी कॅब चालक सुनील हाके यांच्या जीवाचे काही बरे वाईट तर केले नसेल ना, ते सुरक्षित असतील ना याबाबत वारजे पोलिसांना चिंता सतावत होती. मात्र हाके यांना मारहाण करून, त्यांच्याजवळ बंदुक (Pistol) असल्याची बतावणी करून, त्या बंदुकीने गोळी मारून (Firing) जीव घेण्याची धमकी देत, अपहरणकर्ते फिरवत असल्याचे समोर आले आहे. यातील अपहरणकर्ते सुनील गवळी आणि शरद पंडित यांनी असे अनेक गुन्हे केल्याचे समोर येत असून, ते या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांचा शोध शहरातील अनेक पोलीस घेत असल्याचेही समोर आले आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.