Type Here to Get Search Results !

पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील पदाधिकाऱ्यांची जुंपली

 

In Pune and Pimpri Chinchwad office bearers from both factions of NCP



पुणे, दि. 14 ऑक्टोबर 2023 (चेकमेट टाईम्स): राष्ट्रवादी काँग्रेसमधील (Nationalist Congress Party) फुटीनंतर दोन्ही गटांनी आपापली बांधणी नव्याने (Rebuilt) सुरु केली आहे. मात्र, आता दोन्ही गटात राजकीय संघर्ष (Political Conflict) आणि आरोप-प्रत्यारोप (Blame & Recrimination) होत आहेत. याचा प्रत्यय पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) आला आहे. येथे दोन्ही गटांच्या नेत्यांवरील टीकेवरून त्यांच्या पदाधिकाऱ्यांत चांगलीच जुंपली आहे. सोशल मिडिया (Social Media War) आणि कार्यक्रमांमधून त्याचे पडसाद उठू लागले आहेत.



राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Gat) पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (NCP Pune President Prashant Jagtap) यांनी बुधवार दि. 4 ऑक्टोबर 2023 ला सकाळी 5.52 वाजता “लांडग्यांच्या युतीत जाऊन वाघाला समाधान लाभत नाही, तो अस्वस्थच असतो. पोटाची खळगी भरते पण रुबाब आणि आदर जातो. लांडग्यांच्या कळपातून बाहेर पडून पुन्हा जंगलाचा राजा होण्याची संधी वाघाकडे कायम असते.” अशा प्रकारचे ट्विट (Tweet) केले. यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी 6.58 वाजता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Gat) पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे (NCP Pune City Yuvak President Sameer Chandere) यांनी प्रशांत जगताप यांच्या ट्विट’ला उत्तर (Reply of Tweet) देताना “वाघ कुठेही असला तरी तो वाघच असतो, वाघाचा दरारा आणि रुबाब कायमच असतो हे आजच्या पालक मंत्रीपदाच्या निवडीतून सिद्ध झाले आहे. परंतू वाघाने साथ सोडल्यामुळे मेंढ्यांची चाललेली पळापळ संपूर्ण पुणे शहर बघत आहे. भावी खासदार, आमदार होण्याचं दिवा स्वप्न पाहणाऱ्यांना आजवर दिलेली सर्व राजकीय पदे दादांमुळेच मिळाली आहे. या उपकाराची जाणीव विसरलेल्या मेंढ्यानी वाघाच्या पोट -पाण्यावर बोलू नये, उलट वाघ आपली शिकार करत नाही यातच मेहेरबानी मानावी. राजकारणात प्रसिद्धी आणि मोठी संधी मिळवण्यासाठी केलेले बेताल वक्तव्य.....” अशा प्रकारचे उत्तर दिले आहे.



एवढ्यावर हे प्रकरण शांत झालं नाही. प्रशांत जगताप यांनी समीर चांदेरे यांच्या ट्विट’ला प्रतीउत्तर दिले नही. मात्र शरद पवार गटाचे पुणे शहर युवक अध्यक्ष किशोर कांबळे (NCP Pune City Yuvak President Kishor Kamble) यांनी चांदेरे यांच्या ट्विट’ला उत्तर देताना “पक्ष संघटनेचं शून्य ज्ञान असलेल्या व वडिलांच्या वशिल्यावर पदे मिळवणाऱ्या व कधीही संघटनेशी संबंध नसलेल्या, युवक पदाधिकाऱ्यांवर अन्याय करून अध्यक्ष झाल्याने दुसऱ्याच्या अध्यक्ष पदाबाबत बोलू नये, आदरणीय प्रशांतदादा हे गेली 24 वर्ष पक्षाच्या संघटनेत काम करत आहे.” अशा प्रकारचे उत्तर देताना #vashila_adhyaksh नावाचा हॅश टॅग (Hash Tag) देखील वापरला आहे. त्यामुळे या ट्विट वॉरची (Twitter War) चर्चा सध्या कोथरूड विधानसभा मतदार संघासह (Kothrud Vidhansabha) पुणे शहरात सुरु आहे.



तर तिकडे पिंपरी चिंचवड मध्ये देखील काहीसे असेच चित्र निर्माण झाले असून, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा शहरात नुकताच महाराष्ट्राभिमान युवक मेळावा (NCP Maharashtra Bhiman Youth Gathering) झाला. त्यात गुजरातला (Gujrat) गेलेले प्रकल्प (Projects) अजित पवारांनी परत आणून दाखवण्याचे आव्हान युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (NCP Yuvak Congress State President Mehboob Shaikh) यांनी दिले होते. तसेच अजितदादा हे राष्ट्रवादीत असताना वाघ होते, भाजपसोबत गेल्यावर त्यांना निर्णय घेऊ दिले जात नाहीत, असेही ते म्हणाले होते. त्यानंतर मेहबूब शेख यांच्या टीकेला प्रतिउत्तर देताना अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अध्यक्ष शेखर काटे (NCP Pimpri Chinchwad Yuvak President Shekhar Kate) यांनी “अजित पवारांवर टीका केल्याशिवाय काहींचा दिवस जात नाही, असा हल्लाबोल मंगळवारी केला.” त्याचा समाचार बुधवारी युवक राष्ट्रवादीचे नवनियुक्त शहर कार्याध्यक्ष सागर तापकीर (NCP Pimpri Chinchwad Yuvak President Sagar Tapkir) यांनी घेत असताना, “शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादीची स्थापना करून अनेक सर्वसामान्य घरातील लोकांना आमदार, खासदार (MLA, MP) केले. राज्यात जो काही राष्ट्रवादीचा जनाधार आहे, तो केवळ आणि केवळ त्यांच्यामुळे आहे, असे असताना पक्षाच्या विचारधारेच्या विपरीत जाऊन, विकासाचं घोंगडं पांघरून काही मंडळी सत्ताधारी पक्षात सामील झाली. ज्या साहेबांनी तुम्हाला मोठे केले, मानसन्मान दिला, त्यांना उतारवयात तुम्ही निवडणूक आयोग (Election Commision) दाखवला, अशा गद्दारांनी आम्हाला शिकवू नये.” अशा प्रकारचे उत्तर दिले आहे.



दरम्यान, राष्ट्रवादीच्या नुकत्याच झालेल्या मेळाव्यात बोलताना खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी आपल्या भाषणात बोलताना “राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी (NCP vs NCP) अथवा शिवसेना विरुद्ध शिवसेना (Shivsena vs Shivsena) अशी लढाई लावण्याची भाजपा’ची (BJP) योजना असल्याचे सांगताना, आपण मात्र अजित पवार गटावर टीका करायची नाही. आपण भाजपा’वर निशाणा साधायचा” अशा प्रकारचा सल्ला (Supriya Sule’s Suggestion) दिलेला पाहायला मिळाला. त्यामुळे एकूणच राज्यभरात राष्ट्रवादीचे एकमेकांसमोर उभे ठाकलेले दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप न करता नागरिकांसाठी काम करतील, अशी अपेक्षा सामान्य नागरिकांमधून (Common Man) व्यक्त होऊ लागली आहे.



वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा




Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.