Type Here to Get Search Results !

समस्त हिंदू आघाडीच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Celebrating National Unity Day on behalf of Samast Hindu Aghadi


 

पुणे, दि. 18 ऑक्टोबर 2023 (चेकमेट टाईम्स): ज्या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी लाखो अनुयायांसह बौध्द धम्मात प्रवेश केला, तो धम्मचक्र प्रवर्तन दिन (Dhamma Chakra Pravartana Day) अर्थात “राष्ट्रीय एकात्मता दिन” (National Integration Day) समस्त हिंदू आघाडीच्या (Samast Hindu Aghadi) वतीने राष्ट्रसंत गाडगे महाराज धर्मशाळा, सोमवार पेठ, पुणे (Rashtrasant Gadge Maharaj Dharamshala) येथे साजरा करण्यात आला. यावेळी भगवान बुद्ध (Lord Buddha), राष्ट्रसंत गाडगेबाबा (Rashtrasant Gadgebaba) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. तर नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ते व विधिज्ञ असे अॅड. मकरंद आडकर (Supreme Court Lawyer Adv. Makarand Adkar) यांचे प्रमुख मार्गदर्शन उपस्थितांना लाभले.

 

 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे (Milind Ekbote) यांनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रति कृतज्ञता (Gratitude) व्यक्त केली. त्यांच्या राष्ट्रभक्ती (Patriotism) बद्दल गौरवोद्गार काढताना, त्यांच्या प्रेसचे नाव भारत प्रेस (Bharat Press), नियतकालिकाचे नाव प्रबुध्द भारत (Prabuddha Bharat), असल्याची आठवण उपस्थितांना करुन दिली. डॉ. बाबासाहेबांनी शोषितांच्या न्याय हक्कांसाठी दिलेला लढा असामान्य होता, त्याची दखल घेऊन भारताचे संविधान (Constitution of India) बनवण्याची जबाबदारी भारताच्या नेतृत्वाने बाबासाहेबांवर सोपवली, हे भारताचे वेगळेपण आहे असे त्यांनी यावेळी नमूद केले.

 

 

तर नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ते व विधिज्ञ असे अॅड. मकरंद आडकर यांनी, महामानवाचा केवळ जयजयकार न करता, त्यांना मानणे, त्यांना जाणणे आणि आचरणात आणणे या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत असा मौलिक सल्ला दिला. हिंदू धर्माचा त्याग करताना बाबासाहेबांनी ख्रिश्चन, इस्लाम व शीख (Christianity, Islam and Sikhism) या प्रमुख पंथांचा तौलनिक अभ्यास (Comparative Study) करुन मगच बौध्द धम्मात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. 14 ऑक्टोबरला जाहीर धर्मांतर करण्याच्या आधीच्या दिवासापर्यंत डॉ. बाबासाहेब हे “बुध्दा अँड हीज धम्म” (Buddha and his Dhamma) या ग्रंथाच्या तयारीत व्यस्त होते. या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी शासनाला मागितलेल्या व शासनाने नाकारलेल्या अनुदानाची (Grant) दुर्दैवी बाब अॅड. मकरंद आडकर यांनी मार्गदर्शनात व्यक्त केली. अखेरच्या काळापर्यंत संघर्ष करणाऱ्या बाबासाहेबांचे अपरिमित श्रम त्यांनी अधोरेखित केले. शुद्र हे मूळचे क्षत्रिय आहेत (Shudras are Kshatriyas by Origin), हे बाबासाहेबांनी त्यांच्या "हू वेअर द शूद्राज्? (Who Were The Shudras?) अर्थात शूद्र कोण होते? या ग्रंथात सिध्द केले आहे. भगवान गौतम बुध्दांच्या पंचशीलाचे आचरण प्रत्येकानी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ऋग्वेद (Rigveda) वगळता इतर तीन वेदांमध्ये शूद्र वर्णाचा उल्लेखही आढळत नाही. त्यामुळे वर्णभेदावर कडाडून टीका करताना, त्यांनी वर्णभेद हा ऋग्वेदांमध्ये कशा पध्दतीने घुसडले आहेत, यावर अभ्यासपूर्ण भाष्य केले.

 

 

याप्रसंगी प्रतिकूल परिस्थितीत सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा व युवा उद्योजकांचा सत्कार अॅड. आडकर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत वाघचौरे (Abhijeet Waghchaure) यांनी केले. तर प्रीतम गीते (Pritam Gite), बाळा विश्वासराव, संतोष गायकवाड, विजय एनिला, स्वप्निल मालेगावकर, शुभम चव्हाण यांनी कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन केले.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.