A person found half-naked near Warje Malwadi bus stop died during treatment
पुणे, दि. 21 ऑक्टोबर 2023 (चेकमेट
टाईम्स): वारजे माळवाडी (Warje Malwadi) बस स्टॉप (Bus Stop) जवळ अंदाजे 35 वर्षीय बेशुद्धावस्थेत (Unconscious)
आढळलेल्या अर्धनग्न (Half Naked) व्यक्तीचा उपचारादरम्यान
मृत्यू (Death During Treatment) झाल्याची घटना समोर आली
आहे. सदरील व्यक्ती शुक्रवार दि.13 ऑक्टोबर 2023 रात्री सव्वा बारा वाजता वारजे
माळवाडी बस स्टॉपजवळ अर्धनग्नावस्थेत, बेशुद्ध असल्याचे आढळून आले होते. त्यावर
ससून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (Sasoon Hospital NICU) उपचार सुरु होते. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शुक्रवार दि.13 ऑक्टोबर 2023 रात्री सव्वा बारा
वाजता वारजे माळवाडी बस स्टॉपजवळ एक अनोळखी व्यक्ती (Unknown Person) अर्धनग्नावस्थेत,
बेशुद्ध पडली असल्याची माहिती वारजे पोलिसांना (Warje Police Station) मिळाली होती. त्यावरून वारजे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, 108
रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात उपचारार्थ हलवले होते. त्याच्यावर ससूनच्या
अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान रविवार दि.15 ऑक्टोबर 2023
रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या मृत्यूचे
कारण स्पष्ट झाले नसून, ससून रुग्णालयाने व्हिसेरा राखून ठेवला आहे ("Opinion
Reserved, Viscera Preserved for Chemical Analysis"). दरम्यान
मृताची ओळख पटली नसून (Un-identified Dead Body), त्याच्या
नातेवाईकांचा (Relatives) शोध घेण्यात येत आहे. त्याचे वय अंदाजे 35
वर्षे, डोक्याचे केस काळे, उंची 5 फुट 5 इंच, रंग सावळा, अंगाने मध्यम, चेहरा गोल, दोन्ही गुडघ्यावर
खरचटल्याची ताजी जखम, जवळ काहीएक चिजवस्तु पैसा अडका नसल्याचे अवस्थेत मिळून आला
आहे. या व्यक्तीबाबत कोणाला काही माहित असल्यास वारजे पोलिस स्टेशनशी संपर्क
करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिस हवालदार एन. पी. सोनार
पुढील तपास करत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर
फॉलो करा
https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share
Checkmate
Times, Chekmet Times, Checkmate, Chekmet, चेकमेट टाईम्स, चेकमेट
टाइम्स, चेकमेट टाइम, tv9 marathi live news, abp
live Marathi, abp maza live, zee marathi news live, zee 24 taas live, ibn
lokmat live, lokshahi
news marathi live, mumbai tak marathi live, zee24taas, tv9marathilive, abp maza
live, maharashtra news, Maharashtra Political Crisis, Maharashtra Politics,
Marathi
YouTube Channel, latest marathi news, Shivsena, NCP, BJP, Congress, MNS, AAP, Crime News, Politics News, Current Affairs