Type Here to Get Search Results !

विनापरवाना फ्लेक्सबाजी केल्याने पुनीत बालन यांना 3 कोटी 20 लाखांचा दंड

Checkmate Times, Pune City, Pune District, Pune Politics, Pune Crime, Pune Educational, Chekmet Times, checkmate news, chekmet news


Puneet Balan fined 3 crore 20 lakhs for unlicensed flex betting




 

पुणे, दि. 3 ऑक्टोबर 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे महानगरपालिका (PMC Pune) हद्दीमध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (Maharashtra Municipal Corporation Act) कलम 244 आणि 245 व त्यानुसार अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्र महानगरपालिका आकाशचिन्हे (Sky Sign) व जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन (Regulation of Display of Advertisement) आणि नियंत्रण नियम, 2022 चे तरतुदीनुसार जाहिरात फलक उभारण्यासाठी पुणे महानगरपालिकेची रितसर पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र अशी कोणतीही पूर्व परवानगी न घेता (Without Prior Permission) पुणे महानगरपालिका हद्दीत दहिहंडी उत्सवाचे दरम्यानचे (Dahihandi Festival Pune) कालावधीत अनधिकृत फलक, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स लावून सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण (Defacement of Public Property) केल्याने पुनीत बालन (Punit Balan) यांना पुणे महानगरपालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह कार्यालयाचे उप-आयुक्त माधव जगताप (Deputy Commissioner Madhav Jagtap) यांच्या सहीने तब्बल 3 कोटी 20 लाख रुपये दंड दोन दिवसात भरण्याबाबत नोटीस (Notice Regarding Payment of Penalty) जारी करण्यात आली आहे.

 

 

पुणे महानगरपालिकेने पुनीत बालन यांना दिलेल्या नोटिशीत म्हटले आहे की, महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरीता अधिनियम, 1995 चे तरतुदीनुसार आणि मे. उच्च न्यायालय, मुंबई (High Court Mumbai) येथे दाखल जनहित याचिका (Public Interest Litigation) क्र. 155/2011 सुस्वराज्य फाऊंडेशन (Suswarajya Foundation) विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर मध्ये मे. न्यायालयाने दि. 31.1.2017 रोजीच्या आदेशाचा भंग केलेला आहे. दि. 7/9/2023 ते दि. 17/9/2023 दरम्यान दहिहंडी उत्सवामध्ये पुणे महानगरपालिकेच्या महापालिका सहायक आयुक्त कार्यालयाअंतर्गत (Ward Office Area) येणाऱ्या हद्दीत परवाना निरीक्षक (PMC License Inspector) यांचेमार्फत समक्ष पाहणी केली असता सार्वजनिक ठिकाणी 8 X 4 चौरस फुटाचे ऑक्सिरिच” (Oxyrich) कंपनीचे अंदाजे 2500 अनधिकृत जाहिरात फलक (Unauthorized Billboards) कोणतीही पुर्वपरवानगी न घेता उभारून आपण विद्रुपीकरण केल्याचे निदर्शनास आले आहे. सण उत्सव काळामध्ये गणेश उत्सव (Pune Ganesh Festival) वगळता सर्व जाहिरातींना शुल्क देय आहे. त्यानुसार सदर अनधिकृत जाहिरात फलकांचे एकुण 80,000 चौरस फुटाचे रक्कम रुपये 40/- प्रति दिन प्रति चौरस फुटाप्रमाणे दहा दिवसांचे रक्कम रुपये 3,20,00,000/- (तीन कोटी वीस लाख रुपये) वसुलपात्र दंडात्मक रक्कम देय होत आहे.

 

 

तरी, आपण केलेल्या विना परवाना जाहिरातीपोटी एकूण रक्कम रूपये 3,20,00,000/- (तीन कोटी वीस लाख रुपये) दंड (विद्रुपीकरण शुल्क) (Defacement Charges by PMC Pune) ही नोटीस प्राप्त होताच 2 दिवसाचे आत पुणे महानगरपालिकेच्या कोषागारात त्वरीत भरण्यात यावी. सदर रक्कमेचा भरणा विहीत मुदतीत न केल्यास आपले विरूध्द नियमानुसार कायदेशीर कारवाई (Legal Action) प्रस्तावित करण्यात येईल व वसुलपात्र रक्कम आपले मिळकत करातून (Property Tax) वसुल केली जाईल याची नोंद घ्यावी. अशा प्रकारचा मजकूर नोटिशीमध्ये मुद्रित करण्यात आला आहे. पुनीत बालन यांनी गणेशोत्सव काळात देखील मोठ्या प्रमाणात जाहिराती देऊन गणपती मंडळांना सहकार्य केले आहे. या जाहिरातींमुळे मिळणाऱ्या आर्थिक सहकार्याने (Financial Support) मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी उर्जा मिळत असते. त्यामुळे उत्सव जिवंत राहतात. तीच परिस्थिती दहीहंडीच्या उत्सवाला देखील लागू होते. मात्र त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि शहराचे विद्रुपीकरण हा देखील कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे एकीकडे सार्वजनिक उत्सवांना सहकार्य करणाऱ्या बालन यांना दंड आकारला गेल्याने, गणपती मंडळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करतील, याबाबत शंका नाही. किंबहुना “लाखो मेले तरी चालतील, लाखोंचा पोशिंदा जगाला पाहिजे” अशा प्रकारच्या भावना देखील व्यक्त केल्या जाऊ शकतात. यावर आता पुनीत बालन पुणे महानगरपालिकेच्या या नोटिशीला कसे प्रतिउत्तर देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! तुमच्या फेसबुक / ट्विटर वर टाकून आम्हाला tag करा. खालील लिंकवर क्लिक करून आम्हाला सोशल मिडीयाच्या सर्व प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा

https://linktr.ee/checkmatetimes?utm_source=linktree_profile_share

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.