Type Here to Get Search Results !

शिक्षक द्या, नाहीतर शाळेला टाळे ठोकू; पुणे महानगरपालिकेला शाळा व्यवस्थापन समितीचा इशारा

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


“Give the teacher, or we will lock the school” ; Warning of School Management Committee to Pune Municipal Corporation

 



“Give the teacher, or we will lock the school” ; Warning of School Management Committee to Pune Municipal Corporation

 

पुणे, दि. 21 ऑक्टोबर 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिकेच्या शाळेत (PMC Pune School) अपुरे शिक्षक (Teachers Shortage) असल्यामुळे अद्यापनावर परिणाम झाला असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान (Educational Loss of Students) होते आहे. यामुळे संतप्त झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीने (School Management Committee) “शाळेला टाळे ठोकण्याचा” पुणे महानगरपालिकेला इशारा (Warning) दिला आहे. या पार्श्वभूमीवर माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ (Deepali Dhumal) यांनी पालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार करून, लवकरात लवकर शिक्षक पुरवण्याची मागणी केली आहे. तसे न झाल्यास विद्यार्थी आणि पालकांसहित पालिकेसमोर आंदोलन (Protest) करण्याचा इशारा दिला आहे.

 

 

याबाबत वारजे येथील कै. शामराव श्रीपती बराटे शाळेतील (Late Shamrao Shripati Barate School Warje Malwadi Pune) “शाळा व्यवस्थापन समितीने” शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष (Former Chairman of Education Board) प्रदीप उर्फ बाबा धुमाळ (Pradip alias Baba Dhumal) यांना पत्र देत आंदोलनाचा इशारा दिला होता. यावर तत्काळ कार्यवाही करत धुमाळ यांनी पालिकेशी पत्रव्यवहार (Correspondence with Municipality) करत, शिक्षक पुरवण्याची मागणी (Demand to Provide Teachers) केली आहे. शाळा व्यवस्थापन समितीने दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “आमच्या शाळेत पहिली ते सातवीच्या वर्गाच्या प्रत्येकी दोन-दोन तुकड्या आहेत. या 14 वर्गांसाठी किमान प्रत्येकी एक प्रमाणे 14 शिक्षक अपेक्षित आहेत. परंतु सध्या 4 शिक्षक आहेत. त्यापैकी एक शिक्षिका दुर्धर आजाराने ग्रस्त (Suffering from Terminal Illness) आहेत. त्यांच्यावर पुढील वर्ष ते सहा महिने उपचार (Treatment) सुरू राहणार आहेत. त्यामुळे त्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षात (Academic Year) त्यांच्याकडील वर्ग शिकवता येणार नाही. सध्या त्यांच्याकडे पाचवीचा म्हणजेच स्कॉलरशिपचा (Scholarship) वर्ग होता. त्यांनी त्याप्रमाणे तयारी देखील केली होती. परंतु आता त्या शाळेत येऊ शकत नाही. त्यामुळे सद्यस्थितीला शाळेत 14 वर्गांसाठी सध्या तीनच कायम (परमनंट) शिक्षक आहेत.”

 

 

“त्याचबरोबर ठेकेदारी अथवा स्वयंसेवी संस्थांच्या (NGO) माध्यमातून पुरवण्यात आलेले शिक्षक मागील एक दीड महिन्यांपासून अनियमितपणे (Irregularly) येतात. त्यांच्या शिकवण्याचा दर्जा देखील नसून, आमची पवित्र पोर्टल (Pavitra Portal) मधून सरकारी भरती होणार आहे. आम्ही ही नोकरी सोडून जाणार आहे, अशी वक्तव्ये त्यांच्याकडून होत असतात. त्यामुळे त्यांच्याकडून दैनंदिन अध्यापनाचे काम नियमितपणे होत नाही, असा आरोप (Alleged Daily Teaching Work Not Done Regularly) शाळा व्यवस्थापन समितीने (SMC) केला आहे. तर पुणे महानगरपालिकेच्या या शामराव बराटे शाळेत किमान सात ते आठ कायम (परमनंट) शिक्षक आणि सात कॉन्ट्रॅक्ट टीचर (Contract Teacher) देण्यात यावेत, शिक्षक देताना जास्तीत महिलांचा (Lady Teacher) समावेश असावा, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीने या पत्राद्वारे केली आहे. त्याचबरोबर यंदाच्या शैक्षणिक वर्षात शिक्षकांची वेळेत नेमणूक झालेली नसल्यामुळे, शिक्षकांचा विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्वीपासूनच पाठीमागे राहिलेला आहे. पहिल्या सत्राचा अभ्यासक्रम तातडीने पूर्ण करून घ्यायचा आहे. याबाबत, महापालिकेचे उपायुक्त राजीव नंदकर (PMC Pune Deputy Commissioner Rajeev Nandkar) यांना 13 ऑक्टोबर 2023 रोजी भेटून समितीने निवेदन दिले असल्याचेही शाळा व्यवस्थापन समितीने धुमाळ यांच्यासह चेकमेट टाईम्सच्या निदर्शनास आणून दिले आहे. तर 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत शिक्षक उपलब्ध करून न दिल्यास शाळेला टाळे ठोकून आंदोलन करण्याचा इशारा (Warning to Protest by Locking the School) पत्राद्वारे दिला आहे.”

 

 

याबाबत पुणे महानगरपालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (Additional Commissioner PMC Pune), शिक्षण विभागाचे प्रशासकीय शिक्षण अधिकारी (Administrative Education Officer of Education Department PMC Pune) आणि उपायुक्तांशी पत्रव्यवहार करत, शिक्षक पुरवण्याची मागणी केली आहे. दिपाली धुमाळ यांनी आपल्या पत्रात शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान लक्षात आणून देताना, म्हटले आहे की, “येथील उपलब्ध असलेल्या शिक्षकांना प्रत्येकी किमान तीन वर्गांवर लक्ष्य द्यावे लागते. त्याचप्रमाणे काही वर्गाना शाळेतील शिपाई तसेच बालवाडी शिक्षिका, मावशी व काही वेळेला पालक सुद्धा विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेची गुणवत्ता व शैक्षणिक दर्जा अत्यंत चांगला असल्याने मागील शैक्षणिक वर्षात झालेल्या स्कॉलरशिप परीक्षेत 17 विद्यार्थी गुणवत्ता यादी मध्ये आलेले आहेत. मात्र शाळेची गुणवता व दर्जा (Quality and Status of School) टिकवण्यासाठी कमी असलेले शिक्षकांची जागा भरणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षक कमी असल्याने पालकांमध्ये देखील असंतोष निर्माण होत आहे. वारंवार मागणी करूनही अद्यापही शिक्षकांची नेमणूक केली जात नाही. या पार्श्वभूमीवर येत्या गुरुवार दि. 26 ऑक्टोबर 2023 पर्यत या शाळेत शिक्षकांची नेमणूक न केल्यास, शाळेतील विदयार्थी व त्यांच्या पालकांसह महापालिकेसमोर आंदोलन (Protest with Students and Parents in front of PMC Pune) करण्याची कठोर भुमिका घेण्याचा इशारा दिला आहे.”

 

 

शामराव बराटे शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचा वेगळा ठसा

पुणे महानगरपालिकेच्या या कै. शामराव श्रीपती बराटे शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचा शाळेच्या प्रगतीत एक वेगळाच ठसा आहे. विशेष म्हणजे ही शाळा व्यवस्थापन समिती कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या अथवा राजकीय व्यक्तीच्या कार्यकर्त्याच्या सूचनेवरून (Political Interfare) बनवण्यात आलेली नसून, पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून तयार झालेली आहे. त्यामुळे शाळेच्या भवितव्यासाठी ही शाळा व्यवस्थापन समिती नेहमीच कार्यरत असल्याचे आढळते. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने उचललेले हे पाऊल महापालिका प्रशासनाला बुचकळ्यात पाडणारे ठरणार असे दिसते. त्याचवेळी पालिकेच्या काही शाळांमध्ये मात्र राजकीय पुढार्‍यांच्या किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हस्तक्षेपातून निर्माण झालेल्या शाळा व्यवस्थापन समित्यांमुळे शाळांचे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे देखील चित्र याच शहरात दिसत आहे. याचा परिणाम शाळा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर झाल्यास त्याला जबाबदार कोण? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

 

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share




Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.