Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news
पुणे, दि. 16 ऑक्टोबर 2023 (चेकमेट
टाईम्स): इंडिया आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामना (India vs Pakistan Cricket) एकीकडे रंगत आलेला असताना, इकडे फलटण (Phaltan)
वरून गोमांस (Cow Meat) घेऊन मुंबईच्या (Mumbai) दिशेने जात असलेल्या आलिशान होंडा सिटी (Cow Meat Smuggling in
Honda City) मोटारीसह दोघांना गजाआड करण्यात वारजे पोलिसांना
(Warje Police) यश आले आहे. सादर वाहनातून गोमांसाची तस्करी सुरु
असल्याची माहिती मानद
पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी (Honorary Animal Welfare Officer Shivshankar Swami) यांना
मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या सहकाऱ्यांनी महामार्गावर पाळत ठेवत (Surveillance
on Highway), सदरील वाहनाला वारजे पोलिसांच्या मदतीने अडवून, ही
कारवाई केली.
याबाबत वारजे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दि. 14 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 11
वाजण्याच्या सुमारास, चांदणी चौकात (Chandani Chowk) संशयित आरोपी मुनावर फिरोज खान (वय 23
वर्षे, रा. अमीनाबी चाळ, अकसा मसजिद, जुहू गल्ली, वायरलेस रोड, अंधेरी, मुंबई) (Munawar Feroze Khan - Age 23 Years, Res.
Aminabi Chawl, Aksa Masjid, Juhu Galli, Wireless Road, Andheri, Mumbai) आणि याकुब चांद शेख (वय 23 वर्षे, रा. लोकसेवा येदीहात कमिटी, जुहू गल्ली, वायरलेस
रोड, अंधेरी, मुंबई) (Yakub Chand
Shaikh - Age 23 Years, Res. Lokseva Yedihat Committee, Juhu Galli, Wireless
Road, Andheri, Mumbai) अशी या गोमांस तस्करी प्रकरणी अटक करण्यात
आलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघे गोल्डन रंगाची होंडा सिटी (Golden
Honda City) चारचाकी गाडी क्रमांक MH 01 PA 9588 मधुन गोवंश सदृश जनावरे कापुन, त्यांचे मांस बेकायदेशिरपणे कोणताही परवाना
नसताना, सातारा (Satara) जिल्हयातील फलटण या भागातून फलटण ते
मुंबई अशी वाहतुक करत असताना, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे (Mumbai Pune
Express Highway) वर चांदणी चौक जवळ मिळुन आले.
याबाबत त्यांच्यावर
गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्यासह फलटण भागात गायी व वासरे कापणारे, गोमांस विकत घेणारे व होंडा सिटी
चारचाकी गाडी मालकावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 (Maharashtra
Animal Protection Act) अन्वये कायदेशिर कारवाई (Legal Action) करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून 2 लाख रुपये किमतीची होंडा सिटी
मोटार आणि अंदाजे 400 किलो वजनाचे 72 हजार रुपये किमतीचे गोमांस जप्त करण्यात आले
आहे. याबाबत कृष्णा तुळशीराम सातपुते (वय 23 वर्षे, रा. गोकुळनगर पठार, वारजे माळवाडी, पुणे)
(Krishna Tulshiram Satpute) यांनी फिर्याद दिली असून, न्यायालयाने अटक करण्यात आलेल्या संशयितांना
बुधवार दि.18 ऑक्टोबर 2023 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत मानद पशुकल्याण
अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दि. 14 ऑक्टोबर 2023 रोजी
रात्री 10 वाजता फलटण येथून गाई व बैलाचे मांस घेऊन सोनेरी रंगाची होंडा सिटी
मोटार मुंबई कडे जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शिवशंकर स्वामी
यांनी त्यांचे विश्वासू सहकारी कृष्णा सातपुते यांना सदर वाहन पोलिस प्रशासनाच्या मदतीने
चौकशी करण्यास सांगितले. त्यानुसार स्वामी यांचे सहकारी नवले ब्रिज येथे थांबले असता,
त्यांना सदर होंडा सिटी मोटार क्र. MH 01 PA 9588 समोरून येताना दिसली. यावेळी कृष्णा
सातपुते यांनी त्या मोटारीचा पाठलाग करून, वारजे पोलिसांच्या मदतीने चांदणी चौक येथे
सदर वाहन थांबवून चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र
पोलिसांनी मोटारीतील त्या तरुणांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी
संपूर्ण माहिती दिली.
यावेळी वारजे पोलिस
स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर (PI Sunil Jaitapurkar), सहायक पोलीस निरीक्षक बापू रायकर (API Bapu Raikar) यांच्या
पथकाने मोटार ताब्यात घेऊन, पंचनामा करत, संशयितांना अटक केली. दरम्यान
न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर राजा बहादूर मिलच्या मागे असलेल्या दाहिनीमध्ये या
गोमांसाची विल्हेवाट लावण्यात आली. या कारवाईत गोरक्षक शिवशंकर स्वामी यांचे विश्वासू
सहकारी कृष्णा सातपुते, अनिल डाउल, योगेश तनपुरे, श्रेयस शिंदे, अनिस अत्रे, निखिल वेडे पाटील, कुमार आंबेडे, कृष्णा मैड, करण रनसिंग, गौरव येडगे, सागर धिडे, वेंकटेश सहाणे, किरण भागवात, दीपक गवळी, राजू पाटील, रोहित मारणे यांच्यासह 15 ते 20 गोरक्षकांनी
सहभाग घेतला होता. ऐन बैलपोळ्याच्या सणाला मोठ्या प्रमाणात गोवंशाची हत्या करत,
त्याची वाहतूक केली जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
गोवंश
तस्करीसाठी वाहनाची विशेष व्यवस्था
आतापर्यंत
वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक गोमांस, मांगूर माश्यांच्या तस्करीच्या घटना
उघडकीस आल्या आहेत. यावेळी या वाहनांचे निरीक्षण केले असता, त्या वाहनांमध्ये
विशेष रचना केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. तशीच व्यवस्था आपण छायाचित्रात
पाहू शकता, MH 01 PA 9588 हा होंडा सिटी मोटारीच्या मागचे सस्पेन्शन आवश्यक ते बदल करून उंचावण्यात
आले आहे. ज्यामुळे गाडीच्या डिकीत शेकडो किलो वजन टाकले तरी, रस्त्यावर धावताना
गाडी सरळ दिसेल. एवढी काळजी घेतली जात असेल आणि अशा प्रकारची वाहने तस्करीसाठी
वापरली जात असतील, तर हे वाहन एकदा नव्हे तर अनेकदा वापरले जात असणार यात शंका
नाही. मात्र एवढ्या मोठ्या पल्ल्यात ही तस्करी राजरोस चालू असताना याबाबत स्थानिक
पोलीस, महामार्ग पोलीस, वाहतूक पोलीस, टोल यंत्रणा यातील कोणालाच काही कसे माहित नसावे?
त्यांना संशय येत नसावा का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून
आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक
करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share