Type Here to Get Search Results !

गॅस एजन्सी चालकांना धमकावुन खंडणी मागणारे दोन जण गजाआड; उत्तमनगर पोलीसांची कारवाई

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news

 

Two men who threatened gas agency drivers and demanded extortion; Uttamnagar police action



 

पुणे, दि. 6 ऑक्टोबर 2023 (चेकमेट टाईम्स): घरगुती गॅस एजन्सीचे (Domestic Gas Agency) चालक व कामगारांना धमकावुन (Threatening) दरमहा 15 हजार रुपये खंडणी (Extortion) मागणाऱ्या दोघांना, खंडणी स्वीकारत असताना, रंगेहाथ पकडण्यात (Caught Red-Handed) उत्तमनगर पोलिसांना (Uttamnagar Police) यश आले आहे. याबाबत चंदनसिंग भवरसिंग भाटी (वय.23, रा.डोणजे, तालुका – हवेली, जि. - पुणे) (Chandansingh Bhavarsingh Bhati) यांनी उत्तमनगर पोलिसात तक्रार दिली आहे. (Pune Crime News)

 

 

याबाबत उत्तमनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवणे (Shivane), कोंढवे धावडे (Kondhave Dhawade), न्यू कोपरे (New Kopare), वारजे (Warje) या भागामध्ये वेगवेगळ्या गॅस एजन्सीचे डिलेव्हरी बॉयना (Gas Cylider Delivery Boy) अडवून, “मी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन संघटनेचा अध्यक्ष आहे”, (Anti-Corruption Jan Andolan Organization) असे सांगुन गॅस एजन्सीची झाडाझडती घेवुन, गॅस एजन्सीचे मालक व कामगारांसमक्ष गाडी अडवुन, भेटुन व फोन वरून शिवीगाळ दमदाटी करुन दरमहा 15 हजार रुपये खंडणी मागणाऱ्या अमोल परशुराम रायकर (वय 30 वर्षे, रा. कोंढवे धावडे, पुणे) (Amol Parshuram Raikar) आणि सोमनाथ उध्दव कोमिले (वय 28 वर्ष, रा. रामनगर, वारजे, पुणे) (Somnath Uddhav Komile) या दोघांना अटक करण्यात आली आहे. अमोल रायकर याने, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन संघटनेचा अध्यक्ष असे लेटर हेड व ओळख पत्र वापरुन खडकवासला (Khadakwasla) शिवणे, वारजे, कोथरुड (Kothrud) या भागातील एचपी कंपनीच्या गॅस एजन्सींना (HP Gas Agencies) टार्गेट करुन, तुम्ही परप्रांतीय कामगार (Migrant Workers) कामावर ठेवलेले आहेत. त्यांना कामावरुन काढून टाका. लोकांकडुन जास्तीचे पैसे घेत आहात. ब्लॅकने गॅस सिलेंडर टाकी विकत (Black sells gas cylinder tanks) आहात. तुम्हाला धंदा करायचा असेल तर, मला दरमहा 15 हजार रुपये द्यावे लागतील. नाहीतर मी तुमच्या विरुद्ध पोलीसांत व जिल्हाधिकारी ऑफिस येथे तक्रारी (Complaint to Police and Collector) देवुन आंदोलन (Agitation) करणार आहे, अशा प्रकारच्या धमक्या देत होता.

 

 

दरम्यान, डोणजे मधील पृथ्वी गॅस एजन्सीचा (Prithvi Gas Agency, Donje), गॅस डिलिव्हरी बॉय चंदनसिंग भाटी हा टेंपो क्र. MH 12 QE 5497 मधून, मंगळवार दि.3 ऑक्टोबर 2023 दुपारी 1 वाजण्याच्या सुमरास, अपना टेलर शॉप, न्यू कोपरे गाव या ठिकाणी गॅस डिलिव्हरी करण्यास गेलेला असताना, एका मारुती कंपनीच्या राखाडी रंगाच्या मोटार क्र. MH 02 PA 5825 मधून आलेल्या अटक संशयितांनी, भाटी याला धमकावत, “तू ब्लॅकने सिलेंडर विकतोस, तुझे सिलेंडर लिकेज असतात, तुला जर या भागात सिलेंडर डिलिव्हरी करायचे असतील तर आम्हाला 15 हजार रुपये दर महिन्याला द्यावे लागतील. नाहीतर तू परत सिलेंडर डिलिव्हरी करायला आलास तर, तुझे हात पाय मोडू” अशा प्रकारची धमकी दिली. यावेळी भाटी याने पृथ्वी गॅस एजन्सीचे मालक रमेश अर्जुन पारगे (Ramesh Arjun Parge) यांना झाला प्रकार सांगत, त्यांचा क्रमांक अटक संशयितांना दिला. दरम्यान, मालकाशी बोलणे झाल्यावर भाटी हा पुन्हा गोदामावर गेल्यानंतर त्याला टेंपो मधील 3 हजार 300 रुपये किमतीचा एक गॅस सिलेंडर कमी असलेला आढळून आला. या काळात त्या दोघांना आणि त्यांच्यासोबत लाल रंगाची साडी परिधान केलेल्या एका महिलेला भाटी याने 5 हजार रुपये दिले होते.

 

 

मात्र अमोल रायकर व सोमनाथ कोमिले हे वेगवेगळ्या गॅस एजन्सीवर जावुन, बेकायदेशिर तपासणी करु लागले व गॅस एजन्सी मालकांना फोन करुन शिवीगाळ व दमदाटी करू लागले. तसेच शिवणे, कोपरे, कोंढवे धावडे, वारजे या भागात गॅस सिलेंडर टाकी डिलीव्हरी करणाऱ्या गाड्या व कामगारांना अडवुन त्यांना हातपाय तोडण्याची धमकी देत असल्याचे समोर आल्यानंतर. त्यांच्या या त्रासाला कंटाळुन या भागातील गॅस एजन्सी संघटनेचे सभासद असलेले अंबिका गॅस एजन्सीचे (Ambika Gas Agency Warje) नवनाथ गुंडाळ (Navnath Gundal), आतिष गॅस सप्लायर्सचे (Atish Gas Suppliers) गणेश नाळे (Ganesh Nale), गोल्ड मॅन एचपी गॅस एजन्सीचे (Golman HP Gas Agency) सार्थक सरडे (Sarthak Sarde), भरेकर एचपी गॅस एजन्सीचे (Bharekar HP Gas Agency) उमेश शेडगे (Umesh Shedge) यांच्या शिष्टमंडळाने (Delegation) कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त भिमराव टेळे (ACP bhimrao Tele) यांची भेट घेत, घडत असलेल्या प्रकाराबाबत तक्रार कथन करत न्याय मागितला.

 

 

प्रकरणाचे गांभीर्य ओळखून, सहाय्यक पोलीस आयुक्त भिमराव टेळे यांनी परिमंडळ 3 चे पोलीस उप आयुक्त सोहेल शर्मा (DCP Suhail Sharma) यांच्या आदेशानुसार, उत्तमनगर पोलीस स्टेशनचे (Uttam Nagar Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर (PI Kiran Balwadkar) यांना खात्री करून योग्य ती कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार बालवडकर यांच्या पथकाने संशयित आरोपी वारंवार गॅस एजन्सी चालकांना फोन करून शिवीगाळ दमदाटी करून खंडणी मागत असल्याचे पुरावे पडताळणी करुन (after Evidence Verifying), गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर अमोल रायकर व सोमनाथ कोमिले हे वारंवार अंबिका गॅस एजन्सीच्या मालकांना पैशाची मागणी करत असल्याचे पुरावे आढळून आले. यामध्ये गुरुवार दि.5 ऑक्टोबर 2023 रोजी अंबिका गॅस एजन्सीच्या नवनाथ गुंडाळ यांच्याकडून 5 हजार रुपये रोख खंडणीची रक्कम स्विरात असताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात उत्तमनगर पोलिसांना यश आले.

 

 

ही कारवाई परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त सोहेल शर्मा, कोथरुड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त भिमराव टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर, सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे (API Umesh Rokade), पोलीस उपनिरीक्षक शुभांगी पवार (PSI Shubhangi Pawar), पोलीस शिपाई ज्ञानेश्वर तोडकर (Dnyaneshwar Todkar), अनिरुध्द गायकवाड (Aniruddha Gaikwad), तुषार किंद्रे (Tushar Kindre) यांनी केली आहे. आरोपींना कोर्टात हजर केले असता, त्यांचा तपासकामी 2 दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) देण्यात आलेली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शुभांगी पवार करत आहेत.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.